#मनाला

नामस्मरणात
गुंतवी मनाला
तू आत्मभानाला
जागवावे!

सुख आणि दु:ख
मनाचेच खेळ
घालावा तो मेळ
विवेकाने!

जणांचे ऐकावे
मनाचे करावे
सुखाचे असावे  
जीवन हे!

विवेकी वागणे
चिंतन मनन
असावे ते मन
शांत सदा!

.......©प्रल्हाद दुधाळ.

Marathi Poem by Pralhad K Dudhal : 111421829

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now