#कलिका प्रकटदिन..😂🎂
दिवस आला आवडता माझ्या पिल्लुचा
तिच्या जीवनातील एकमेव सणाचा...
सुकू, वैशू, मनु, नीतू, खुशू सख्या सगळ्या
आल्या पिल्लुच्या वाढदिवशी सजूनी आगळ्या - वेगळ्या...
केक, चॉकलेट्स, बलुन्स डेकोरेशन्स भारी
घालुनी मस्त फ्रॉक पिल्लू दिसते आहे परी...
तुझ्या आयुष्यात असाच आनंद येत राहो
रहा डॅशींग, नको करुस कधीच कुणाला अहो - जाहो...
हाणामारी आहे आपल्या दोघींचा छंद
काय पिल्लू असतो की नाही यात वेगळाच आनंद...
म्हणून म्हणते तुला नको बदलू कधीच
जशी आहेस रहा नेहमी तशीच...
अयय..... पिल्लू..... काय मस्त वाटतं हे नाव
मनाला सुखावतात पिल्लू तुझे हाव - भाव...
-Khushi Dhoke..️️️