सरेल हा अंधार दाट
प्रकाशाची ही दिसेल वाट
पक्षी जेव्हा नभी गुणगुणती
आशेची पणती मनी मिणमिणती
होईल बागेला चिमुकल्यांची सजावट
ऐकू येतील हास्यांचे किलबिलाट
सुखाची दारे अलगद उघडती
आशेची पणती मनी मिणमिणती
धावेल मुबंईची जान ही ऐटीत
उत्साहाने पाऊले पडतील गर्दीत
घडयाळाचे काटे लागी खुनवती
आशेची पणती मनी मिणमिणती
मास्क,सँनिटायजर आणि नियमांचा मेळ
लवकरच संपेल ही कठिण वेळ
सुख समृद्धीचे क्षणही परतती
आशेची पणती मनी मिणमिणती
✍️रोहिणी