स्पर्श तुझ्या हातांचा फुलवतो सुंदर शहारा,
शब्द तुझे हुन्नरी, मी भाबडी गुंतूनी राहते शब्दावरी,
न भलते मन कोणास, न उमगत ध्यास कोणाचा जादू तुझ्या नशिल्या डोळ्यांची, जणू मला कैद करून ठेवण्याचा अट्टाहास,
हास्य उमलते भान हरपते जेव्हा येतो श्वेतगंध तुझ्यातल्या जणू लाजवतो कस्तूरीस,
मिटून डोळे असेच जावे आयुष्य तुझ्या मिठीतल्या रहस्यातूनी..
shivu