तुम्ही खरोखरच जर माझी संतान असाल
तर तुम्हाला कशाचीही भीती
बाळगायला नको, कशानेही तुमच्या
प्रगतीत बाधा यायला नको. तुम्ही
सिंहा सारखे व्हाल. आपण साऱ्या
भारताला, समस्त जगताला जागृत केले
पाहिजे..... माझ्या मुलांनी
कार्यसिद्धीसाठी पेटत्या अग्नीत देखील
उडी घ्यायची तयारी ठेवायला हवी.