देवा तू कुठे आहेस?
देवा तू कुठे आहेस ?
गोड हसण्यारा बाळात,
सुगंध देणारी फुलात कि
शक्ति देणारी अन्नात
सांग मला तू
आहेस कुठे देवा?...(१)
प्रत्येक जीवाचा श्वासात,
आई वडिलांच्या प्रेमात,
माणूसाचा ह्रदयात,
नक्की सांग मला तू,
आहेस कुठे देवा ?...(२)
जीवाला जीव लावणारा
मित्राच्या ह्रदयात की
आयुष्यभर सेवा करणारी
बायकोच्या मनात
तू आहेस का देवा?...(३)
सूर नवा ध्यास नवा चा
हर्षद चा मेंदूत की
जगाला प्रकाश आणि
उष्णता देण्यारा सूर्यात,
तू आहेस का देवा?...(४)
वर्ष भर लागणारा
पाणी तीन महिन्यात
देणारा तू,
जगातील प्रत्येक श्वासोच्छ्वासाला
लागणारी हवेत,
आहेस का देवा
तू तिथे?...(५)
हजारो लाखोंच्या जीव
वाचविणारे डॉक्टरांच्या
ह्रदयात की
अन्नदान करणाऱ्या लाखो
माणूसांच्या मनात
आहेस का देवा तू तिथे?...(६)
किती ही माणूस
प्रगती केली तरीही
धान्य, रक्त आणि
प्राणवायू पुरवू शकत नाही
असा सामर्थ्यवान
एकटा आहेस तू
कुठे शोधू मी तुला,
देवा तू कुठे आहेस?...(७)