Samarth Aani Bhoote - 9 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | समर्थ आणि भुते - भाग 9

Featured Books
Categories
Share

समर्थ आणि भुते - भाग 9

कालघाटी  : येहूधीज तलघर .. चारही दिशेना कालोखी अंधकार पसरला होता .. - मध्येच आकाशात चंदेरी रंगाची बिन आवाजाची   विज कडकडायची ,  तसा काळोख भेसूरपणे ऊजळून निघत होता - आणि अंधारात लपलेल आजुबाजुच दृष्य नजरेस पडत होत -       तीस - चाळीस फुट उंचीच्या काळ्याशार पाषाणी टेकड्या ,  खालची काळ्या वाळूची जमिन -          खाली जमिनीवर पसरलेल्या   काळ्या वाळूवरुन  तो काळ्या रंगाचा फेंगड्या , वाकलेल्या टोकदार विषारी डंखाचा विंचू  हळकेच पुढे पुढे चालत जात होता-           अचानक त्या विंचूच्या अवतीभवतीची जमिन भुकंप आल्यासारख कंपन पावू लागली, आजूबाजूचे दगड गोटे थरथर करत थर थरु लागले , व पुढच्याक्षणाला भुर्र्रर्र असा इंजिनचा आवाज आला,  विंचवापासून दूर दोन फुट हवेत दहा पावळांवर दोन चंदेरी हेडलाईटचा प्रकाश पेटला जात त्या विंचवावर  पडला , व वेगान त्या हेडलाईट पुढे येत - एक काळ्या रंगाचा चकचकीत टायर      विंचवाच्या अंगावरुन , त्याच्या देहाचा चेंदा -मेंदा करत पुढे निघुन गेला...      त्या काळ्या रंगाचा   गाडीचा  डाव्या बाजूचा दरवाजा दिसत होता -  दरवाज्याची काच उघडी होती , उघड्या दरवाज्याच्या खिडकीवर एक डावा हात ठेवलेला दिसत होता -           तो जय होता , तर त्याच्या डाव्या बाजुला ड्राईव्हर सीटवर y2J  उर्फ युटुज बसला होता.-       गाडीच्या मागच्या सीटवर तिघेजण बसले होते -  मधोमध समर्थ होते - तर त्यांच्या डाव्या बाजुला मार्शल होता , त्याच्या गेजेट वॉचमध्ये  तोंड  घालुन  बसला होता -  मध्ये  डाव्या हाताने स्क्रीनवर टच करत होता - तसा आतून टिक टिक करत आवाज निघायचं..!       समर्थांच्या उजव्या बाजुला  तृप्तेश बसला होता - त्याने आपली चंदेरी रंगाची ऑल्ड मॉडल रिवॉलव्हर बाहेर काढली होती..        त्याने बंदूकीचे सहा चेंबर , उर्फ मेगझीन बाहेर काढले - मंग एक डावा डोळा बंद करुन - हळूच त्या चेंबरमध्ये उजव्या हातात असलेल्या सहा गोळ्या भरल्या , मग हळूच तो चेंबर पुन्हा ब्ंदूकीत घातला..-  व ती बंदुक कंबरेत खोवली..         समर्थांनी एकवेळ आपल्या दोन्ही हातातल्या रूद्राक्ष कड्यांकडे पाहिलं - व हळूच दोन्ही हातांच्या मुठी गच्च आवळल्या - दोन्ही डोळे बंद केले..                  मित्रांनो समर्थ कृनाल आणि त्यांचे रक्षक आज , त्यांच्यातल्याच एका रक्षकास वाचवायला निघाले आहेत ,  कारण समर्थांच्यारक्षकाच एका हैवानाने अपहरण केलं आहे , त्याला वाचवण्याकरीताच समर्थ आणी त्यांचे रक्षक निघाले आहेत एका मिशनवर , चला तर मंग आपण सुद्धा त्यांच्या बरोबर जाऊयात..