तार्‍यांनी भरलेले आकाश,
बाजूला समुद्र किनारा,
पण अपुर्ण आहे तुझ्याशिवाय
हा सुंदर नजारा...

चंद्र तारकांच्या शुभ्र चांदण्यांत
ऋतूकिरणांच्या प्रेमाची सुमनें फुलली,
गंध मिळाला शब्दांना प्रीतीचा
दोन प्रेमहृदयी प्रीत जूळली....

निळ्या नभी स्वप्ने अवतरली
अथांग सागरात प्रतिबिंब उमटले...
सुंदर ती स्वप्ननगरी नयनी साचली
पण तुझ्याशिवाय सारे नीरस भासले....

आकाशाला आस आपल्या प्रीतीची
समुद्राला तहान प्रेमळ शब्दांची
सारेच अधूरे वाटते सख्या रे
तू सोबत नसताना अपुर्ण वाट प्रीतीची....

प्रत्येकवेळी तूच सोबत असावा
आनंदाचे क्षण अपुले वेचावे सारे,
प्रत्येक भावना जपू एकमेकांच्या
सुखदुःखाच्या झोळीतील सारे...

आयुष्यातले सारे सुंदर नजारे
अपुर्णच भासतात तुझ्याविना,
तुझ्या प्रितीचा रंग नाही हृदयी
तर हृदयी गुलाबी रंग सुनासुना....

Marathi Poem by Ritu Patil : 111780967
Ritu Patil 5 year ago

खूपच सुंदर लिहिलं... खरंच खुपच मस्त आवडलं...👌👌🍫🍫💐💐

unknown 5 year ago

रंगीन प्रीतीचा गंध उजळवू, नयनास चमक नव्याने भरू... भाग्याचे दोरे विणू ह्रदयी, नात घट्ट पुन्हा करू.... समुद्र किणारी हास्य उधळू, मनी साद आनंदाची ठेवू.... नितळ डोळ्यात बघू, पुन्हा प्रेमाचा बगीच्यात फिरू... तु लिहलेल खरंच खूप छान लिहिलंय आवडलं.. 🤟👍🏻👍🏻👍🏻

Ritu Patil 5 year ago

Thank you 🍫🍫💓💓

unknown 5 year ago

खरंच खूप छान लिहिलंय आवडलं...👍🏻👍🏻🤟😍

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now