थोडं तुझं नजरेने बोलणं
थोडं माझं ते समजुन घेणं
असचं तर बहरलं
प्रेम आपलं
थोडं तुझं रुसणं
थोडं माझं मनवणं
असचं तर मिटलं
पहिलं भांडण आपलं
थोडी तुझी मेहनत
थोडी माझी बचत
असचं तर उभारलं
घर आपलं
थोडं तुझं हसणं
थोडं माझं लाजणं
असचं तर उजळलं
अंगण आपलं
थोडी तुझी काळजी
थोड्या माझ्या वेदना
बाळाच्या येण्याने पुर्ण झालं
आयुष्य आपलं
थोडा तुझ्यातला तु
थोडी माझ्यातली मी
स्वतःला विसरून आपण
एकमेकांना नेहमी जपलं
थोडी तुझी प्रेरणा
थोडी माझी साथ
नेहमी प्रगती करत राहु
हेच माझं बाप्पाचरणी मागणं