- लेटस गो जर्नी विथ समर्थ कृणाल..                गाडी  त्या वाळूच्या रस्त्यावरुन , चंदेरी हेडलाईटच्या उजेडात वेगान पुढे पुढे जात होती - कधी रस्ता उजव्या बाजूला वळण घेत असे , तर कधी नागमोडी वळण यायचा ,  तर कधी उतरण ,  तर कधी चढण-         चारही दिशेना एक सुनसान सन्नाटा होता - फक्त गाडीचा इंजिनचा घरघराट वाजत होता - दूर दूर पर्यंत एक विलक्षण शांतता पसरली होती ,ईथे ना रातकीडे होते , नाही पशू- पक्षी , ईथे फक्त विषारी जीव होते..-  साप ,विंचू , बरेच..         गाडी जरा वेळाने करकचून ब्रेक मारत एका जागी थांबली- सर्वांनी y2j  उर्फ युटुजकडे पाहिलं -  त्याची नजर विन्डशील्डमधून पुढे पाहत होती.          सर्वाँनी  सुद्धा हळुच आप-आपल्या माना पुढे वळवल्या - गाडीचा चंदेरी हेडलाईटचा प्रकाश पुढे पडत होता -         आणि त्याच प्रकाशात काळ्या रंगाचा पुढे गेलेला वाळूचा रस्ता दिसत होता ,  त्याच प्रकाशात रस्त्याच्या उजव्या बाजुला एक  चार फुट  लोखंडी  सळई जमिनीत खोवलेला -  त्यावर चौकोनी पत्रा , असा एक  फळा दिसत होता - ज्यावर लिहिलं होत - येहूधीज प्रॉपर्टी डू नॉट एंटर -  त्या नावाखाली एक हसणारी मानवी कवटी चित्तारली होती - कवटीच्या खाली दोन गुणाकार चिन्ह होते.                   " गाडी का थांबवली !"   तृप्तेशने विचारलं .          " हा बोर्ड पाहिला ने , ईथून पुढे कोणालाच एंट्री नसते ने , तुम्हा चौघांना पायीच जाव लागेल  ने , ईथून  वीस मिनिटांच्या अंतरावर येहूधीचा तळघर आहे !" युटुज बोलत होता.          " पन तलघर तर खाली असेल  ना ? मग ओळखून कस येईल!" जयने युटुज कडे पाहिलं.          त्यावर युटुजने जयकडे पाहिलं व म्हंणाला.        " वीस मिनिटांवर पोहचताच , पाच सहा  खविस टाईप बॉडीगार्ड एका दरवाज्याजवळ गस्त घालताना दिसतील ने , तोच येहूधीच तलघराचा अड्डा असेल..ने!" युटुज म्हंटला.         जयने फक्त होकारार्थी मान हळवली.        " ठिक आहे  , धन्यवाद.!" जयने  युटुजशी हात मिळवणी केली..-           मागचा उजव्या - आणि डाव्या बाजूचा दरवाजा उघडला गेला - मार्शल - तृप्तेश , मग शेवटला समर्थ असे तिघेही बाहेर पडले..-                जयही  युटुजशी काहीतरी चर्चा करुम बाहेर आला , युटुज अद्याप गाडी थांबवून तिथेच उपस्थित होता.. - हळूच त्याने आपल्या बाजूचा दरवाजा झप आवाज करत उघडला ,  बाहेर येऊन दरवाज्याबाजुलाच उभा राहिला..        हे  चारही जण वर्तुळाकारात उभे होते -    तोच जयने बोलायला सुरुवात केली.         "  सर्वकाही ईतक अचानक घडलं आहे , की आपल्याला प्लानींग करिता वेळ मिळाला नाही ,  म्हंणूनच सर्वाँनी सोबतच रहायचं आहे..! कारण आपण सर्व शत्रुच्या छावणीत अजाणतेने घुसत आहोत - कधी ? कोणत्याक्षणी काय घडेल ? काहीही सांगता येत नाही , आता जिवंत आहोत , तर पुढच्याक्षणाला मृत असू.!" जयने एक धारधार कटाक्ष सर्वाँवर टाकला -  तृप्तेशची जयच भाषण ऐकून टर्रकन फाटली होती , परंतू भीतीसहितच  , जयच्या शब्दांनी मनात एक हिंम्मत पेरली जात होती.           "जर कोणालाही युद्धात शामिल व्हायचं नसेल ,  जिव वाचवा वाचवायचं असेल , तर त्याने आताच माघार घ्यावी ,  युटुज सोबत गाडीमार्फत कालघाटीत परताव ,  आणि आमची परत येण्याची वाट पाहावी.! " जयने - एक एक करत समर्थ, मार्शल, तृप्तेशकडे पाहिलं..         तोच तृप्तेशने एक आवंढा गिळला..-   व तो हळूच माघारी वळला , मार्शल, समर्थ- जय  शुन्यभावहिंत चेह-याने त्याच्याकडे पाहत होते..       तृप्तेश चालत चालत युटुजपाशी आला -          " तुम्ही वापस येणार .?" युटुज दात दाखवत हसत म्हंणाला.         तोच तृप्तेशने उजव्या हाताची मुठ आवळली-  व एक  वेगवान बुक्की युटुजच्या थोबाडात मारली, वेग ईतका पावरफुल, शक्तिशाली होता..- की युटुज धप्प आवाज करत जमिन दोस्त झाला..          तृप्तेश पुन्हा चालत ह्या तिघांपाशी आला - त्याच्या चेह-यावर एक प्रसन्न भाव झळकत होता , जस की कोणत्यातरी त्रासातून मुक्त झाला आहे.. ! मनाला सळत असलेली गोष्ट त्याने पुर्ण केली आहे.         जय, मार्शल, न समजून  तृप्तेशला पाहत होते..!         समर्थांच्या चेह-यावर मात्र दबक  हसू होत - त्यांना कळाल होत तृप्तेशने युटुजच्या थोबाडात का लगावली ते.!                    " तू येतोयस ?" मार्शल..        " हा मंग , मला काय धाड़ भरले.!" तृप्तेश.          " चला , निघूयात..!" समर्थ नाही नाही अशी मान हलवत जरासे मंद स्मित हसतच म्हंटले..       सर्वात पुढे ते एकटेच चालत जाऊ लागले - त्यांच्या मागून मार्शल , जय- व तृप्तेश चालत जात होते..         त्या तिघांच्याही पुढे पुढे जाणा-या आकृत्या दिसत होत्या - व ते शब्द ऐकू येत होते..        "  मला वाटलं तू घाबरलास रे तुप्या..!" जय.        " नाय भो , आपण कधी कुणालाच नाय घाबरत - उंदीर , साप, झूरळ , वाघ , सिंह..- आपण कुणालाच नाय घाबरत..!"  तृप्तेशचा आवाज.         "  अच्छा , पण त्या टकलू ओनिडा  युटुजला का फोडलं ! " जयचा आवाज.         " सांगतो , सांगतो - अजुन तर लय रस्ता पार करायचं आहे ,  वाटेत सांगतो चला. !" तृप्तेश म्हंणाला..         हळू हळु पुढे जात  त्या चौघांच्या आकृत्या अंधाराने गिळुन टाकल्या..         मागे युटुज गाडीच्या दरवाज्याचा आधार घेत उभा राहीला,  तृप्तेशच्या एका बुक्कीने त्याला रात्रीत सुर्याचा उजेड़ दाखवला होता , पण त्याला एक कळाल नव्हत.     "  साला त्या पोराने मला मारलं  तर  मारल का ?  साला बडे खतरनाक लोक है..! "  युटुज त्याचा सूजून काळा निळा पडलेला गाल चोळत स्वत:शीच म्हंटला..                                              