"श्री सुक्त"
"ऋचा 2"
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ||२||
अर्थ:--जातवेद! हे अग्निदेवा!ताम म्हणजे त्या पूर्वी वर्णन केलेल्या व जगप्रसिद्ध आशा आणि अनपगिमिनीम-म्हणजे एकदा प्राप्त झाल्यावर कधीही इतरत्र न जाणारी,माझ्या घरात एकदा प्रवेश झाल्यावर निरंतर माझ्याच घरात राहणारी,अशा लक्ष्मीला मे माझ्यासाठी,
हे अग्ने,तू आहव म्हणजे बोलाव.यस्याम-पूर्वोक्त लक्षणांनी युक्त आशा लक्ष्मीचे आगमन झाले असता (मी)सहजतेने,हिरण्यम म्हणजे सुवर्ण,गाम-गाईंना,गाईंच्या खिल्लारांना
अश्वम-घोडे आणि पुरुषानं म्हणजे मित्र,
हितचिंतक व जीवाला जीव देणारे एकनिष्ठ सेवक अहम-मी विन्देयम-प्राप्त
करू शकेन.
लक्ष्मी म्हणजे लक्षणवती,ही लक्षणे कोणते.
"ज्ञानैश्वर्यसुखारोग्य धनधान्य जयादिकम
लक्ष्म यस्यास्समुद्दिष्टं सा लक्ष्मीति निगद्यते ।।
लक्ष्मीचे अस्तित्व या श्लोकात सांगितलेल्या चिन्हांनी ओळखता येते.