♦️शेंगदाणा चिक्की
♦️साहित्य
दोन वाटी शेंगदाणे
दिड वाटी गुळ
एक छोटी वाटी साजूक तूप
♦️कृती
प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची सालं काढून घ्यावी.
♦️कढईत छोटी वाटी साजूक तूप टाकावे.
तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेला गूळ घालून त्याचा घट्ट पाक होईपर्यंत पाच सात मिनिटे चमच्याने ढवळत राहावे
♦️नंतर मग गूळ वितळून घट्ट झाल्यानंतर एका छोट्या वाटीत पाणी घ्यावे व चमच्याने गुळाच्या घट्ट पाकाचे दोन थेंब पाण्यात सोडून गूळ कडक झाला का पहावे.
♦️पाण्यातील कडक गूळ हातात घेऊन तोडल्यास
गुळाच्या घट्ट मिश्रणाचा तुकडा पडत असेल तर चिक्कीसाठीचा पाक तयार झाला आहे असे समजावे
♦️नंतर गुळाच्या घट्ट पाकात भाजलेले शेंगदाणे, टाकून झाऱ्याने व्यवस्थित एकजीव करुन घ्या
दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करा.
♦️ एका ताटाला साजूक तूप लावुन घ्या
आता कढईतील चिक्कीचे मिश्रण ताटावर ओतून व्यवस्थित एकसमान पसरवून घ्या.
♦️ताटावरील मिश्रण पाच मिनिटं पंख्याखाली थंड होऊ द्या.
पाच मिनिटांनी आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्या.
♦️नंतर पुन्हा मिश्रण पाचसात मिनिटे सुकवा.
वड्या व्यवस्थित कडक झाल्यानंतरच त्याचे तुकडे वेगळे करा.
♦️स्वादिष्ट चिक्की तयार आहे😋