H
सैतान मिठाई वाला भाग 1
स्थळ पुणे : बाजारपेठ
रस्त्यावर चांगलाच बाजार भरला होता -
रस्त्याच्या दोन्हीतर्फे वेगवेगळ्या कांदे - बटाटे; भाजीपाळा, कपडे, मेक -अपच सामान , बांगड्या; हार असे विविध विक्रेत्यांनी आपल तंबू ठोकून दुकान मांडली होती.. , तर काहींनी रसत्यांवरच आपल जे काही सामान असेल ते विकायला ठेवल होत-.
प्रत्येक दुकानासमोर पुरुष- स्त्रीया, तरुण- तरुणी ग्राहकांची चांगलीच गर्दी जमलेली दिसत होती..-
त्यात गंम्मत म्हंणजे तरुण मंडळी फक्त बाजारात मेकअप मारुन येणा-या तरुणी, स्त्रीया यांना पाहायला येत होते. बाकी त्यांना बाजारातल्या सामानात काही एक रस नव्हत.!
बाजारातल्या रस्त्यावरुन टू- व्हीलर , थ्री-व्हीलर (रिक्षा) - अशी वाहन , हॉर्न वाजवत येजा करत होती..- पी-पी, पोंम ,पोंम आवाज कानांत घुमत होता...
बाजारातून एक स्त्री आपल्या मुलाला हाताला ओढ़त घेऊन जात होती- त्या स्त्रीच्या अंगावर हिरवी साडी, लाल ब्लाऊज होता..
गळ्यात एक साधस मंगळसुत्र होत , चेह-यावर मेकअप नव्हती , हातात दोन बंगड्यां शिवाय काही नव्हत ! नक्कीच ती स्त्री गरीब घरातली असावी? बिचारी ! त्याहून बिचारा तर तो लहान मुलगा होता !
मुलाच वय जेमतेम- नऊ दहा असावे , अंगात एक हाल्फ शर्ट , खाली एक हाफ़ पेंट होती- पायांत स्लिपरची चप्पल होती..
तो पोरगा आपल्या आईकडे एकच हट्ट करत होता..
" ए आई..ए आई..- दे ना ग मला तो ढंपर घेऊन.!" त्या लहानग्या मुलाच हेच वाक्य रिपीट होत -होत.
पण ती माय तरी काय करणार , त्या ढंपरची किंमत हजार , बाराशें वर होती , आणी तेवढे पैसे
त्या माईकडे नव्हते , शेवटी तिचा सुद्धा नाईलाज होता.
पोरग ऐकणार नाही म्हंणूनच ती त्याला हाताला धरुन ओढतच घेऊन चालली होती- आणी मागून तो मुलगा तेच तेच बोलत होता..
" ए आई..ए आई..- दे ना ग मला तो ढंपर घेऊन.!"
" ओ ताई .. ..! " अचानक त्या स्त्रीच्या कानांवर एक आवाज आला.!
त्या आवाजात एक हुकूमत होती- विलक्षण असा लक्षवेधक आवाज होता तो, त्या आलेल्या आवाजाने ती स्त्री जागेवरच थांबली, तिने हळूच वळुन मागे पाहिल..
तो मुलगा सुद्धा मागे वळून समोरच पाहत होता.
दोन्ही मायलेकांसमोर एक पाच फुट उंच पुरुष उभा होता - अंगावर ब्लैक- टी- शर्ट, खाली निळसर जीन्स , डोक्यावर काळी गोलसर उंच अशी , जादूगार घालतो तशी टोपी होती..
त्याचा चेहरा दिसण शक्य नव्हत !
कारण त्या पुरुषाने चेह-यावर एक स्केरी मास्क लावल होत -
म्हंणजेच जबडा विचकलेली सफेद रंगाची कवटी, आणी काळ्याशार चेंडू एवढ्या रिकाम्या बुभळांचा - तो स्केरी मास्क होता.
पन का ? कशासाठी? काही गुढ होत का ? या पाहूयात !
" काय ओ ताईसाहेब एवढ क्यूटस पोरग हाई तुमच - आणी त्याला अस वढत वढत घेऊन चाल्ला आहात !" त्या स्केरीमास्क वाल्या मांणसाचा माअक आतून आवाज आला..
" अहो दादा त्याला तो ढंपर हवा आहे ,आणी सद्या माझ्याकडे पैसे नाहीयेत - !" ती स्त्री म्हंटली.
" अच्छा ढंपर काय?" त्या स्केरीमास्कवाल्या मांणसाने आपला काळ्या रंगाचा ग्लोव्हज घातलेला उजवा हात पाठीमागे नेहला ,
हळूच एक टिचकी वाजवली , टिचकी वाजताच त्याच्या हाताभोवताली सोनेरी रंगाच्या धुळीकणांचा दोन सेकंदांसाठी झगमगता वर्षाव झाला , आणी त्या हातात मायावी शक्तिमार्फत एक ट्रक टॉय अवतरल..
" हाच का ..?" म्हंणत त्याने उजवा हात समोर आणला ..- त्या मुलासमोरच धरला , ती ट्रक पाहून त्या मुलाच्या चेह-यावर झटकन आनंद पसरला -
उदास चेह-यावर आनंदाची फुंकर बसली.
पन ती स्त्री मात्र जरा आश्चर्यकारक नजरेनेच त्या मांणसाकडे पाहत होती.
एक हात मागे नेहून त्याने पुन्हा हात बाहेर काढताच त्याच्या हातात एक ट्रक बाहेर आला होता ना ?
त्या मुलाने दोन्ही हात वाढवत तो ट्रक आपल्या हातात घेतला , चारही बाजुंनी त्याला उत्सुकतेने भरलेल्या नजरेने नेहाळू लागला..
" अहो दादा तुम्ही कशाला उगीचंच ह्याला तो ट्रक घेऊन दिलात , माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत.!" ती स्त्री म्हंटली..
" औह कमॉन बहनजी , मला तुमच्याकडून पैसे बियसे काही नकोयेत , उलट मला मुलांच्या चेह-यावरच आनंद पाहिल ना , की माझ मन प्रसन्न होत - मला खुप चांगल वाटत , म्हंणूनच तर तुमच्या मुलाला मी हा ट्रक घेऊन दिला ना ? आणी हो..!" अचानक मध्येच काहीतरी लक्षात आल्यासारख त्याने पुन्हा डावा हात मागे नेहला..
ह्या डाव्या हातात लाल रंगाचा ग्लोव्हज होता..
त्याने पुन्हा टिचकी वाजवली, टिचकी वाजताच सोनेरी रंगाची धुळीकण हाताभोवती दोन सेकंद गोल गोल फिरली..
पुन्हा मायावी काळ्या जादूई शक्तिमार्फत हातात एक प्लास्टीकच लाल रंगाची कव्हर असलेल एक गोळसर ग्लास अवतरल -
त्या ग्लासमधुन मंद अशी पांढरट वाफ बाहेर बाहेर येत होती.. ! न जाणे काय असाव त्या ग्लास मध्ये ?
" हे ..घे..!" .. त्या मास्कमैन मांणसाने ह्यावेळेस एका किन्नरी मांणसासारखा आवाज काढला..
त्या मुलाला हे सर्व कर्तब पाहून खुप मज्जा वाटत होती, त्या लहानग्या मुलासाठी हे सर्व चमत्कार एका जादू पेक्षा काही कमी थोडी होत ?.
त्या मुलाने तो लाल रंगाचा ग्लास हाती घेतला , न समजुन त्या लाल रंगाच्या ग्लासकडे पाहू लागला..
त्या लाल रंगाच्या ग्लासमधुन मंदपणे पांढरट वाफ बाहेर पडत होती..
" ही आहे स्मॉक मिठाई , आणी मी आहे मजनू मिठाईवाला..-हिहिहिहिहिहीही, ..!" त्याच्या किन्नरी आवाजा नंतर तो मास्कमैन विचीत्ररित्या हसू लागला..
