नमस्कार,
माझ्या मनाला भावलेली महाराष्ट्राची संस्कृती व कला शब्दात व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..
हृदयात आहे आपुल्या शिवबा नसांनसात वाहतो भगवा..
अनेक बोलीभाषा असूनही प्रत्येक बोलीत आहे गोडवा ||1||
गुढीपाडवा, गोपाळकाळा, मंगळागौर, दिवाळी आणि होळी
वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीने नटलेल्या.. महाराष्ट्राची शान आहे पुरणपोळी||2||
लावणी, पोवाडा, अभंग, कीर्तन आणि भारुड..
ढोलताशांच्या गजरांमधुनी.. गणपती होतो सिंहारूढ||3||
शिवरायांच्या नेतृत्वाने, आंबेडकरांच्या कर्तृत्वाने, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने,..फुलेंच्या शिक्षणाने, पेशव्यांच्या पराक्रमाने..
धन्य झाली ही मातृभूमी सावरकरांच्या लेखणीने||4||
बालगंधर्व, दादासाहेब, सचिन, आनंदी,.. सावित्रीबाई आणि आशा….
पुरंदरे, पूल, माधुरी, राणी लक्ष्मीबाई.. ह्या थोरांनी जगण्याला दिली नवी दिशा||5||
महाराष्ट्राच्या मायभूमीत, केनियाच्या कर्मभूमीत.. समृद्धततेच्या आकांक्षाच्या लक्ष लक्ष उजळती वाती
महाराष्ट्र मंडळात गुण्यागोविंदाने एकोप्याने.. राहून जपतो.. आपण आपुली संस्कृती, जपतो आपण आपुली संस्कृती , जपतो आपण आपुली संस्कृती ||6||
Supriya