जिवाला जीव लावणारी निघाली
अखेर तेच जीव घेणारी निघाली
बालपणीच्या गर्दीत होते दोस्त
आता तीच नाते तोडणारी निघाली
फुटला पदराखालचा मायेचा झरा
प्रेमात वात्सल्य हरणारी निघाली
रक्ताचे नाते तुटले बोलून वाचाळ
घाणीत शंकेच्या बुडणारी निघाली
बघतो आहे तोच वरून तारणारी
जात माणसांची मागणारी निघाली
श्रीकृष्ण जगन्नाथ चाटे