ते हास्य पाहून ती स्त्री सुद्धा हसली..
" मिठाई.... स्मॉक मिठाई!" त्या मुलाने मोठ्या खुशीत मजनूकडे पाहिल..
त्यावर तोंडावर मास्क चढ़वलेल्या मजनूने हळकेच होकारार्थी हळुहळू मान हळवली.
" तू तू खाऊन बघ ना.!"
त्याचा आवाज पुन्हा बदल्ला , पुरुषी झाला , त्या आवाजात आता हाव जाणवू लागली , न जाणे ती मिठाई खाताच काहीतरी घडणार होत ?
हो - हो मान हळवत त्या मुलाने हातात असलेल्या लालरंगाच्या प्लास्टीकच्या ग्लासमध्ये हात घातल , आ दोन बोटांची चिमटी बनवून आतून गुलाब जामून बाहेर काढल, त्या गुलाब जामून मधून सफेद वाफ बाहेर पडत होती..
मजनू मिठाईवाला अगदी ताठ उभा त्या मुलाच्या कृतीला नेहाळत बसला होता , न जाणे त्या मास्कच्या आत लपलेल्यत्या धुर्त चेह-यावर किती आसुरी आनंद उमटला असेल?
त्याच्या चेह-यावरचे धुर्त,क्प्टी,हावभाव न जाणे कसे असतील ?
ओठ कुत्सिकरीत्या फाकले असतील, डोळे मोठे होऊन काहीश्या क्प्टी हेतू साध्य झाल ह्या भावनेने त्या मुलाकडे आसुरी लकाकीने चमकत पाहत असतील..
त्या मुलाने तो गुलाब जामून तोंडात टाकला , मचाव मचाव करत आपल्या आईकडे हसून पाहत खाऊ लागला..
खातांना त्याच्या नाक , तोंड, कानांमधुन सफेद वाफ बाहेर पडू लागली.. !
त्या मुलाची आई हे दृष्य पाहून दात काढत हसत होती...पन तीच हे हसू काहीवेळा पूरतच होत मग ते क्षणात ओसरल -
त्या चेह-यावर आश्चर्य, नवळ, भीति- भय, काळजी , ह्या सर्व भावनांचा एकाचक्षणी उद्रेक झाला..
डोळे विस्फारले , तोंडाचा - आ- वासला आणी ईतकावेळ पुतळ्यासारखा उभा मास्कमैन मजनू मिठाईवाला....
" हिहिहिहिहिहिहिह्हिहिहिहिहीहीह्हही, "
एका लयीत , किन्नरी स्वरात त्याच हसण सुरु झाल..
पण नक्की काय झालं होत ? ते पाहूयात !
त्या लहानग्या मुलाने वाफ निघणार गुलाब जामून
तोंडात टाकल , मचाव -मचाव करत खावू लागला,
नाक- तोंड , कान ह्या अवयवातून वेगाने पांढरट वाफ बाहेर पडू लागली ,
तसे काहीतरी विळक्षण अ-विचारी , अपटनिय दृश्य घडल , त्या मुलाच्या डोक्यावरचे काळेशार केस एक -एक करत पांढरे झाले ,चेह-यावरची त्वचा म्हातारली, सुरकूतली गेली, शारीरीक उंची झपाट्याने वाढली दोन फुटांवरुन , पाच फुट झाली, त्या मुलाच्या जागी आता एक म्हातारा उभा होता , पण अंगात मात्र तेच कपडे होते , एक हाल्फ शर्ट , खाली एक हाफ़ पेंट होती- पायांत स्लिपरची चप्पल होती..
" आ..आ...आई...! आई..आई... मी म्हातारा झालो आई..!" तो एंशी- नव्वद वयाचा म्हातारा एका लहान मुलासारखा बोलू लागला..
त्या नराधमाच हसण आता थांबल होत - त्याने जीन्सच्या खिशात हात घातला आतून एक पारदर्शक काचेचा चेंडू बाहेर काढला ..
" वायटाचा धंदा.. फुकटाचा पैसा.. विषारी माझी मिठाई मी आहे शैतान हलवाई.!.- उर्फ मजनू मिठाईवाला..-हिहिहिही!" त्याच्या ह्या वाक्यावर काहीतरी घडल , त्या म्हाता -याच सर्व शरीर दोन सेकंद प्रखर प्रकाशित झाल, त्या शरीरातून एक चमचमती शुभ्र वाफ बाहेर पड़ली आणि त्या चेंडूत सामावली... व पुढीलक्षणाला मजनू मिठाईवाला पांढरट धुर उडवत जागेवरुन झटकन नाहीसा झाला..
" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" कल्पना शक्तिची थेर उडवणार हे असल भयंकर दृष्य पाहून.. ती स्त्री मोठ्याने किंचाळली..
तसा बाजारातला मांणसांचा फेरा थांबला , जो तो वळून त्या स्त्रीकडे नवळाने , आश्चर्यभरीत नजरेने पाहू लागला..
" आई...आई... ..!"
तो म्हातारा पुन्हा बरळू लागला..
त्या स्त्रीने त्या म्हाता -याकडे पाहिल, तिची
सहनशक्तीच आता अंत पावली होती, शेवटी मेंदूचर ताण पडल व झटकन ती स्त्री भोवळ येऊन खाली कोसळली..
तिच्या बाजुला उभा असलेला तो म्हातारा त्या स्त्रीजवळ आला..
" आई..आई...काय झालं तुला उठ ना आई !"
तो म्हातारा त्या स्त्रीला उठवू लागला..
आजूबाजूला उभी लोक हसत -खिदळत तमाशा पाहु लागले...
भले एक एंशी - नव्वद वर्षाचा म्हातारा एका तिशितल्या स्त्रीला आई कस म्हंणू शकतो नाही का ?
आणी त्याचा आवाजही एका लहानमुलासारखाच निघत होता ...
शेवटी बाजारात उभ्या प्रत्येकाने आप-आपला स्मार्ट फोन काढुन व्हिडिओ बनवायला घेतली, कारण प्रत्येकाला वाटलं की समोर एक प्रँक सुरु आहे..
पण सत्यपरीस्थिती कोणालाच ठावूक नव्हती..!
नाही तर जो तो भीतिने पछाडला असता ..
Xxxxxxxxxxxx
समर्थांचा स्वभाव फार दयाळू होता. कोणालाही कसलीही गरज पडली तर ते मदतीला धावून जात, आज सकाळीच रस्त्यावर एका आज्जीला भोवल आली, आणि समर्थ त्या आज्जीच्या मदतीला धावून गेले - त्यांनी त्या आज्जीला शहरातल्या एका हॉस्पिटल मध्ये एडमिट केल, व त्या आज्जीना जेव्हा पूर्णतः बर वाटू लागलं तेव्हाच ते हॉस्पिटल मधून निघू लागले...
हॉस्पिटलच बिल चुकत करण्यासाठी काउंटरपाशी पोहचले..
नेहमी प्रमाने मेनका, गब्लूही त्यांच्या सोबतच होते..
मेनका - काउंटरवर असलेल्या तिच्याच वयाच्या मुलीशी बोलत होती...
काउंटरच्या थोडवर भिंतीवर एक एल.ई.डी
टीव्ही होती-
त्या टिव्हीच्या स्क्रीनवर एक न्यूज सुरु होती-
स्क्रीनवर एक काळ्या कोटमधला माणुस न्यूज सांगत होता ..
न्यूज सांगताना त्याचे हावभाव ईतके विळक्षण होते..
कि पाहणारा त्यात गुंतूण जाईल - समर्थ व गबलू
सुद्धा ती न्यूज पाहण्यात गुंतले होते..
" पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून फारच वेगवेगळ्या - आणि विचीत्र घटना घडत आहेत - एंशी - नव्वद वर्षाचे म्हातारे, बुजुर्ग लोक लहान मुलासारखे कपडे पेंट घालून एका अनोळखी स्त्रीला आई ,आई हाका मारत तिच्या मागे लागत आहेत - "
ह्या न्यूजवर गबलू दात काढत हसला ....
