-- - पाऊल वाट -----
दूर देशी सांज वेळी पहाट एक झाली
मायदेशी रानातून साद एक आली
एक सांगावा , एक उममेद , एक आस
पाहत वाट लेकराची मायेला एक कास।
बालपण आले समोर झाले मन अधीर
पाऊल वाट शोधू लागली मग नजर।
पण परतीच्या प्रवासाला वळण लागले
साधे हिशोब आता कठीण झाले ।
कवड्याचा हवशी लेकरू आता
कवड्याचा गुलाम लेकरू झाला।
माई कसा परतले आता तुझा लाल
ही सारी आहे त्याच्या मोहाची चाल।
कशी मिळेल त्यास परतीची ती
पाउल वाट ।
--- shivanita---