Marathi Quote in Poem by Devyani Waghade

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*बरं झाल देवा*.....
*मला कोरोना झाला* |

*आयुष्याचा आलेला*,..
*सगळा माज निघुन गेला* ||
*म्हनीत होतो नेहमीच मी*,
*माझी गाडी,आंन माझा बंगला* | *पन जवा बसलो आम्बुलन्समधी*
*आख्हा जीव उशाला टांगला* ||
*गाडी राहिली..बंगल्याम्होरं* ...
*आन रस्ता दिसेनासा झाला*,
*बरं झाल देवा...मला कोरोना झाला*...|| 1

*प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी*
*केली कर्म आठवत होती*..|
*प्रत्येक अडकनारया श्वासासंगे*,
*माणुसकीची जान साठवत होती*
..... *पुण्यसंचय आला संपत* ..
*आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला*,|
*तेंव्हा कुठ..देवा..तुझ्यावर भरोसा आला*..||
*बरं झाल देवा...मला कोरोना झाला*.......2

*होती पैशांची मस्ती*..
*आनं पदाचीबी गुरमी* |
*सगळं संपल देवा आता*
*आलीया पुरती नरमी*..||
*जवा आता मिळालाय*,
*गरिबा शेजारी खाट*.|
*तवाच माझा जिरलाय* |
*आता समदा थाट* ||
*सगळ आठवुन आता* |
*जीव घाबरा झाला* ||
*बर झाल देवा...मला कोरोना झाला* ||| 3

*नाही दिली कोणा गरिबा कधी*,
*रुपया आणीक दमडी* ..|
*इथं सुयांच्या भोकानी*,
*थकून गेलीया चमडी* ||
*पै-पै कमावलेला,पैसा ना कामी आला* |
*बर झाल देवा...मला कोरोना झाला* || 4

*खर सांगतो...मित्रांनो आता*,
*पैसा,पद आणी खोटी प्रतिष्ठा*,
*यात काही दम नाही*......|
*कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त*,
*प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई* ||
*नात्यांमधील ऑक्सिजन कधी*,
*कमी होऊ देऊ नका* |
*मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले*,
*बोट कधी सोडवु नका* ||
*आनंदाचे " *रेमड़ीसीव्हियर*",
आणी आत्मविश्वासाचे" *टेमीफ्लू*"
व्यायामाचे " *एन्टीबायोटिक*"
आणिक हास्याचे *"मल्टी-व्हिट्यामिन"*
मित्रांच्या सोबतीचे असते, *व्हिट्यामिन "सी"*.....आणि
वरुन नात्यांच्या प्रेमाचे *"झिंक" आवरण*,....
हाच आहे कोरोनाचा खरा *प्रोटोकॉल*,
*आज मला ह्याचा खरा उलगडा झाला*....... *आन*

*बर झाल देवा* ....
मला *कोरोना* झाला....

Marathi Poem by Devyani Waghade : 111703894
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now