*वटपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मशिक्षण*
*वटपौर्णिमा*
? *वटपौर्णिमेला स्त्रियांनी वडाची पूजा का करावी ? :* वड हा शिवरूपी आहे. वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कार्याला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे.
? *वडाला सूत का गुंडाळतात ? :* वडाच्या खोडाच्या उभ्या छेदावर शिव लहरी असतात. ज्या वेळी वडाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी स्त्रीच्या भावाप्रमाणे खोडातील शिव लहरी कार्यरत होतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी सुलभतेने ग्रहण करता येतात.
*** मच्छिंद्र माळी औरंगाबाद .