जितवणी पळाले- भाग ० ५
रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केले जात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला दिली जाई. बोलीप्रमाणे केलेली मुदत भरली की मग त्या त्याटोळीचा हिशोब पुरा भागवला जात असे. प्रत्येक टोळीचा कामाचा उरका भिन्न असे त्यामुळे एखाद्या हप्त्याला कामाचा सरिफा पडत नसे. अशावेळी मिळणारी रक्कम हप्त्याच्या खर्चा साठी पुरी पडणारी नसली की मग टोळीतल्या लोकांचीमुकादमाची हमरातुमरी व्हायची.
वडार आले नी गावात कोंबड्या पाळणारे, मासेपागणारे, शेरडं पाळणारे धनगर आणि गावठी दारू विकणारांची चलती सुरू झाली. पूर्वी एकटा जग्या परीट गावठी दारू गाळून ती विकायचा धंदा करी. बेलदारांच्यातबापयांच्या बरोबरीने बायल माणसही पिणारी होती. जग्या कडचा साठा हातोहात संपायचा. हे बघून त्याच्याकडे कामकरणारा बोंबड्या नवलू स्वत:ची वेगळी भट्टी लावायला लागला. भंडार वाडीतल्या तिघानी माड मक्त्यावर घेवून माडी काढायचा धंदा नव्याने सुरू केला. गावात पूर्वी बाप्पा राण्यांचेएकट्याचे किराणा मालाचे दुकान होहे.बेलदारांची पालं पडली त्याच हप्त्यात बाबा घाट्यानी किराणा मालाचे दुकान सुरू केले. राऊत वाडी नी सोगमवाडीत घरोघरी कोंबड्या पाळायला लागले. सुमा रावतीण अख्ख्या वाडीतली अंडी आणि नाचणे, तांदूळ, कडदण घेवून बेलदारांच्यापालाजवळ बाजार मांडून बसे. नकु आणि चंपू गाबतीणही ताजं आणि सुकवलेलं म्हावरं घेवून सुमाच्या बाजुला बसायला लागल्या. सुमा , नकु नी चंपू अडाणी असल्या तरी भलत्याच पाडक होत्या. खरेदीचा व्यवहार वडारांचे पुरुष- बायामाणसे बहुतांशी हप्त्याचा बोलीवर करीत. या बाया माणसांची लिखापढी कुठली असायला......सगळा व्यवहार त्यांच्या तोंडावर असायचा.
सुरुवातीला काही बिलंदर वडारानी या बायाना फसवायला नाना युक्त्या प्रयुक्त्या करूनपाहिल्या. पण तिघीही पुरून उरल्या.कोणत्याही परिस्थितीत हप्त्याच्याहप्त्याला त्या पुरी उधारी वसूल करीत. प्रसंगी चकमा देणारांच्या पालांवर जावून त्याना शोधून काढून वसुली करायची त्यांची तयारी बघितल्यावर. आढी बाजी करायचे प्रकार बंद झाले. भंडारवाडीतले माडी काढणारे दुपारी आणि संध्याकाळी गोडी माडी , खाटीचेमोघे भरून गड्याना विक्रीसाठीपालांवरच धाडीत. काही वडाराना मामलेदार कडून टेंपरवारीरेशन कार्डं दिलेली असायची. पण टोळीत नव्याने दाखल झालेल्याना रेशनकसे मिळणार? कष्टाचं काम करणाऱ्या वडारांचा आहारही सर्वसामान्यांपेक्षा दांडगा असायचा. गावातले बहुसंख़्य लोक दरमहा मिळणारं धान्य उचलित नसत. रेशन कमेटी चालवणारा दिगू सडेकर रेशनच्या दराबाहेर किलोमागे रुपया दोन रुपये चढ घेवून तांदूळ, ज्वारी, गहू, मिलो बेलदाराना विकी.
वडार खडी फोडायच्या कामाबरोबरच दगडी व्हायनं, खलबत्ते, पाटे वरवंटे हीआयदणं कंत्राटदाराच्या नकळत बनवून विकीत. म्हाताऱ्या वडारणी छिनी हातोडा घेवून गावात घरोघर फोरून पाटे वरवंटे, जातीणी ह्याना टाकीलावून द्यायची कामं करीत. काही बेलदारणी गोधड्या – वाकळी शिवून द्यायचं कामकरीत . गोधड्या शिवून द्यायचं काम दोन दोनतीन तीन दिवसही चालायच. त्यांचं टाकेघालायचं कसब वाखाणण्या सारखं असे. वडार आले नी गावातल्या लोकानी घरोघरी तीन चार गोधड्यांची बेगमी करून घेतली. पूर्वी महिन्यातून एकदा मालुकासाराचीगावात खेप व्हायची . बेलदारांची पालं पडली दर आठवड्याला आळीपाळीने मालु नी भिक्या कासाराच्या खेपा सुरू झाल्या.
फोडलेली खडी गाढवांच्या आखलेल्या रस्त्याच्या दुतर्फा नेवून डेपो मारले जायचे. रस्त्याच्याकामाला दोन तीन साईझची खडी लागायची. याशिवाय आजुबाजुचे जांभे दगड , मोठ्या मोठ्या धोंडी फोडून त्याची वळीवं आणि बेतक्या आकाराचे दगड फोडून ते वापरीत. रस्त्याच्या तळी मोठी वळीवं वापरीत. या वाहतुकी साठीही गाढवं नेली जात. सुरुवातीला रात्रझाल्यावर गाढवं गावदरीत येवून उच्छाद करीत. मग लोकानी तक्रारकेल्यावर पोलिस पाटलाने वडाराना तंबी दिली. त्या उपरांत गाढवाना लांब सडावळीवर नेवून त्यांच्या पायानादोरीची टांगरी बांधून चरायला सोडीत. टांगरी मुळे गाढवं उतारावरून खाली येवू धजावतनसत.
खडीचं काम सुरू झाल्यावर पाऊण महिन्यानी जीवा , टेकाजी आणि मल्लू या कर्नाटका कडून आलेल्या तीन बेलदारांच्या टोळ्यांची पालं तरवडच्या शीवेलगत पडली. रस्त्याचं काम सुरूझालं. हे बेलदार कोंड खोलात फिरकत नसत. हप्त्याची सुटी असेल तेंव्हाजितवण्यावरच्या पालातले वडारतरवडात जात नी तिकडचे बेलदार जितवण्यावरच्या पालात येत. एप्रिल अखेर निम्मेअधिक रस्ता पुरा होत आला नी वडारांची पालंउठली. पावसामुळी चार महिने काम बंद राहणारहोतं. दसरा झाला की पुन्हा पालं पडणार होती. सटवाजीचा खडीचा धंदा असल्यामुळे तोमात्र तळ देवून थांबलेला होता. तालुका भरात कुठे कुठे कोंड सखलातली खडी जायची. ही वहातुक खाडी मार्गाने मोठ्या पडाव होड्यांमधून केली जायची. कोंड खोलातला रस्ता हे निमित्त होतं. त्या नावाखालीजितवण्याच्या मागच्या डोंगरातली काळवत्री खडी राजरोस न्यायचा मक्ताच मिळालेलाहोता. रस्त्याचं काम पुढे पुढे जायलालागलं तसतशी कामदारांची पाण्याकडून आबदा सुरू व्हायला लागली. (क्रमश: )