एक संध्याकाळ
झर्याकाठी
थबकलेली शांत
एक संध्याकाळ
नदीकाठी
प्रवाही पण निवांत
एक संध्याकाळ
पर्वतशिखरी
क्षितीजावर लालिमा लेऊन पसरलेली नितांत
एक संध्याकाळ
बुरुजावर
इतिहासाच्या साक्षीने भारदस्त
एक संध्याकाळ
उत्सवी
टाळ मृदुंगाच्या गजरात
चिंब भिजलेल्या स्वरात मस्त
एक संध्याकाळ
कातर
तुझ्या आठवणीत स्तब्ध श्रांत
एक संध्याकाळ
धुंद
तुझ्या कुशीत अलवार प्रेमातील आनंद