शिवशंकर आहे सांब भोळा
त्याच्या भस्माचा कपाळी टिळा
तीर्थक्षेत्री महिमा उजाळा
भीमाशंकरी निसर्गाचा सोहळा!!
भीमा नावाच्या दैत्याने
त्रस्त केले जगाला या
त्याचा वध करूनी येथे
शंकराने तारिले जगाला!!
भीमा नदी पवित्रही
उगम पावे पर्वतराजी
भक्तजनांना कसा लागला
पार्वतीसह शिवाचा लळा!!