🌾 बळीराजाचा आक्रोश 🌾
- कवी शुभम
( आत्मिक_बोल )
🌧️ जाड जाड सरी बरसत तास उलटून दिवस पलटलेत तरी पावसाचा वेग आणखीच लांबला,
💧 लाखोंच्या पिकां सोबत जमीनपण वाहून गेली रे निसर्गा तरी तुझा तांडव आणखी नाही थांबला.
😔 सगळेच आमच्या मरणावर उठलेत देवा ,
आता तू पण त्यांच्यात का शामिल होतोयेस ?
🩸 रक्ताचा घाम गाळून उगवलेली शेती ही
सरसकट का वाहून नेतोयेस ?
😭 काळजाला पिळणार आक्रोश करून
माझा शेतकरी बाप हुंदके देऊन रडला ,
🍽️ माणसाला अन्न देणारा जगाचा पोशिंदा
पुन्हा उपाशी पोटीचं खाटावर पडला.
🚁 शेतकऱ्यावर झालेला निसर्गाचा घात बघायला
हेलिकॉप्टर मधून पंत प्रधान आले ,
👞 पायाला चिखल लागलं या किळस पोटी
साहेब आले आणि पटकन निघून पण गेले..
🪙 शेतकऱ्याला कर्ज माफी देतो या आश्वासनावरच सत्तेच्या या खुर्च्या जनतेसमोर थाटल्या ,
वेळोवेळी शेतकऱ्याकडे पाठ फिरवतांना लाजा तुंम्हाला कशा नाही वाटल्या ❓☹️
⚠️ या वेळेस भरपाई चे फक्त आश्वासने देऊन नाही चालणार ,
💰 2215/- कोटींचा आकडा ठरलाय ना मदतीचा,
📊 शेतकऱ्यांकडे किती पोहचले याचा हिशोब मी तुमच्याकडे मागणार..
🤷 या सरकारवर विश्वास ठेवून यावेळेस नाही जमणार , आपल्या शेतीला उभारण्यासाठी
आपल्याला ही मोठी मदत करावी लागलं.
🙏 ज्या अन्न दात्याने आपल्याला घास भरवला
त्याच्या उपकाराला आपल्याला जागावचं लागलं.
✊ चला ठरलं तर मंग - शेतकऱ्यावर आलेल्या संकटाला आपण सगळे मिळूनी सामोरे जाऊ,
🌸 फुल नं फुलाची मदत करून शेतकऱ्याला आपल्या परत उभारू..
समाप्त 🙏