सौजन्य - ब्लूपॅड
जगून घ्यावे.. जरासे स्वतःसाठी, - Suryakant Majalkar
आज जगून घ्यावे म्हणतो जरासे स्वतःसाठी,
सांगती वृथा दवडले आयुष्य दुसर्यांसाठी,
क्षणोक्षण आनंदरंजन असेल माझ्यासाठी,
उडवली झोप, बुडवली स्वप्ने दुसर्यांसाठी,
विहरेन आकाशी, कधी समुद्रतळाशी,
कर्तव्यपरायणता ठेवण बाजूला क्षणांसाठी,
नाही पावले वळणार वाम मार्गासाठी,
नाही पश्चाताप असेल अंतिम क्षणांसाठी.
आणखी वाचा ब्लूपॅड वर - https://bluepad.in/share/YpkvtRXMFYAKuik59