रिपोर्टर दुसरी न्यूज सांगू लागला..
" दूसरी घटना अशी की पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या पोलिस स्टेशन्जमध्ये मिळुन एकूण नव्वद लहान मुल मिसिंग झाल्याच्या केसेज नोंदवल्या गेल्या आहेत "
गबलूच्या ओठांवरच हसू ओसरल, डोळे आश्चर्यकारक पणे विस्फारले..-
समर्थ सुद्धा गंभीर होऊन न्यूज पाहू लागले होते.
हॉस्पिटलची फी चुकती करुन मेनका सुद्धा समर्थांपाशी येऊन न्यूज पाहू लागली..
टिव्हीवर रिपोर्टर न्यूज सांगू लागला.
" आम्हाला काही मांणसांकडून अशी माहीती कळाली आहे - की जी अतर्कनीय - अविश्वासनिय आहे - माहीतीनुसार पुणे शहरात एक मास्कमैन मजनू मिठाईवाला माणुस फिरत आहे , जो स्मॉक मिठाई विकतो - पण जो कोणी लहान मुलगा ही स्मॉक मिठाई खातो , त्याच वय सेकंदात वाढत , तो मुलगा पुढच्या दहा सेकंदात म्हातारा होतो, आणी त्या म्हाता-याच वय वाढत खर पण बुद्धी मात्र लहानच राहते..- ! "
मेनका , गबलू, समर्थ कृणाल तिघेही गंभीर होऊन ही न्यूज ऐकत होते..
सर्वकाही खुपच विळक्षण होत..
बुद्धीला न पटणार होत .
" ह्या मास्कमैन मजनू मिठाईवाल्याची पुणे शहरवासियांच्या मनात फार दहशत बसली आहे ,पालक मे महिन्याची सुट्टी असतांबा सुद्धा मुलांना घराबाहेर जाऊ देत नाहीयेत ,.. - ह्या प्रकरणाचा पुढील पोलिस तपास सुरु आहे , पाहूयात
काय घडतं ते , तो पर्यंत पाहत रहा पुणे न्यूज - पुन्हा भेटु धन्यवाद!" न्यूज समाप्त झाली..
" कृणाल..आता काय करायचं?"
गबलूने काळजीपूर्वक विचारल..
" हो ना , ईतकी सारी मुल मिसिंग झालीयेत - आपल्याला काहीतरी कराव लागेल समर्थ..! "
मेनका गबलूच्या वाक्याला दुजोरा देत म्हंटली.
" होय गबलू, मेनका - आपण नक्कीच काहीतरी करु , तसंही मला ह्या मजनू मिठाईवाल्याच्या ह्या कृती मागे काहीतरी भयंकर कारस्थान शिजत असल्याची जाणिव होतीये , मला वाटतं आपल्याला जास्त वेळ न घालवता आताच पुण्याला निघायला हव , चला..!"
समर्थांनी आपल्या एका हातातला रुद्राक्ष कडा काढला - .. ..
...... ते तिघेही आता टेलीपॉर्टमार्फत पुण्यात पोहचणार होते...
आकाशातल्या पांढ-या ढगांना चिरत
तो रुद्राक्ष कडा - सुदर्शन चक्रप्रमाणे वेगाधारण केलेल्या अव्स्थेत पुढे पुढे जात होता.
त्या रुद्राक्ष कड्यांमधल्या , दहाच्या - दहा रुद्राक्षांनी विस्तवासारखी पेट घेतली होती..
हवेतून वेगान पुढे पुढे जातांना त्या रुद्राक्ष कड्यामधुन ठिंणग्या- आणी एका एलियन स्पेसशीपसारखा वेगधारी स्वर बाहेर पडत...
" सूsssssssss..!": असा तो एका लयीत गुंजणारा आवाज होता..
आकाशातून एक एयरलाईंन कंपनीच विमान उडत चालल होत ..त्या प्लेन मध्ये ए काचेच्या खिडकीजवळ एक दहा वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत बसला होता..
त्याची आई - केव्हाचीच गाढव विकुन झोपली होती- पन तो मुलगा मात्र आश्चर्यचकित होऊन काचेच्या खिडकीतून बाहेर दिसणारे पांढरे ढग , खाली जमिनीवर उभी असलेल्या बिल्डींग्स , घरे - समुद्र हे सर्व दृष्य मोठ्या नवळाने पाहत होता..
तोच त्याच्या खिडकीजवळून अफाट वेगाने काहीतरी पूढे निघून गेल..- ज्याच वेग त्या मानवी मशीन पेक्षा ही जास्त होता..
तो मुलगा त्या विस्तवधारी तप्त पेट घेतल्या , सुदर्शन चक्राला तोंडाचा आ - वासून, नेत्र विस्फारुन मोठ्या नवळाने, आश्चर्यकारक नजरेने पुढे पुढे जातांना पाहत होता..
तोच त्या मुलाची नजर झटकन बाजूच्या सीटवर झोपलेल्या , त्याच्या आईवर पडली, त्याच्या आईच्या हातात एक पुस्तक होत , - त्या पुस्तकाच्या कव्हरपेजवर श्रीकृष्णाच सुदर्शन चक्र तर्जनीत गोल गोल भिंगतांनाच एक चित्र होत.. त्या श्रीकृष्णाच्या चित्राला पाहताच त्या मुलाच्या ओठांवर एक हसू उमटल...
रस्त्यावर एक पाच फुट उंच निळ्या रंगाच शटर खाली ओढलेली एक बंद टपरी दिसत होती. त्याच टपरी बाजुला हवेतून वेगात भिंगत येणारा समर्थांचा रुद्राक्ष कडा - जमिनीपासून आठ फुट उंचीवर येऊन थांबला..
आठ फुट उंचीवर हवेत तो रुद्राक्ष कडा
वेगान भिंगत होता , दहाच्या दहा रुद्राक्ष विस्तवासारखे चमकत होते..
तोच त्या सुदर्शन चक्रासारख्या भिंगणा-या रुद्राक्ष कड्यामधुन तीन भगव्या रंगाच्या सलसलत्या नागमोडी वळणाच्या विजा बाहेर पडल्या..
त्या थेट रस्त्यावर, आणी पुढे जे घडल, खरच चमत्कारीक , विळक्षण - अतर्कनीय होत..
त्या भगव्या रंगाच्या विजांमधून तीन मानवी आकृत्या रस्त्यावर अवतरल्या -
मधोमध समर्थ कृणाल, डाव्या बाजूला बुटका गबलू, तर उजव्या बाजुला कोट व जिन्स पेंट घातलेली मेनका.. होती..
गबलू नेहमीसारखाच दात काढत आजुबाजूला पाहत हसत होता..
मेनका - समर्थ दोघांची नजर मात्र शोधक होती , काहीतरी शोधत होती..
" समर्थ आपण पुण्यात तर आलो,पन एवढ्या मोठ्या शहरात - त्या मिठाईवाल्याला आपण शोधणार कस ?" मेनकाने प्रश्ण उपस्थीत केला..
तोच गबलू पचकला..
" सापडला..सापडला.. मिठाईवाला सापडला..! तो बघा ...तो बघा..मिठाईवाला , कृष्णालाल मिठाईवाला..- !" गबलू जिथे पाहत होता , त्याच दिशेने ह्या दोघांनिही पाहिल ..
रस्त्याबाजुला एक मोठ मिठाईच दूकान होत ,
दूकानाच्या बाहेर वर एक लाईटच बोर्ड लावल होत , त्याच रोषणाईत एक नाव तैयार केलेल..
कृष्णालाला मिठाईवाला - अँड स्वीटस.
दुकानात काचेच्या कप्प्यांमध्ये पिवळ्या रंगाच्या लाईटजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ठेवल्या होत्या..
काजू कतली, गुलाबजामून, पेढे, लाडू, मोदक.. अजुन खुपसा -या मिठाई होत्या..
