समतेने भरल्या दृष्टिने
क्रांती ज्योत उजळवली
करूणेचा भाव जपूनी
बंधूता कार्याने दावली
जल देण्या शुद्रांना
खुले केले घरचे हौद
अशी मानवता जपून मानवाला
मानवता धर्म शिकवला
सुखदतेने भरला होता
मार्ग तयाचा शिक्षणाने
परि सुख वाटण्या क्षुद्रांना
त्यागला मार्ग सुखदतेचा
पुरूष असूनी अहंकाराला
शरण न कधी गेला होता
पुरूष असूनी स्वाभिमान
स्त्रीतही त्याने जागवला
मार्ग होता स्त्रीचा बंदिस्त
चार भिंती पुरता उरलेला
त्यास ज्ञानाचे द्वार खोलून
मुक्त केला त्याने शर्थीन
घराचा आसरा त्यागला
अनेकांचा आधार बनण्या
विरोधाचे काटे सोसले
समतेचा भाव जागवण्या
फसवल्या गेल्या विधवेला
प्राण त्यागण्यापासून वाचवेले
तिच्या मुलास गोद घेऊन
त्याचे त्याने जीवन घडवले
शिवरायांची प्रतिमा शोधून
शिवजयंती साजरी केली
तेथूनच शिवजयंतीची
जोमाने सुरूवात झाली
शेतकऱ्याचा आसूड रचून
अन्यायाचा आवाज बनला
पत्नीसही समानता देवून
आदर्श पतीही तो बनला
विचारांत आधुनिकता रूजवून
परिपक्व विचार निर्मिले
सत्य शोधक समाज स्थापून
समाजकार्य थोर केले
अशा थोर महात्म्याची
कोणत्या शब्दांत गावू स्तुती
शब्द सामर्थ्यही फिके
त्यांच्या कार्यांपुढे आमचे
त्यांच्या कार्यांपुढे आमचे