ती आजकाल माझा प्राण मागते,
हृदयातून आत्म्याचे वाण मागते।
अंतरीचा हा अर्जव सख्या सांगुनी,
माझी सारी तहान मागते।
हो, मी तुझाच आहे निरभ्र आकाशासारखा,
मिठीत मावत नाही म्हणून जमीन मागते।
मानवी मनाच्या पावसाळी वाळवंटात
मृगजळ प्रिये,
समाजाच्या चौकटीत राहून ती दान मागते।
आता पुरे की अवधूत, अजून काय बाकी?
काहीही म्हणा, ती खूप छान मागते।
_अवधूत सूर्यवंशी