पण मजनू मिठाईवाल्याच्या भयाने मिठाईच्या दुकानात ग्राहकांची कमी होती..!
गबलू हवरटासारखा त्या मिठाईंकडे पाहत - जिभळ्या चाटत ओठांवरुन जीभ फिरवत होता..
" गबलू हवरट , तुला खाण्याशिवाय दुसर काही सूचत नाही का ? बावळट कुठचा - सकाळी हॉस्पिटलमध्ये ती केळी,सफरचंद , द्राक्षे - हादडलीस तरीसुद्धा आता मिठाई खायला हवीये ..!" मेनका गबलूला चांगलाच झापत होती , आणी तो नजर चोरत आजुबाजुला खाली पाहत होता.
समर्थ मात्र त्या टपरीजवळ उभे होते - टपरीच्या निळसर शटरच्या पत्र्यावर एक पिवळ्या रंगाचा कागद चिटकवला होता ..
त्या कागदावर काळ्या रंगाने मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिल होत- तेच समर्थ वाचत होते..
मेनकाने गबलूला दोन- चार बाता सुनावल्या होत्या , तस त्या बिचा-याची काहीवेळाकरीता भुकच मेली होती.. ( फक्त काहीवेळाकरीता बर का !)
मेनकाने बाजूला पहिल , तिला टपरीजवळ पाठमोरे उभे समर्थ दिसले , मेनका चालत समर्थांजवळ आली , तिने समर्थांच्या चेह-याकडे पाहिल.. तस तिला जाणवल समर्थांची नजर समोर स्थिरावली आहे ..
चेह-यावर जरासे गंभीर भाव आहेत.
मेनकाने सुद्धा समोर पाहिल , समोर टपरीच्या निळ्या रंगाच्या शटरवर एक पिवळा कागद चिटकवला होता, त्यावर काळ्या अक्षरांत लिहिल होत..
' पुण्यातील प्रसिद्ध सोने विक्रेते घनश्याम शेठ ह्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त संपुर्णत पुणे बांधवांना परिवारासहित निमंत्रण ' त्याच मजकूरावर एक अट होती ' वाढदिवसाला येताना तुमच्या लहान मुलाला घेऊन यायला विसरु नका. लहान मुलाशिवाय प्रवेश मिळणार नाही.!'
मजकूर ईतकाच होता , आणी त्यावर आजचीच तारीख होती - वेळ सातची होती.. आताला सहा - वाजून पन्नास मिंनीटे झाली होती- वाढदिवसाची पार्टी सुरु व्हायला फक्त दहा मिनिटे उरली होती..
" समर्थ ! तुम्ही सुद्धा तोच विचार करत आहात का ?" मेनकाने हे वाक्य त्या पिवळ्या कागदाकडे पाहत उच्चारल ,मग जरा थांबून तीने समर्थांकडे पाहिल व पूढे म्हंणाली " जो मी करतीये !"
तिच्या ह्या वाक्यावर समर्थांनी गंभीरपणे होकारार्थी मान हळवली.
गबलू त्या दोघांच बोलण गप्प उभ राहून ऐकत होता..
" वाढदिवसाला मोठ्या संख्येने लहान मुल असतील , म्हंणजे तो मजनू मिठाईवालाही नक्कीच तिथे येणार..! "
" होय अगदी बरोबर मेनका - अचुक ओळखलंस -आणि हा मजनू काही घोळ घालण्या अगोदरच आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहचायला हव..!"
समर्थ म्हंटले .
तोच गबलूचा आवाज आला..!
" पण आपल्याकडे लहान मुलगा कुठे आहे ?
आता लहान मुलगा कोठे शोधायचा ?"
गबलूने त्या दोघांकडे भुवया उडवत आळीपाळीने पाहिल ..
पण मेनका मात्र गबलूकडे बारीक डोळे करत
गाळात हसत पाहत होती..
तिच्या मेंदूत नक्कीच काहीतरी शिजत होत -
हे गबलूने लागलीच ओळखल..
" ए मेनका अशी काय पाहतेस ?"
गबलूने विचारल.. .
तोच मेनकाने समर्थांकडे पाहिल..
गालात हसत म्हंटली..
" लहान मुलगा मिळाला समर्थ..! निघायची तैयारी करुया..!"
पुणे :
घनश्याम सदन :
पुणे शहरात घनश्याम शेठला कोण ओळखत नव्हत ! नाही नाही फक्त पुण्यातच नाही तर पुर्णत भारतातच त्याला कोण ओळखत नव्हत !
घनश्याम शेठचा ज्वेलरीचा बिझनेस भारतातल्या प्रत्येक स्टेट मध्ये पसरला होता.
हर एका स्टेटमध्ये त्याची दहा - पंधरा दूकान होती.
दिवसाला करोडो रुपयांची उलाढ़ाल व्हायची -
पाण्यासारखा पैसा घरात यायचा ..!
बिझनेसमध्ये त्याचे सहकारीही होतेच , नाहीतर एकट्याने हा बिझनेस संभाळण काही शक्य नव्हत.
सोने बनवण्याची कंपनी, दिवसाला होणारी कमाई चेक करण, कामगारांचा पगार पुरवण, बिझनेस स्टेटस चेक करण- ई:टी:सी अश्या वेगवेगळ्या कामांसाठी मोजलेले सहकारी होतेच.. !
अरे पन आपल्याला ह्या बिझनेसशी काय घेण देन ? आपण का ही घनश्यामची कंपनी ईतकी खोलात जाऊन पाहत आहोत ? नाही का ? त्या उलट आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात..!
म्हंणायला घनश्यामशेठ अंबानीच्या कमरे ईतका श्रीमंत होता.- त्यामुळे सर्व पुण्यातल्या मांणसाला जेवायला घालन त्याला काही कठीन काम नव्हत.
घनश्याम शेठच घर काही बंगलो , ईमारत नव्हती ! तर तब्बल साडे तीनशे फुटांवर पसरलेली एक जुनाट बांधकाम केलेली आयकॉनीक हवेली होती..
नाही , नाही त्या हवेलीच वर्णन नको !
कशाला ? तर आपल्याला फक्त पार्टीत जायचं आहे , हवेलीत नाही ! चला तर !
घनश्याम शेठने आपल्या एकूलत्या एक लेकाच्या वाढदिवसाला , संपुर्णत पुण्याला आमंत्रण दिल होत - पोस्टर लावले होते, न्यूज चैनलजवरही सांगितल होत -
ज्याने वाढदिवसाला चांगलीच मांणस जमली होती - जो तो आपल्या लहान मुलाला घेऊन , परिवारासहित तिथे उपस्थीत होता -
पन कशासाठी? तर फक्त खाण्यासाठी ! बाकी त्यांना त्या वाढदिवसाशी काय घेण देण होत ? असो !
हवेलीच्या मोठ्या गेटसमोर दोन काळेकुट्ट आफ्रिकन बाउंसर हाताची घडी घालून उभे होते.
त्या दोघांसमोरुन पालक आपल्या मुलाच थोबाड आयडीकार्ड असल्यासारख त्या दोघांना दाखवत आत प्रवेश करत होते..
तोच तीन आकृत्या त्या गेटपासुन जरा दूर थांबलेल्या दिसल्या.!
त्या आकृत्या म्हंणजे !
मेनका , समर्थ कृणाल त्या दोघांच्याही अंगावर तेच कपडे होते. - जे नेहमीचे असतात -!
समर्थांच्या अंगावर भगवा फुल बाह्यांचा कुर्ता, खाली व्हाईट पेंट , तर मेनकच्या अंगात ब्लैक कोट, खाली निळी टाईत जीन्स -
पण हे काय ? हा तीसरा कोण बर !
अंगात एक पिवळसर हाल्फ टी- शर्ट, खाली चौकलेटी हाल्फ पेंट, पायांत रंगीबेरंगी पोम पोम वाजणारे बुट.. आणी हातात एक लॉलीपॉप होता.
