एक सकाळ हसत येते
पक्ष्यांचे कूजन ऐकवून जाते!
एक सकाळ नाचत येते
माशांचे नर्तन दाखवून जाते!
एक सकाळ फुलून येते
रानफुलांची भेट घडविते!
एक सकाळ उमलून येते
तनामनाला उमलवीत जाते!
एक सकाळ आल्हादते
सुंदरसे घरटे वार्यावर हलते!
एक सकाळ ओथंबून येते
पाण्यात तरंग उमटवीत जाते!
एक सकाळ रंगून येते
हिरवाईच्या रंगात रंगवून जाते!!