🌸 नात म्हणे काय बात🌸
एक आजी एक नात
जगा वेगळ हे नातं
मन आजीच नातीत
वय विसरुन जातं ।।धृ।।
आली आली माझी नात
आजी म्हणे अंगणात
स्वर वाजवित पायी
छुमछुम पैंजनात ।।१।।
आजी आजीच्या स्वरास
आली निनादत नात
विसरली आजी भान
आनंदाच्या त्या नादात ।।२।।
चला खेळ नवे खेळू
पण कोणात कोणात
एक आजी एक नात
सांगा आणखी कोणात ।।३।।
नको सांगूस कोणास
गोष्ट सांगू या कानात
गोष्ट आजीची आजीची
नात म्हणे काय बात ।।४।।
...prajakta..