काळ्या पाषाणाचे  एकूण चार गोलमटोल दगड़ दिसत होते , हळूच एक-  एक करत त्या  दगडावरुन  चार डोकी वर आली..-       सर्वात प्रथम उजव्या दिशेला मार्शल होता , मार्शलच्या बाजुला समर्थ होते , त्यांच्याही बाजुला ,  तृप्तेश होता-  तर सर्वात शेवटी डाव्या बाजुला जय ...          हे तिघेही  पुढे पाहत होते - त्या तिघांच्याही नजरेला  ,आपल्यापासून साठ मीटर अंतर दूर  ...        एकूण तीन  हळत्या आकृत्या उभ्या  दिसत होत्या .- या पाहुयात कोणाच्या आहेत त्या आकृत्या ? चला तर !         पाषाणी दगडांचा एक  पंधरा फुट उंच , आणि दहा फुट रुंद असा भगदाड़  होल दिसत होता  - त्या होलच्या आत गहिरा खोल खोल घेउन जाणारा अंधार दिसला जात बाजुलाच एक लाकडी पिवळ्या रंगाचा फळा गाडला होता , ज्यावर काळ्या अक्षरांत नाव लिहिलं होत , कैवार तलघर..      त्या भल्यामोठ्ठया भगदाडा बाहेर , एकूण तीन खविस  , पहारा देत होते -        त्या तिघांचीही शरीर उंचीने  सहा फुट राकट, आड़दांड होती -  , पुर्णत शरीराची कातडी काळ्या रंगाची - खाली सफेद धोतर सोडलं तर  सर्व शरीर उघड - नागड़  होत.       डोक्यावर टक्कल होती , काळ्या चकचकीत तोंडावर , भरदार दोन दोन महिन्याच्या मिश्या होत्या , डोळ्यांच्या कवड्या अंधारात विस्तवासारख्या चकाकतांना दिसत होता , डोळ्यांवर पिकलेल्या सफेद रंगाच्या भुवया होत्या , आत किड लागलेले  - चौकलेटी रंगाचे दात होते.-          गळ्यात सोन्याच्या चैनी घातल्या होत्या - ज्या त्यांच्या काळ्या कातडीच्या देहावर चमक होत्या.        दोन खविस त्या पाषाणी गुहेच्या तोंडाबाहेर एक ड़ावीकडे , तर दुसरा उजवीकडे  असे उभे होते -         दोघांच्या हाती  शस्त्र म्हंणून  एक चौकलेटी रंगाच दंडगोळ साडे तीन फुट उंचीच   लाकूड होत , त्या लाकडाच्या मधोमध एक टोकदार पाषाणी दगड अटकवला होता -         जर का त्या  लाकडाला असलेला पाषाणी काटा कुणाच्या अंगावर मारला , तर थेट कातडी, मांस , हाड़ फोडून ते टोक बाहेर निघेल अशी त्यांना धार होती -          एका फटक्यात समोरचा शत्रु गतप्राण व्हायची  मोठी चान्स होती.     त्या दोघांकडे एकाच टाईपेचे शस्त्र होते.      त्या दोघांपासून जरा दूर तीसरा खविस उभा होता , दिसायला हा सूद्धा त्या दोघांसारखाच होता ,  परंतू त्याच्यात जरा दोन वेगळे बदल होते -         प्रथम ह्या खविसाला दोन डोळे नसून कपाळावर एकच बेडकासारख्या तपकीरी रंगाच्या बुभळाचा डोळा  होता , जो अंधारात चमकत होता ,-  त्याच्या  हातात कोणतेही शस्त्र नव्हते - परंतू  , बाकीच्या खविस हैवानांप्रमाणे  ह्या खविसाला दोन हात नसून  चार हात होते..         " बाबोव , हे खविस  कमी  बॉन्सटर( मॉन्सटर) जास्त वाटत आहेत ."  