प्रार्थना
हे ईश्वर मी तुझ्याकडे का आलोय हे तूही जाणतोस , माझे तुझ्याकडे हे मागण आहे कि माझ्या मनातील ही गोष्ट पूर्ण व्हावी असा मला आशीर्वाद दे परंतु ह्या गोष्टी मुळे जर दुसर्या कुणास त्रास किंवा त्यांवर अन्याय होत असेल व बहुतेकांना माझ्या ह्या कृतीमुळे वा मागणी मुळे त्रास होणार असेल तर ती नाही झाली तरी चालेल, योग्य अयोग्य हे तू करशीलच पण मी पामर कधी कधी क्षणिक मोह, प्रेम वा भावनेच्या भरात हे विसरु शकतो म्हणून माझ्या कडून चुकूनही कुणाचे अनिष्ट घडू नये अशी मला तू बुद्धी दे अशी मी प्रार्थना करतो .