Marathi Quote in Romance by Aaryaa Joshi

Romance quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रेमाचा दिवस येतो आहे जवळजवळ
प्रेमीजनांना नेहमी पडते याची भुरळ
तू आणि मी नेहमी असता जवळ
गरज पडावी का अशा दिवसाची
हा प्रश्न तुला सरळसरळ..
प्रेम असतं शाश्वत प्रेम असतं चिरंतन
मग एकाच रंगाच्या गुलाबाला का मिळावं आलिंगन?
भेटवस्तू काय द्यावी तुला प्रत्येक वेळी
तूच आहेस देवाने मला दिलेली भेट आगळी!
असं असताना प्रेम आपण रोज रोज करावं
एकाच दिवसाची वाट पाहत का थांबून रहावं?

Marathi Romance by Aaryaa Joshi : 111088655
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now