दुराव्यातही जपले जाते
बंध गोड या प्रितीचे
भावबंध हे असे निराळे
गोड त्या मैत्री नात्याचे
सुख -दु:खाची वाट मोकळी
होते गोड त्या जागेत
जिथे असतो हात मैत्रीचा
एकमेकांत गुंफत
समजणे अन समजवणेही
वाटते आपले आपलेसे
नाते नसूनी रक्ताचे ते
असते धागे मैत्रीचे
आनंदाचा क्षण रंगतो
सुरेख गोडशा संवादात
दु:ख भारही हलका होतो
तिथे भेटल्या विसाव्यात
दूर दूरच्या वाटेतूनही
साद घालते मनाला
जवळ नसूनी आपल्या ते
संवाद साधते आपल्याशी
प्रतिकूल झाल्या स्थितीत
जिथे मिळतो ओलावा मायेचा
तो असतो अनमोल धागा
मनाने जोडल्या मनाचा
नकळत होत्या मैत्रीचा
काल आठ वर्षांनंतर एक जवळची मैत्रीण भेटली आणि आपसूकच त्या नात्याविषयीच काव्य लेखणीत उतरल मैत्री नात्यास समर्पित