दांडे निवती वरून दर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणि कोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून तीन चारएस्ट्या असायच्या. पण पुढे कोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोल उतरती घसारीची वाट होती. दरडीच्या कडेने जेमतेम बैल गाडी घालता येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला सवथळ भाग गाठी पर्यंत मोडणा मोडणानी बैल गाडी नेता येत असे. अर्थात भरवण बेतानी घालावे लागे , आणि घसारी चढता उतरताना दोन ठिकाणी तरी थांबून इस्वाटा घ्यावा लागे. गाडीरस्त्याने जाण्यापेक्षा भरती सुकतीचे ताणबघून पडावाने सामानाची ने आण करणे अधिकसोईचे आणि कमी वेळात फावणारे होते. तरवडतल्या सड्यावरून नजर टाकली की पायथ्याशी सुपाच्याआकारासारखा सवथळ भाग दिसे तेच कोंड सखल . कोंड सखलात खाडी शेवटते त्या भागात तर खुप मोठी, सुकतीच्या वेळीही तळठाव लागत नसे इतकी खोल गर्ता होती.निखार सुकती लागली की खाडीच्या पात्रात मध्यभाग़ी जेमतेम दोनेक वाव भागात पाण्याचावाहता प्रवाह सोडला तर पूर्ण पात्र ठणठणीत कोरडं व्हायचं. पण कोंड सखलातली गर्ता मात्र आटत नसे. ग़र्तेच्या कडेलासगळ रबरबीत चिखलाचं साम्राज्य. मात्र कडेला बारमाही लवा, नागरमोथा नी मारांडी माजल्या मुळे तो भाग हिरवागार मोहक दिसायचा.
कोंड सखलात सातचवाड्या. रावाची वाडी, दुदवडकर वाडी, भटवाडी , राऊत वाडी. सोगम वाडी, गाबीत वाडी आणिगर्तेच्या मावळत कड्याच्या पायथ्याशीअसलेली पाळेकर वाडी. निवती, पठार, तरवडयांच्या तुलनेत कोंड सखलात लोकवस्तीही कमीचहोती. त्याचे मुख्य कारण म्हणजे एकतर गाव एकवशी आणि निम्म्या गावात पिण्याच्या गोड्या पाण्याची मोठी टंचाई.गावात विहिरी, आड होते. पण त्याचं पाणीमचूळ लागायचं. मे महिन्यात तर आडा विहिरीतल्या पाण्यावर रापट तवंग जमलेलादिसायचा. नी पाणी एवढं सखार की शेवटीगोड्या पाण्यातून खळबळाऊन न काढता कपडेसुकवले तर ते कडकडीत व्हायचे. तहानलेलीढोरं सुद्धा विहिरीच्या पाण्याने भरलेली बादली समोर ठेवली तर त्यात फक्त तोंडबुडवून बाहेर काढीत. गायगुरं तर दोन तीनदा हुंगल्या सारखं करून बादली आडवी करूनसांडून टाकीत. पाऊस सुरू झाला की हारोहारचार पाच सरी पडल्यावर पाण्याचा मचूळपणामोडे. मग पाऊस उलगल्यावरही अगदी कार्तिक्या पौर्णिमेपर्यंत विहिरींच पाणी पिण्याइतपत गोड असायचं. त्या नंतर मात्र दिवसोदिवशी पाणी मचूळ होत जायचं.
कार्तिक्या पौर्णिमे नंतर गावातले लोक पाळेकर वाडीच्या मावळत सड्यावर असलेल्या जितवण्यावरून गोडं पाणी आणित. तिथपर्यंत जायला अर्धा तास मोडायचा. घरातले सगळेच लोक,अगदी पोरं- बाळं सुद्धा सकाळी न्हेरीझाल्यावर जर्मन सिल्व्हरच्या तपेल्या ,तांब्या पितळीचे हांडे , कळशा घेवून जितवण्यावर जायची नी तिथेआंघोळी उरकून न्हेलेली भांडी भरून आपल्या निर्वाहा पुरतं पाणी आणायची. बापये पाच सहा हांडे कळशांची कावड आणून दिवसभरच्या पाण्याची बेगमी करीत.सराई सुरू झाली की गुरांची कानी काढून गुरं मोकाट सोडून लावायची प्रथा होती. फक्त दुभत्यागायी म्हशींची वासरं तेवढी गोठ्यात टांगलवून ठेवली जात. ढोरं मध्यान्ही पर्यंत खाडीच्या किनाऱ्याने आंग ओलीवर वाढणारा लवा, मारांडी खात, नी दुपारी जितवणी गाठीत. जितवण्याच्या आसपास गर्द वनराई होती. तिथे आईन, धामण, हसाणी ,बिवळे अशी गोड्या पाल्याची विपुल झाडंहोती.
उगवतच्या उंचवट्याच्या भागापासून मागे सडावळीकडे पर्यंतच्या भागात म्हणजे रावाच्या वाडीत आणि भटवाडीत आठ-दहा विहीरीमध्ये खारटाणीचा उग्रम नव्हता . त्या विहीरीना कायम गोडं पाणी असे. अर्थात या वाड्यांपर्यंत यायचं अंतर जितवण्यापेक्षा अधिक होतं. म्हणून राऊतवाडी आणि दुदवडकर वाडी गाबीत वाडी आणिसोगम वाडीतले लोक जितवण्यावर जाणं पसंत करीत. आणखी एक कारणम्हणजे तिकडे पाण्याला गेलं तर मालकाचे दगडी हौद वतेस्तोवर चार वळसे रहाटओढून द्यावा लागला असता. जितवण्यावर दोन कोंडकांमध्ये घागर - कळशी बुडवून भरून घेता येत असे. खेपेलापंधरा वीस माणसं जमलेली असली तरी खोटी होतनसे. म्हणून तीन वाड्यांमधली माणसं हांडे कळशा घेवून जितवन्यावर जाणंच पसंत करीत.
सकाळी जितवण्यावर जाणारीपुरुष मंडळी सडावळी पर्यंतच्या भागात वाढलेल्या झाडांचा खडस काढून ठेवीत. दुपारी गुरं पाण्यावर आली की त्याना हिरवा पाला मिळत असे. माघ्या चतुर्थी पासून ते मिरगा पर्यंत जितवण्यापासून ते सडावळी पर्यंत असलेल्या पाले झाडांचा रोज खडसकाढायच्या वाडी वाडीवार पाळ्या लागलेल्याअसत. ही प्रथा गेली कित्येक वर्षं अगदीबिनबोभाट सुरू होती. संध्याकाळी सुर्य मावळण्या पूर्वी ढोरं आपल्या मालकाच्या दारात येवून बसत.त्याना रातीवळ्याला वेंगाटभर भातयाण नी करड गवत घतलं जायचं.अर्थात त्याना दावी लावून बांधीत नसत. ती निवाऱ्याच्या जागी टाकलेलं गवत खावून तिथेच बसकणमारीत नी सकाळी भिणभिणताना उठून मळागाठीत. मळ्यात कोंडीच्या बाजुला कायम ओला घास मिळत असे म्हणून कोंड सखलातलीढोरं कायम टुकटुकीत असायची. (क्रमश: )