कविता... पाणी काव्य
पाणी पाणी पाणी
टाहो सजीव जीवनी
पाणी सर्व कारणे
जगणे-मरणे हसणे खेळणे
पाण्यावरून युद्ध
पाणी पाऊस वचने
विजांचे आकाशी चमकणे
थेंब थेंब पाणी संचयने
समुद्रात न उमटे पाणी हद्द
जलाशी जलाचे तटतटणे
पाण्यासाठी भूमीचे आक्रोशने
सुखदुःख पाणी राशी भरणे
देहाशी पाण्याचे डचमळणे
पाण्यावाचून जगणे दचकणे
गुप्त सुप्त लुप्त पाणी स्रोत
मुसळधार पाऊस जलज्योत
आकाशाचे पाण्याशी नाते
जमिनी भेट पाणी थेट
भरभर उसळी जमीन स्वर
जीवन धारोळी बहर