कविता:-आयुष्य असंच जगायचं असतं
दुखत असेल काही मनात....
सर्वांना दाखवायचं नसतं,
त्रास कितीही होवो परंतु
आयुष्य असंच जगायचं असतं
येतात लाखो अडचणी....
तरीही रस्ता चालावाच लागतो,
सगळा वेळेचाच खेळ जणू
मधुनच डाव सोडायचा नसतो !
सावरून घ्यावे जीवन आपले...
आपल्याच ईच्छा शक्तीवर,
आपणच मार्गदर्शक व्हावं
आपल्याच जीवन वाटेवर !
तावून सुलाखून निघतात...
तेच सोन्यासारखे चकाकतात,
दुःखांना सामोरे जाऊन
जग जिंकून दाखवतात!
सौ.योगिता वितल तकतराव,मुंबई