कवितेचे नाव - अपेक्षाच जाळ
💍 लग्नाच्या निमित्ताने दोन मनांनी मेळ केला,
💼 नात्यांच्या नावाखाली व्यवहारांचा खेळ झाला.
👧🏻 मुलींच्या जमावातून प्रश्नांची विचारणा आली,
📄 “सरकारी नोकरी हवी” या अटीनेच सुरुवात झाली.
🔁 एकामागून एक अशा अनेक अपेक्षांचा मारा झाला,
💔 भौतिक वस्तूंच्या लोभापोटी मायेचा झरा आटून गेला.
🌾 भरभरून शेती हवी, तर रानातल्या चिखलाची किळस का वाटावी?
👨🌾 शेतात कामाची उम्मीदच नाही, मंग मुलाकडे शेती पाहिजेच अशी अट का लादावी?
🏡 गावातला पडीक वाडा नुकताच पोरीच्या बापानं रंगवला,
🏢 आणि आत्ताच कमवायला लागलेल्या पोराकडून शहरात 2BHK फ्लॅट मागवला.
💎 सोनं, चांदी वं हिऱ्यांनी मढलेले दागिने हवे सारे नवे नवे,
🎯 पंचवीस वर्षाच्या पोराकडून यांना सात जन्माचं यश हवे.