" मेनके तुला सोडणार नाही मी , हं ! बघुन घेईल तूला , मला मला लहान मुलगा बनवला..! "
अच्छा तर हा लहान मुलाचे कपडे घालून उभा दुसरा कोणी नसून आपला गबलू आहे तर !
गबलूने अस म्हंणतच हातातला लॉलीपॉप तोंडात टाकला व चघळू लागला ..!
तोच समर्थांचा आवाज आला..
"गबलू ! आता आपल्याला फक्त मजनूला कस पकडायचं ह्याच विचार करायला हव , हे बघ जर आपण मजनूला पकड़ल - तर मी तुला हव ती मिठाई खायला देईन.!"
" मिठाई ..!" मिठाईच्या लालसेने गबलू पिघळला.. दात काढत हसला..!
" चला आता ..!" समर्थ कृणाल , मेनका आणी लहान मुलगा गबलू चालत गेटजवळ आले..
गेटपाशी ते दोन बाउंसर उभे होते , त्यांनी ह्या तिघांच निरीक्षण केल.!
एकवेळ त्या दोघांनीही गबलूकडे पाहिल..
गबलूच्या चेह-यावरुन तो लहान आहे अस काही वाटत नव्हता , त्याचा चेहरा उलटा खोपडी होता ,
खप्पड चेहरा व तोंडाचा जबडा नेहमीचंच विचकलेला असायचा - समोरच्याकडे पाहून दात दाखवले जायचे.. हनुवटीखाली थोडीशी दाढी होती!
हाताची बोटे जाडजुड होती.
" हे कस पोरग आहे ? काय आहे हे नक्की ?"
एक बाउंसर न समजून स्वत:शीच म्हंणाला.
तो दुसरा बाउंसर सुद्धा गबलूकडे तसंच पाहत होता , तोच गबलूने त्याच्याकडे दात काढत पाहिल - पण तो काळाकट्ट बाउंसर मात्र कोड्यात पडलेल्या नजरेने गबलूकडे पाहत होता..!
तस गबलूच्या चेह-यावरच हसू ओसरल ,
त्याने मान खाली घातली त्याला वाटलं ह्या बाउंसरला कळाल की काय की आपण लहान मुलगा नाही आहोत ते !
" ओ भौ माझा मुलगा लहानपणापासूनच थोडा अशक्त आहे हो - त्याला आम्ही बौर्नविटा खायला नाही घातल ना म्हंणुनच असा दिसतोय.! आता सोडता का आम्हाला आत..!" मेनका मध्येच म्हंटली..
तिच्या त्या वाक्यावर त्या दोन्ही बाउंसरनी
एकवेळ मेनकाकडे पाहिल मग पुन्हा गबलूकडे पाहिल..तसा गबलूने तिरकस कटाक्षासहित त्या दोघांकडे पाहिल व दात विचकत हसला..
" येस येस प्लीज कम- प्लीज कम..!"
एका बाउंसरने एक हात मागे नेहल.. व आत जाण्याचा ईशारा केला..
समर्थ कृणाल -मेनका,गबलू तिघेही उघड्या गेटमधून आत घुसले..
क्रमश :
सैतान मिठाई वाला भाग 2
15×15 ची एक डिजिटल स्क्रीन दिसत होती - स्क्रीनवर एक तीन थरांचा सफेद रंगाचा केक दिसत होता.
सर्वात पाहिला खालचा थराचा भाग मोठा होता ,
दूसरा थर पहिल्या पेक्षा थोडस लहान होता , आणी सर्वात वरचा थर लहान होता..
त्या केकमधुन सफेद रंगाची वाफ हळुवार मंदगतीने नागमोडी वळणासहित बाहेर पडत होती..
मजनू मिठाईवाल्याच्या विषारी मिठाईतून सुद्धा अशीच वाफ बाहेर पडते ना ? , बरोबर ओळखलंत !
केकसमोर एक बारा वर्षाचा मुलगा उभा होता -
अंगात काळ्या रंगाचा ब्लेजर , खाली निळी जीन्स - हातात हिरव्या रंगाची प्लास्टीकची सुरी होती.
त्या मुलाच्या बाजूलाच पोटाची ढेरी निघालेला घनश्यामशेठ उभा होता .
अंगात एक काळसर जैकेट ,आत पांढरट सदरा,खाली पेंट.
घनश्यामशेठच्या बाजुला त्याची पत्नी उभी होती.
त्याच्या बायकोने सोन्याची साडी घातली होती- अंगावर विविध प्रकारची आभुषणे चढवली होती.
फक्त तोंडावर सोन्याची मेकअप मारण तेवढ राहून गेल होत.
पैश्याच माज अजुन काय ?
" हैप्पी बर्थडे टू यू ..! हैप्पी बर्थडे टू यू !"
तिथे उपस्थीत स्त्री - पुरुष सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडू लागल..
घनश्याम शेठचा मुलगा मोजो सुद्धा बापावरच गेला होता - खाऊन पिऊन चांगला गेंड्यासारखा माजला होता , फुग्यासारखा फुगला होता..- एक टाचणी टोचली तर फट आवाज करत फुटेल..
घनश्यामशेठच्या लेकाने उजव्या हातात पकडलेल्या सुरीने पिझ्झाच्या कापेसारखा केक कापला..
त्या केकमधुन हळूवारपणे मंद अशी वाक्डीतिकडी पांढरट बाहेर पडत होती -
कापलेला केक घनश्यामच्या लेकाने मोजोने हातात घेतला , प्रथम आपल्या वडिलांना भरवला , मग आईला भरवला.. .!
तो स्मॉक केक खाताच घनश्यामशेठच्या नाक , कान - तोंडातून सफेद रंगाची वाफ इंजिनच्या नळीतून वेगान धुर बाहेर पडावी तशी बाहेर पडली..
घनश्यामच्या पत्नीच सुद्धा तसंच झाल..!
वाफ बाहेर पडतांना ' फस्स्स्स !' असा विचीत्र आवाज झाला..
आणी पुढच्याक्षणाला अस काही आश्चर्यचकित करणारा प्रकार घडला , की तिथे उपस्थित मांणसे
सर्वच्या सर्व भीतिने गोठून गेली.
घनश्यामशेठच चेहरा निळ्या, लाल , पिवळसर रंगाने चमकू लागला - हात , पाय , पोट सर्व शरीरातून एक प्रखर असा तांबड़सर प्रकाश प्रज्वलीत झाला..
व पुढे घडणार दृष्य फारच विचीत्र , मती गुंग करणार होत -
घनश्यामशेठ व त्याची पत्नी दोघांच्याही शरीरातील हाडे , स्नायू, मांस - हात - पाय , सर्वशरीरच आतल्या आत खेचू लागल..
जस की शरीराची रचना पुन्हा एकदा वाढ़ण्याऐवजी कमी होऊ लागली असावी!
म्हंणजेच ज्या शरीराची वाढ होत होती - तेच शरीर
पुन्हा एकदा पहिल्यासारख लहान झाल -
आता ह्याक्षणी घनश्यामशेठच्या जागी
एक दहा वर्षाचा मुलगा उभा होता -
घनश्यामशेठच्या पत्नीच सुद्धा तसंच झाल होत.
मोजो विस्फारलेल्या नजरेने आपल्या बाजुला उभ्या त्या दोन मुलांकडे पाहत होता..!
त्याच्या हातातला स्मॉक केक केव्हाचंच गळुन खाली पडला होता..
" पप्पा..! मम्मी..!"
त्या दहा वर्षाच्या पोरांकडे पाहत मोजो रडवल्या स्वरात पाहत म्हंटला." हे काय झालं तुम्हाला ?"
समोर उभी पब्लिक , मिडियावाले सर्वाँचे कैमेरे
स्टेजवर खेचले गेले होते.
घडलेली घटना तिथे उपस्थित सर्वाँच्या मनावर कायमचीच कोरली जाणार होती.
