#अर्धा ... मराठी कविता
विरह - नीरजा काव्यप्रकारावर आधारित रचना
काहिली होई मनात
विरहाने तुझ्या
सुरमय
जीवन
होते एकेकाळी
या भावनाशील जगात
आठवणींचा हिंदोळा उरला
जगणे त्यावर
छबी
कोरीव
मनदर्पणी तुझी
श्वास माझा नुरला
किती आठवू तूला
सोबतीला माझ्या
एकांत
आठवण
चिरते काळीज
समजावू किती मला
अर्ध्यावरती डाव सोडला
नाही केला
विचार
स्वार्थ
बघितला तुझा
स्वप्नमय मनोरा मोडला
... ©सौ. गीता विश्वास केदारे...
मुंबई
#अर्धा