तुझी आठवण...
आठवण... ती मला रोजच येते...
आली की एका शांत किनार्यावर घेवून जाते...
तुझ्या विश्वात माझं छोटसं जग बनवते...
तुझ्या विचारात गुंतवून ठेवते...
हळूच तु आल्याचा भास करून देते...
तुझ्या भासातही तु लपंडाव खेळतोस...
हळुवारपणे पापण्यांना जाग देतोस...
मग शब्दही अपुरे पडतात अन् डोळे बोलायला लागतात...
मन पुन्हा जागं होतं...
तु नसल्याची जाणीव करून देतं...
मग किनारा सुद्धा माझ्यावर हसतो...
तु पुन्हा एकदा, आठवण बनुन आल्याची जाणीव करून देतो...
फक्त तुझी आठवण...