पार्टीत उपस्थीत पोलिस यंत्रणा, बॉडीगार्ड
सर्वच्या सर्वच अचंबित नजरेने पुढच दृष्य पाहत होते.
केक खाताच चाळीशीतले घनश्याम शेठ , त्यांच्या पत्नी दोघेही डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दहा वर्षाच्या मुलात बदलले होते..
सामान्य मानवी जिवनाच्या वाटेवर चालतांना ह्या सामान्य माणसांना अस काही पाहायला मिळण म्हंणजे खरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती !
घडलेल्या ह्या घटनेने तिथे उपस्थीत सुरक्षा
यंत्रणेचे धाबे दणाणले होते - जो तो मतीबधीर झाल्यासारखा जागेवरच उभा होता.
तोच मांणसांना आजूबाजूला सारत समर्थ कृणाल , मेनका -गबलू तिघेही स्टेजवर आले...
समर्थांनी घनश्यामशेठ , व त्यांच्या पत्नीकडे पाहिल- मग त्यांच्या मधोमध उभ्या रड़णा-या मोजोकडे पाहिल..
" शांत हो बाळा , रडू नकोस! तुझ्या आई - वडीलांना मी पुन्हा पहिल्यासारख करेन , कारण तुझ्या आई- वडीलांची ही अवस्था करणारा नराधम ईथेच कोठेतरी आहे - आणी मी त्याला सोडणार नाही..! "
समर्थांच्या आवाजात आत्मविश्वास होता.
क्षणार्धात मोजा रडायचं थांबला..
त्याने दोन्ही डोळे पुसले व म्हंटला
" खरंच..!"
" कृणाल आपल्या शब्दांचा पक्का आहे बाळा !"
समर्थांनी मोजोच्या खांद्यावर हात ठेवला -
तेवढ्यात घनश्यामशेठ व त्याच्या पत्नीच दोघांचहीशरीर शुभ्र - धवल प्रकाशाने चमकून उठल.
तसे समर्थांनी पटकन त्या दोघांकडे पाहिल .
तेवढ्यात घनश्यामशेठ व त्यांच्या पत्नीच्या दोघांच्याही शरीरातून एक शुभ्र प्रकाशीत धुरकट वाफ बाहेर पडली..
" कृणाल , आपण ही आयुष्य वाफ कशाततरी भरुयात ..!" गबलू मध्येच म्हंटला..
" नाही गबलू , आपण अस करायचं नाही -कारण हीच वाफ आपल्याला त्या मजनू पर्यंत घेऊन जाणार आहे!" समर्थ म्हंणाले..
तो पर्यंत शुभ्र रंगाने चमकूण उठलेली ती आयूष्य वाफ लोकांच्या डोक्यावरुन हवेतून उडत बाहेरच्या दिशेने निघाले..
" गबलू, मेनका लवकर चला मजनू नक्कीच बाहेर आहे..!"
समर्थ हवेतून उडत जाणा-या त्या आयुष्य वाफेच्या मागे धावले..
आणी त्यांच्या मागोमाग मेनका - गबलू सुद्धा..
काळ्याकुट्ट डांबरी रसत्यावर तो सफेद रंगाचा
टेम्पो उभा होता.
त्या टेम्पोच्या एका दरवाज्याला पाठ व खालचा पाय टेकून मजनू उभा होता.
अंगावर ब्लैक- टी- शर्ट, खाली निळसर जीन्स , डोक्यावर काळी गोलसर उंच अशी , जादूगार घालतो तशी टोपी होती..
त्याचा चेहरा दिसण शक्य नव्हत !
कारण त्याने चेह-यावर एक स्केरी मास्क लावल होत म्हंणजेच जबडा विचकलेली सफेद रंगाची कवटी, आणी काळ्याशार चेंडू एवढ्या रिकाम्या बुभळांचा - तो स्केरी मास्क होता.
हळूच त्याची नजर डाव्या बाजुला वळली , तसे त्याला दिसल हवेतून दोन शुभ्र रंगाची चमचमती धुळी कणांची वाफ त्याच्या दिशेने नागमोडी वळण घेत येत आहे.
त्याने जीन्सच्या खिशात हात घातला - तोच तो पुर्णत काचेचा चेंडू बाहेर काढ़ला..
" वायटाचा धंदा.. फुकटाचा पैसा.. विषारी माझी मिठाई मी हाई शैतान हलवाई.!.- उर्फ मजनू मिठाईवाला..-हिहिहिही!" त्याच्या ह्या वाक्याचर
तो हातातला काचेचा चेंडू हिरवट रंगाने चमकला..
ती शुभ्र प्रकाशित सोनेरी धुळीकणांची वाफ नागमोडी वळणे घेत हवेतून खाली आली, त्या हिरव्या चेंडूत सामावली.
ती वाफ आत जाताच पुन्हा तो चेंडू काचेसारखा
पारदर्शक झाला - त्यातली ती अघोरी हिरवट नाहीशी झाली..
" हिहिहिहिहिही, आता फक्त सहा , फक्त सहा आत्मे बस्स ! मग मी मजनू मिठाईवाला कायमचंच अमर होणार , ह्या जगावर राज्य करणार मी - सर्वाँना माझ्या पायाखाली ठेवणार, हिहिहीहिहिहिहिहिहीही! "
दोन्ही हात वर करत तो गड़गडाटी हसू लागला..
पन तेवढ्यात तो जरबी , करड्या स्वरातला आवाज आला..
" ए मजनू !" ती हाक ऐकताच त्याच हसू थांबल..!
झटकन त्याने वळून मागे पाहिल. त्याच्या नजरेसमोर दहा पावळांबर समर्थ कृणाल , गबलू- मेनका उभे होते.
" कोण? कोण आहात तुम्ही..?"
मजनूच्या वाक्यावर गबलू छाती फुगवून चालत पुढे
आला.
" अरे वाह , हिच लाईन मी म्हंणणार होतो,
पण आधी तूच म्हंणालास - बर काही प्रोब्लेम नाही , एक काम कर तू ज्या ज्या मांणसांच , मुलांच आयुष्य चोरल आहेस , ते तू मुकाट्याने मुक्त कर
आणी मला क्षरण ये..!"
" हं ..हं हं ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हहह! " गबलूच्या वाक्यावर मजनू पुन्हा हसू लागला.
गबलू मात्र त्याच्याकडे न समजून कसतरीच पाहत होता.
" एं हसतो काय, खरच बोलतोय मी..! "
" अस मग ये , भर मला बाटलीत ये !"
" ए मजनूलाल , मला ऑफर देतो - मला ऑफर देतो - ते पन गबलूला , थांब - थांब आता तुला मिठाईच्या बॉक्स मध्येच भरतो..!" गबलूने अस म्हंणतच दोन्ही हाताच्या मूठी आवळल्या , डोक मारक्या बैलासारख जरास पुढे केल.. एक पाय
जमिनीवर घासला ..
माती उधळली, थेट मजनूच्या दिशेने एक जोराची धाव घेतली .
दहा - पावलांतच गबलू मजनूपाशी पोहचला ,
आणी त्याच डोक मजनूच्या पोटावर मारणार , तोच मजनू डाव्या बाजुला सरकला - तसे पुढून येणा-या गबलूच डोक धाडकन टेम्पोच्या दरवाज्यावर आदळल..
" आह्ह्ह्ह्ह!" गबलूचा विव्हळण्याचा आवाज आला. त्याच्या डोळ्यांसमोर पिवळसर चांदण्या गोल गोल भिंगू लागल्या.. व तो धाडकन जमिनीवर कोसळला.
समर्थांनी गबलूकडे पाहत नाही नाही अशी मान हळवली.
" ए कोण आहेस कोण तू ? आणि ही सर्कसमध्ये
काम करणारी मांणस घेऊन , मला मारायला आलायेस हा? हिहिहिहिहिहीहीहीहीही" मजनूच हे वाक्य ऐकून मेनकाच्या डोक्यात राग उसळला..
