ज्वालामुखी झाली अशी
माझी तुझी ही भावना ,
रौद्र रूपे उसळते
मनालाही ती ऐकेना !
किती कोंडमारा असा
एकटीने सोसायचा,
परतावे मागे सदा
भाग हा परंपरेचा !
कन्या आहे म्हणोनी मी
कानी हेच आदळले,
थोडं सोसायचं पोरी
जगी हेच आढळले !
थोडी उंच उडालेली
आपटते कोसळून,
दिल्ली ते हिंगणघाट
पंख टाकले छाटून !
अशी कशी मी सबला
आवरेना हा आक्रोश,
घनघोर आता युद्ध
सारे तोडून हे कोष !
होत स्वयं सिध्द नारी
काली,दुर्गा मी होईन,
एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !
एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !
-योगिता