"श्री सुक्त"
"ऋचा 10"
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि | पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ||१०||
अर्थ:-: हे लक्ष्मी, तुझ्या कृपेने ,मनस::-माझ्या मनाचे,कामम :-मनोरथ,आकुतिम:- संकल्प,विचार,तसेच, वाच:-वाणीचे,सत्यम:-यथार्थपणा,वाणीचा खरेपणा म्हणजेच वाणीचे सत्य.
पशूनाम:-गाई वगैरे पशूंच्या,अन्नस्य:-(हे अन्न भक्ष्य,भोज्य,चोष्य,आणि लेह्य असे चार प्रकारचे आहे.)रूपम :-वर सांगितलेले अन्नाचे चतुर्विध स्वरूप,आशिमही-प्राप्त करीन(तुझ्या कृपेने मला प्राप्त होवो),श्री-संपत्ती,यश-कीर्ती ,मायि-माझ्यामध्ये,श्रयताम:-आश्रय करो (,संपत्ती आणि संपत्ती वरोबर यशही मला मिळो हा आशय)
मनाची शक्ती विलक्षण आहे,या प्रबुद्ध
मन:शक्तीची देणगी केवळ मानवालाच
विशेषत्वाने मिळाली आहे म्हणून त्याला
'मानव'ही यथार्थ संज्ञा प्राप्त झाली.
भारतीय ऋषि मुनी याच मन:शक्तीच्या
जोरावर मनाच्या पलीकडे गेले आणि
तेथून मग त्यांनी या मन:शक्तीचा बहिर्मुख प्रवाह अंतर्मुख केला,त्या मुळे
जे ज्ञान ऋषींना झाले ते किनात्याही
भौतिक विज्ञानापेक्षा अद्भुत असे होते.
विवेकाचा बंधारा घालून जर मनाचा
प्रवाह थांबवता आला तर मनाची वाया
जाणारी शक्ती सहजच केंद्रित होईल
आणि मग अशा केंद्रित मनाचे मनोरथ
सहसा वाया जात नाही हे त्यांच्या लक्षात
येऊन चुकले.