" ए मिठाईवाल्या तुझ्या- तर !"
" मेनका..!" मध्येच समर्थांचा आवाज आला.
" ह्याला मी पाहतो , तू शांत पणे ह्या लढ्याचा
आनंद घे ..! " समर्थ म्हंणाले.
तसे मेनकाने दात ओठ खात रागिट नजरेने मजनूकडे पाहिल-
गबलू डोक्याला हात लावत जमिनीवरुन उठला ,
चालत पुन्हा मेनकाजवळ आला.
" कृणाल ! तू ठिक आहेस ना ? नाही म्हंणजे चक्कर वगेरे येत असेल तर सांग , म्हंणजे मेनका ह्याची चाबकाने चामडी सोळेल..!" गबलू डोक चोळत , चोळत म्हंटला.
" मी एकदम ठिक आहे गबलू , तु टेंशन नको घेऊन ! फक्त तुझ तोंड़ बंद ठेव " समर्थांनी अस म्हंणतच मजनू कडे पाहिल..
" आता तू बोल , का करतोयेस हे सर्व - हे लहान , मोठ्या मांणसांच अर्ध आयुष्य चोरुन काय करणार आहेस तू ?"
" पाहायचं तुला , काय करणार आहे ते मी !"
मजनू थंड स्वरात म्हंणाला.
त्यावर समर्थांनी फक्त होकारार्थी मान ह्ळवली.
मनावर हिंमतीच पौलादी कवच बसवल..! कारण समर्थांना कळून चुकल होत - काहीतरी भयावह दृष्य पहायला मिळणार आहे..
मजनूने डाव्या हाताची हालचाल केली , लाल रंगाचा ग्लोव्हज घातलेला हात हळूच चेह-यावर लावलेल्या मास्कवर ठेवला..
गबलू मेनका दोघेही मजनूचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक झाले होते - समर्थ सुद्धा उत्सुक होतेच , पण ते रुप कस असेल ? किती कुरुप अभद्र असेल? ह्याचाच ते विचार करत होते.
मजनूने मुखवट्यावर हात ठेवला , हळुच तो मुखवटा चेह-यावरुन बाजूला काढला..
मुकवटा बाजुला सारताच मजनूच ते भयावह , भीतिप्रद अस रुप दिसल .
पुर्णत चेह-यावरची त्वचा सोळली होती,
आतल ते चौकलेटी रंगाच मांस स्पष्ट दिसत होत,
गाळांवरच्या गालफाडांतून आतले पांढरट रंगाचे ते दात दिसत होते , नाकाच्या जागी फक्त दोन रिकामे
खड्डे होते , डोळ्यांच्या जागी दोन चमकणारे हिरवट खडे बसवले होते , ज्यांत लाल रंगाचा मोहरी एवढ़ा ठिपका होता.-
नाकातून हळूच लाल रंगाच्या मुंग्या वारुळातून एक एक करत बाहेर पडाव्या तश्या बाहेर पडू लागल्या..
त्याने हातातला मास्क खाली सोडून दिला , डोक्यावरची टोपी काढली , डोक्यावर एकही केस नव्हता - तुळतूलीत डोक्याच लाल रंगाच टक्कल
होत ,
डोक्यावर ठिक ठिकाणी लहान -लहान होल होते , त्याच होलमधुन सफेद रंगाच्या वळवळत्या किडी एक एक करत वर आल्या, डोक्यावर फिरु लागल्या, तर नाकातून निघणा-या लाल रंगाच्या मुंग्या
चेह-यावर फिरत होत्या..
त्या ध्यानाला ना त्या मुंग्या चावत होत्या , नाही त्या किड्यांची किळस येत होती..
हे असल घाणेरड रुप पाहून गबलूला भोवल आली - तो जागेवरच कोसळला , मेनका -समर्थ मात्र विस्फारलेल्या नजरेने ते रुप पाहत होते..-
अमानवीय शक्तिचा हिडिस साक्षात्कार होता तो ,
अमानवीय शक्तिने जन्माला घातलेला एक नमूना ! "
"अच्छा आता कळाल तर , की तू लोकांच आयुष्य का चोरतोस ते ! तू आयुष्यमान काळ्या विज्ञेचा वापर केलायेस मजनू ! बरोबर ? आणी तूला पाहता एवढ मात्र नक्कीच कळतंय की तू फार वर्षांपासून ह्या काळ्या विज्ञेचा वापर करुन जगत आला आहेस !"
" हो बरोबर , अगदी बरोबर बोलतोयेस तू - मी गेली पाचशे वर्ष, ह्या पृथ्वीवर- मी ह्या विज्ञेमार्फत लोकांच आयुष्य चोरुन जगलो आहे , आणि आता अजुन सहा आत्मे कैदे करुन - अजुन शंभर वर्ष जगणार...हिहिहिहिहिहीही- वायटाचा धंदा.. फुकटाचा पैसा.. विषारी माझी मिठाई मी आहे शैतान हलवाई.!.- उर्फ मजनू मिठाईवाला..-हिहिहिही!"
तो पुन्हा दोन्ही हात हवेत उंचावत गडगडाटी हसू लागला ..
" नाही मजनू , गेली पाचशे वर्ष तू जे पाप केलेस ते आता शक्य नाही ! कारण आता तुझ्या वंशाचा दिवा
मी विझवणार आहे ! तुझा कायमचाच बंदोबस्त करणार आहे..! "
" वा वा वा वा वा!" मजनू मिठाईवाल्याने काळा आणी लाल रंगाचा ग्लोव्ह्ज घातलेल्या हातांनी कड कड करत टाळ्या वाजवल्या..
" काय हिरोसारखा ड़ायलॉग मारलाय वा ! खरच कोणत्यातरी पिक्चर मध्ये काम मिळायल हव होत तुला , हिरोचा रोल भेटल असत ! हिहिही!" मजनू मिठाईवाल्याच्या वाक्यावर समर्थांच्या ओठांवर एक मंद हसू उमटल होत.
त्यातच ते म्हंटले.
" मजनू पिक्चरमधले हिरो खोटी फाईट खेळतात आणी मला ख-या आयुष्यातली खरी फाईट आवडते , आता जर आपली ड़ायलॉग बाजी संपली असेल , तर थोड हात ही चालवून पाहूयात का ?"
समर्थ एका गालात हसत होते - ते हसू पाहून
मजनूचा अहंकार डिवचला ,कारण ईतक्या वर्षानंतर कोणीतरी त्याच्या जोडीचा जोड भेटला होता.
मजनूने पटकन आपला डावा हात मागे
नेहला., टिचकी वाजवली - हाताभोवती सोनेरी रंगाची धुळीकण वळवळली , हातात एक लाल रंगाचा प्लास्टिक ग्लास अवतरला -
त्या ग्लासमधून सफेद रंगाची वाफ बाहेर येत होती.
मजनूने डावा हात समोर आणला , समर्थ-मेनका दोघांनाही त्याच्या हातातला तो लाल रंगाची कव्हर असलेला ग्लास दिसला - ज्या ग्लासमधुन सफेदवाफ बाहेर येत होती..
मजनूने उजवा हात त्या ग्लासमध्ये घातला , लागलीच बाहेर काढला - त्याच्या हाताच्या चिमटीत
एक सफेद रंगाचा रसगूळला होता , ज्यातून सफेद वाफ बाहेर पडत होती..
मजनूने तो रसगूळला चेंडू फेकावा तसा समर्थांच्या दिशेने फेकला - हवेत त्या रसगूळल्याच
रंग बदल्ल , सफेद रंग जाऊन त्यावर काळ्या रंगाच विषारी आवरण चढल..
समर्थ युद्धाचा पवित्रा घेऊनच उभे होते -
त्यांना माहिती होत , केव्हा कधीही वार होईल-
युद्धाचा पवित्रा घेऊन उभ्या समर्थांना ह्याचा फायदा झाला , त्यांनी स्वत:च शरीर लागलीच दुस-या बाजुला वळवल ..
