ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच नाही
तुझ्यावर रुसन फुगण
न तू मला मनवण
मग मी हसून
तुझ्यावरचा राग विसरणं
ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच नाही
तुला भेटायला ओढ लागण
तुझ्याशी बोलाव वाटण
न कधीतरी मीच तुझ्या
गप्पांना कंटाळून निघून जाण
ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच नाही
आज बसलेय मी एकटीच
न कातरवेळ झालीय
क्षितिजापर्यंत नजर जातीये
न मन फक्त तुलाच शोधतय ……
आज कळतंय रे मला कि
ते प्रेमच होत ..........
सुरुवात फक्त मैत्री ने झाली होती
आज खोलवर मनात डोकून पाहिलं न जाणवलय
खरंच ! ते प्रेम होत .....