तिचा होकार

शब्दातून ती कधी व्यक्त नाही झाली.
नजरेत तिचा होता होकार पण,
ओठांनी तिच्या मौन धारण केलेले.
माझ्या येण्या कडे ,ती डोळे लावून बसायची.
मी दिसता तिला ,हळूच खिडकीचा पडदा सरकवायची.
तिची ती नजर अन ते एकटक पाहणे.
जणू माझी नजर ती घट्ट पकडून ठेवायची.
न बोलता ही तिचा होकार देऊन जायची.
मी हसलो तिच्या कडे बघून तर,
रागाने डोळे मोठे करायची.
किती ही नाही म्हंटले तरी,
प्रेम माझ्या वरच करायची.
गालातल्या गालात हसत राहायची.
गाला वरची ती गोड खळी,
होकार तिचा देऊन जायची.

Marathi Poem by Author Sangieta Devkar.Print Media Writer : 111787278

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now