शिक्षक✨✨🙏💯🥰🙏✨
वाट होती अवघड जिद्द तुम्ही दिली.
तुमच्यामुळे लढण्याची नवी आशा जागली.
कुठे होते मी आणि आज कुठे आहे मी.
तुमच्यामुळे यशाची वाट नवी दिसली
माझं मन होतं एक निरागशी बाग. त्यात ज्ञानाचे फुलं तुम्ही उमवले. मी शिकावं म्हणून किती हो तुम्ही धडपडले.
आज मनापासून वाटतं मास्तर येऊन तुमचे पाय धरावे.
आई-वडिलांनंतर तुमचे उपकार मी कसे फेडावे.
तुमचे आभार कसे मांडू हेच मला कळत नाही.
या जन्मी मात्र मी तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही.
वाटत कधीतरी मनाला तुम्ही नसता तर काय झालं असतं.
जगाच्या या अंधारात आयुष्य मरगळून गेलेलं असतं.
अ आ इ पासून सुरु झालेला हा प्रवास, कधी इंग्रजीच्या भरदार पुस्तकांपर्यंत येऊन पोहोचला हे मला माझंच कळलं नाही.
पण आजही आठवते मला, तुम्ही कौतुकाने केलेले गृहपाठाच्या वहीवरील सही.
आई नंतर माझे बोबडे बोल तुम्हीच समजून घेतले.
आणि माझे स्वप्न सत्यात यावे यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले.
एकच म्हणेल शेवटी आपणच आहात श्रेष्ठ
कारण जे ज्ञानपुन्याचे काम करतात तेच असतात खरे श्रेष्ठ.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः 🙏🙏🚩💯💯🙏🙏🙏🙏🙏🥰🥰 माझ्या सर्व शिक्षिकांसाठी व शिक्षकांसाठी ही एक कविता 🥰🙏🙏🙏✨💯
स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ....