Marathi Quote in Thought by Na Sa Yeotikar

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रिय आठवणी,
आठवणी विना मनुष्य जगेल काय ? अर्थात या प्रश्नाचे उत्तर होय असे ही येईल आणि नाही सुद्धा. होय असे उत्तर देतांना अनेक आठवणी मनात रेंगाळतात, लहानपणीच्या आठवणी, शाळेच्या आठवणी, मित्रांच्या आठवणी, कुटुंबातील काही आठवणी, तरुणपणीच्या आठवणी, लग्नाची आठवण, संसारतल्या काही आठवणी असे अनेक आठवणी मेंदूच्या स्मृतीपटलावर येऊन आदळतात. साऱ्याच आठवणी स्मरणात राहत नाहीत मात्र ज्या चांगल्या आहेत ते नक्कीच आठवणीत राहतात. त्या आठवणींच्या बळावर मनुष्य आपले जीवन जगत असतो. काही आठवणी मात्र मनाला खूप दुःख देऊन जातात, ती आठवण आली की, मनुष्य चिंताग्रस्त किंवा उदास होतो म्हणून नाही असा उत्तर येऊ शकेल. मोबाईल मधील मेमरी कार्ड जसे डाउनलोड केलेल्या साऱ्या गोष्टी साठवून ठेवते, तसे आपले मेंदू देखील आपण पाहिलेले आणि अनुभव घेतलेले साऱ्या घटना साठवून ठेवते. मात्र मेमरी कार्ड फुल्ल झाले की ते हँग होते किंवा बदलावे लागते तसे आपले नाही म्हणून बरे आहे. आपले मेंदू साठवलेल्या बऱ्याच गोष्टी आपोआप पुसून टाकत असते म्हणून आपली मेमरी कधी हँग होत नाही. पण मेमरी कार्ड सारखे आपण ही साऱ्याच गोष्टी आठवणीत साठवून ठेवू लागलो तर एके दिवशी आपले मेंदू देखील हँग झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही सत्य आहे. आपणांस काही गोष्टी विस्मृती करता येतात म्हणूनच आपण सुखी व आनंदाचे जीवन जगू शकतो. जी व्यक्ती वेडसर असते तिला मात्र काहीच आठवण राहत नाही.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111500903
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now