तुझ्या तीन चेहऱ्यात
वैराग्य आणि आत्मीयता
श्वान धेनु लीन चरणी
सहा हस्तांची कृतीशीलता
तुझ्या अवतारे भक्तजना
अध्यात्म तू शिकविले
संगमावरी नद्यांच्या त्यांनी
तुझे पुण्यक्षेत्रे निर्मिले
भिक्षा मागण्या शिकविलेस तू
सोडून अहंकार अन दांभिकता
पौर्णिमेचा चंद्रही
तुजला अर्पितो शरणता