Marathi Quote in Poem by Vinanti G Kharpatil

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#काव्योत्सव 2.0

तुझ्याचबद्दल

तुझ्याचबद्दल बोलताना

ती एक रात्र जागवलेली

कळालेच नाही चोर पावलांनी

कशी पहाट उगवलेली

तुझ्याचबद्दल बोलताना

मजसवे तारे ही तेव्हा जागले होते

ऐकता ऐकता मग तेही

पहाटे थकून निजले होते

रातकिडा किरकिर करत

मध्येच हुंकार द्यायचा

तुझ्या त्या आठवणी जणू

मनापासून ऐकायचा

ह्या सर्वांना बघून मग

चंद्रही थोडा थांबला

थांबणार तो, कारण तसा

माझा सखा आहेच चांगला

तु आणि फक्त तुझ्याच होत्या गोष्टी

मी फक्त सांगत होते न होता कष्टी

आपली ही कहाणी ऐकून

ते आभाळ ही झाले ओले

अन् सुंदर अशा मोहक

कळ्यांची ही झाली फुले…….

विनंती म्हात्रे खारपाटील

Marathi Poem by Vinanti G Kharpatil : 111168908

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now