वि.स.खांडेकरांची " ययाती " वाचुन संपली . ययाती लोकांना का आवडली असेल माहीत नाही . प्रत्येकाला त्यात काही वेगळं सापडत असेल . कुणाला प्रणय प्रसंग आवडले असतील . कुणाला शर्मिष्टेच दुःख बघून गहीवरल असेल . कुणाला अलकाच विष पिन यातना देत असेल . कुणाला देवयानीचा राग आला असेल . कुणाला कच आवडला असेल . कुणी मुकुलिकेला दोष देत असेल . कुणी ययातीला भ्रमिष्ट म्हणत असेल . कुणी ययातीच्या प्रणयाला हवस समजत असेल . कुणी यतीला पोरकट समजत असेल . पण मला वाटतं ययाती कुणी ही असू शकतो . जो जगात हरला . नात्यात हरला . प्रेमात हरला . कर्तव्ये हरला . कुणी गर्दीत ही एकटाच भटकला . कुणाचा भरवसा तुटला . कुणाचं मन तुटल . ज्याने आयुष्यात काही तरी गमलवल . तो प्रत्येक जण ययाति आहे . कधी कधी काय होत की प्रत्येकवेळी तुटलेल्या गोष्टीला सांधन शक्य होत नाही .