दोन मने Book Review
तुम्ही पुस्तक वाचायला लागता तेव्हा, पुस्तकातलं प्रत्येक पात्र हे तुम्हाला तुमच्या भोवताली आहे किंवा असायला हवं, त्याला त्याच्या बद्दल विचारता यायला हवं असं वाटायला लागतं, आता माझंच घ्या ना , माझी आवडती कादंबरी ही दोन मने, ती मी आज दुसऱ्यांदा वाचून संपवली, पण खरंतर कादंबरीत असलेल्या प्रत्येक पात्राची अशी भुरळ पडते की त्यांना वाचून संपल्यावर ते आपल्यासोबत असायला हवे किंवा त्या वेळी आपण तरी त्यांच्या जवळ असायला हवे होते अस वाटतं. बाळासाहेब, चपला, श्री आणि माईंभोवती फिरणारी ही कथा शेवटाला आल्यावर त्यांच्यात असलेल्या नात्याचा उलगडा होणं. वाचणाऱ्याला आश्चर्य चकित करून जातं. त्याहून लेखकाचं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यांच्या जगात असताना त्यांचं एकदा तरी दर्शन व्हावं अस वाटून जातं कधी कधी. किमान स्वप्नात तरी त्यांचा भास व्हावा अशी इच्छा मनात येऊन जाते.
कादंबरीच्या शेवटाला आलो तेव्हा त्यातले तीन धडे म्हणजेच "मरणातून मिळालेले जीवन", "देवघरातला नंददीप" आणि "मरणात जग जगते", हे तीनही धडे आपल्याही शेवटाला कुणी आपल्या शेजारी बसून ते वाचावेत अशी इच्छा होऊन गेली. आज कादंबरी संपली पण श्रीला भेटायची इच्छा काही पुरी होणार नाही म्हणून एक मन नाराज होते, तर दुसरे मन श्री नावाचा मित्र पुस्तकातून आपल्याला भेटला होता म्हणून समाधानी होते.
म्हणायला त्याच्या आयुष्यात चपला नकोच होती, असं कुणी तरी मागे म्हंटल होतं, मला वाटलं कदाचित त्यांची बाजूही बरोबरच असेल, पण मग चपला आलीच नसती तर श्रीला त्याव्हे वडील कोण आणि आई कोण हे कळलेच नसते.
पुस्तक वाचायला घेतलं आणि हळू हळू तुम्ही त्यात रमून जाता, दिवसागणिक तुम्ही त्याच्या प्रेमात पडता मग ते पुस्तक एकदा वाचून सुद्धा मन भरत आणि, आणि मन भराव म्हणून पुन्हा वाचायला घेता, तरीही मन भरत नाहीच.
अखेर कादंबरीवर लिहिलेला हा दुसरा अभिप्राय आणि लेखक वि. स. खांडेकरांना शतशः नमन..
(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)
मयुर श्री बेलोकार
9503664664
Insta@shabd_premi