पुढून येणारा तो गोळा आला तसाच सरळ मागच्या दिशेने निघुन गेला - एका सिमेंट कोंन्क्रेटच्या भिंतीवर आदळला तसे क्षणार्धात त्या भिंतीच्या ठिक-या उडाल्या , लहान-लहान तुकडे झाले..
" हट्ट,बज गया ससुरा..! पर अगला वार नाई बचेगा ..!" मजनूने पुन्हा त्या लाल प्लास्टीकच्या ग्लासात हात घातला ..
ह्यावेळेस त्याने वाफाळती बर्फी काढली!
" आवा आवा समर्थ बर्फी खावा..हिहिहिह!"
मजनूने बर्फी समर्थांच्या दिशेने फेकली - हवेतच त्या बर्फाचे रुपांतर एका बाणात झाल , ज्या बाणाची पात सुईसारखी धारधार होती..
त्या बाणाच्या पातीवर सोनेरी रंगाचा एक ठिपका चमक होता , ज्यात विष होत.
त्या बाणाचा वेग ईतका अफाट होता , की समर्थांना आपली शक्ति वापरायलाही वेळ मिळाला नाही , शेवटी समर्थांनी हा वार सुद्धा मोठ्या चालाखीने
चुकवला - आपल सर्व शरीर त्यांनी एक उडी घेत उजव्या बाजुला झेपावल ,आणी पुढुन येणारा तो बाण थेट आला तसा पुढे जात एका झाडाच्या खोडात रुतला..
तसं ते हिरवगार झाड क्षणार्धात कोमजल, पान- फांद्या सुकळ्या गेल्या, झाडाची मुळ मेली जात झाड म्हातार झाल..
" शट शट, ससूरा का मेंढक का तरह उछल रहा है बे बारबार, सासूर का नाती , थांब तुला चखवतो..!" मजनूने त्या वाफाळत्या लाल रंगाच्या प्लास्टीकच्या ग्लासात हात घातला..
" का घालू, का घालू- काय चखवू आता , मोतीचूर के लाडू, की जलेबीबाई की जलेबी , की पाकीस्तान का गुलाब जामून..!" मजनू ग्लासात खोलपर्यंत हात घालत काही मिळत का ते पाहत होता .
तोच समर्थांना वेळ मिळाला..- ते पटकन जागेवरुन उठले , उजव्या हातातला एक रुद्राक्ष कडा काढून हातात घेतला..
" मजनू..!" समर्थांनी मजनूला हाक दिली.
" का बे?"
" तू दुस-यांना खुप मिठाई खाऊ घालतोस ना ? मग आज मी तुला फरसाण खाऊ घालतो , चकली..!."
" फरसाण? चकली..?" मजनूने न समजून समर्थांकडे पाहिल , आण तेवढ्यातच समर्थांनी हातातला रुद्राक्ष कडा भिंगरीसारखा त्याच्या दिशेने सोडला..
पाच रूद्राक्ष असलेला तो कडा, त्या पाचही रुद्राक्षांनी हवेत विस्तवासारख पेट घेतल , त्यामधून ठिंणग्या बाहेर पडू लागल्या ,
गोल गोल भिंगत रुद्राक्ष कड्याने मजनूच अंतर
दोन सेकंदात गाठल, आणी त्याच्या हातात असलेल्या
त्या लाल रंगाच्या कव्हरच्या ग्लासला मधोमधून फाडत , त्याच्या छाताडातून आरपार होत , मागे निघुन गेला , व मागून एक गोळ वळण घेत पुन्हा समर्थांकडे आला समर्थांनी एका हातात तो रुद्राक्ष पकडला..
पुन्हा आपल्या हातात घातला..
व मजनूकडे पाहिल.
त्या हैवानाच सर्व शरीर पायाच्या खालच्या
नखापासून हळू हळू काळसर पडत चालल होत ,
जीन्स पेंट, टी- शर्ट , हात - पाय डोक सर्व शरीर राखेत रुपांतर झाल ..
तसे समर्थांनी उजव्या हाताचा तळवा सरळ धरला .
" घनशोषक प्रगटम..!"
समर्थांच्या हातावर निळसर रंगाने ऊजळलेला घनआकाराचा घनशोषक अवतरला -
" ए ..ए तू हे काय केलंस मला, काय काय केलंस हे! मा माझ अंग काळ का पडल.?"
मजनूने आपल सर्वशरीराकडे पाहिल..
" तुझी वेळ झालीये मजनू , हाच तुझा अंत आहे .!"
समर्थांनी घनशोषक असलेला हात जरासा वर धरला , तसे मजनूच्या सर्व शरीराची राख झाली - मजनूच्या देहाची राख होताच - त्याच्या राखेतून तो काचेचा गोल चेंडू खाली पडला व ती राख हवेत सापासारखी वळवलत घनशोषकाच्या दिशेने आली आत घुसली-...
I वैराणघाटीची चेटकीण
IIIमौलाना
vi आंबेवाडीचा भोजा
vii मजनू मिठाईवाला
घनशोषकावर लिस्ट अपडेट झाली होती.
समर्थ त्याच लिस्टला पाहत होते.
मेनका मजनू जिथे उभा होता - तिथे चालत आली, तिने खाली पडलेला तो काचेचा चेंडू उचल्ला..
" समर्थ ह्याच काय करायचं? "
" त्याच , त्याला फोडुन टाक- म्हंणजे ज्या ज्या मांणसाच आयुष्य कैद आहे , ते मुक्त होऊन पून्हा त्यांच्या शरीरात जाईल!" समर्थांच्या वाक्यावर मेनकाने तो काचेचा गोळा जमिनीवर आपटला..- तसे एक फटाका फुटल्यासारखा आवाज झाला..
त्या फुटलेल्या काचेच्या चेंडूमधून ती कैद असलेली आयुष्य वाफ मुक्त झाली, हवेतून उडत ज्या ज्या मांणसांच आयुष्य चोरल गेल होत - ते आयुष्य सर्वाँना पुन्हा मिळाल..
लहान मुल जी म्हातारी झाली होती, ती पुन्हा लहान झाली, आणी जी मोठी मांणस लहान झाली होती, ती पुन्हा मोठी झाली..
जस की घनश्यामशेठ व त्यांची पत्नी.
काहीवेळाने :
गबलूने डोळे उघड़ले तो बेशुद्धीतून परत आला होता.
" कुठे आहे? कुठे आहे ? तो मजनूचा बच्चा..! मी काय सोडत नाही त्याला हरामखोर!"
" ए हाफ तिकीट जरा ईजी ईजी, पाहिलं कस मारतोस ते "
मेनकाचा आवाज..आला तसा गबलू मूग गिळून गप्प बसला..
" समर्थांनी मजनूला कैद केलंय ,चल आता तू तोंड गोड कर हे घे मिठाई...!" मेनकाने पेढ्यांचा बॉक्स गबलू पुढे धरला..
" मिठाई हिहिहिही!" गबलू दात काढत हसला , पन अचानक त्याच हसू ओसरल.." ए मेनका ही मिठाई कुठून आणली!" :
" मजनूमिठाईवाल्याकडून !" मेनकाने डोळे मोठे केले तसा गबलू घाबरला..
" औह कमॉन गबलू , जस्ट जोकिंग ! ही तर कृष्णालालची मिठाई आहे -!" तीने एक पेढ़ा उचलून तोंडात टाकत खाल्ला.. व म्हंणाली.
" काही झालं ? नाही ना मग खा..!"
" हिहिहिह!" गबलूने दात विचकत पुर्णत बॉक्सच हिसकावून घेतला.. व दूर पळाला..
" हा नाही सुधारणार , बदमाश !"
मेनकाने अस म्हंणतच आपल्यासर्वाँकडे पाहिल..
व म्हंटली.
" तुम्ही सुद्धा मिठाई खा ! पन जरा कमी, कारन मिठाई स्वस्थ के लिये हानिकारक होती हे !"
Mh
समाप्त :