वृत्त- मंजुघोषा
लगावली- गालगागा , गालगागा, गालगागा
सौख्य गेले प्रेम थोडे शोधतांना,
जाणले मी आसवे मग गाळतांना।
लोपल्या दाही दिशा का काळजाच्या,
प्रेम नावाच्या मशाली जाळतांना।
सागराला का किनारा भार वाटे,
आज कळले वेदना या भोगतांना।
पाकळ्या हातात आहे आठवांच्या,
बोचती काटे, फुले का वेचतांना।
भांडणे माझे विद्रोही, भावनांशी,
बंध एकतर्फी तुझ्याशी तोडतांना।
अनु...🍁🍁