#Kavyotsav
एक पुस्तक..
खूप आवडतं पुस्तक आहे!
तरीही कायमचं मिटायचं आहे!!
पुस्तकात आहे छान कथा!
आनंदाची असली तरी आहे थोडी व्यथा!!
मी ही आहे त्या पुस्तकातलं एक पात्र!
आणखीही आहेत काही लोभसवाणी चित्र!
आठवणींचे परिच्छेद आणि भावनांच्या ओळी
प्रत्येक पानापानामधे , पिंपळपानी जाळी!!
काहीवेळा असं होतं नवी कथा वाटते छान!
कालांतराने त्याचे कंगोरे उलगडू लागते पान अन् पान!!
कथा अजूनही छान असते... पात्र चेहरे बदलतात!
आपण असतो तिथेच... तीच हात सोडतात...!!
मग येतो विचार पुरे झाला खेळ!
कंटाळवाणी कथा झाली किती घालवावा वेळ!!
वाचून मीही होणार तशीच कंटाळवाणी!
त्यापेक्षा मिटावं हे आणि गात रहावीत गाणी!!
कथा राहील तशीच मिटून त्याच पुस्तकात!
कालांतराने पानंही झोपी जातील झाकलेल्या बासनात!!
कदाचित चुकून कुणी झटकेल धूळ सहज!
सापडेल कथा त्यात तशीच आणि गाईल माझंच गुज!