तृप्तेशने आश्चर्य, भय, नवल असे भाव चेह-यावर  ठेवत हे वाक्य उच्चारलं ..          त्याची ती हाई क्वालीटीची इंग्लिश भाषा ऐकून , मार्शल -जय दोघांचे मेंदू फ्रेक्चर झाले..        "  ए इंग्लिश पुराणची टपरी , मराठीतच भुंकना  , काय  भुंकतोस ते कशाला उगीचंच इंग्लिशची आई माय काढतो.!" जय तृप्तेशवर खेकसत म्हंणाला.           ईथे परिस्थिती गंभीर असतांना ह्या , ह्या गाढवाला जोक सुचत होते - पागल साला !         त्यावर तृप्तेशने जिभळ्या चाटत लागलीच मराठीत बोलायला सुरुवात केली..         "ओके, ओके ब्रदर आय डान्ट स्किप  इंग्लिश - पुढे  काय करायचं आता ? ह्या तिघांसोबत फाईट करायची का ? " तृप्तेश पुन्हा  इंग्रजीची वाट लावत म्हंटला - खर तर स्किपच्या ऐवजी त्याला स्पिक म्हंणायच्ं होत ना ? असो घ्या संभाळून !         तृप्तेश च्या वाक्यावर जयने  फक्त कपाळ चोळलं ...          " ह्या तिघांना चुकवून आत जायच्ं ? " मार्शलने मनातला विचार व्यक्त केला.         " आर यू शूअर मार्शल ,  ह्या तृप्तेशला अक्कल नाही , पण तुम्ही सुद्धा ! ही तिन्ही खविसांची नजर चुकवून जायला ते  तिघे काय लॉलीपॉप , चॉकलेट च्या आमिषाला भुलतिल अशी लहान मुल आहेत का?" जय जरा वैतागून.. म्हंटला.        " हिहिहिह, फिफिफी!" तृप्तेश मध्येच निर्लज्जा सारखा हसला.          जयने त्याला  कोकिळा मोदीसारख डोळे वटारुण पाहिलं , फक्त काजळ घालायचं वेगळ होत..         ती कोकिळा मोदीची नजर पाहून  तृप्तेश अहमसारखा गार झाला.!     जय तिखट नजरेनेच पाचसेकंद त्याच्याकडे पुतला होऊन पाहतच होता.        " जोक मारलं मी!" जयने हळू आवाजात विचारलं. त्यावर तृप्तेशने फक्त नाही नाही अशी मान हळवली.           " माझ्याकडे  एक युक्ति आहे..!" ईतकं वेळ शांत असलेल्या समर्थांचा आवाज आला.-  एक एक करत जय, तृप्त, मार्शल तिघांच्या नजरा समर्थांवर खिळल्या        समर्थ कृनाल ,मार्शल, जय - तृप्तेश तिघेही गोळाकार वर्तुळाकारात उभे होते -   मार्शल, जय - तृप्तेश तिघांचही लक्ष समर्थांवर  होत -      ह्या चौघांच्याही डाव्या बाजुला म्हंणजे पुढे चार पाषाणी गोळाकार दगड होते.  ज्या पाषाणी दगडांमुळे ह्या सर्वाँना ते खविस पाहू शकणार नव्हते.        " सांगा समर्थ काय युक्ति आहे तुमच्याकडे?"  जय उच्चारला.         " येस येस व्हॉट अन आईडीया सेटजी ?"   तृप्तेश दात काढत उच्चारला ,  त्याने त्याच बत्तीशी विचकत्या हसत्या तोंडासहित समर्थ कृनाल ,मार्शल, जयकडे पाहिलं ..      जयचा चेहरा जरा राकट झालेला दिसत होता , समर्थ - मार्शल सुद्धा कसेतरीच त्याच्याकडे पाहत होते.        " तुप्या  ! "  जयने तृप्तेशचे गाल दोन्ही हातांत पकडले प्रेमळ स्वरात बोलू लागला ;   " तुला परिस्थीतीच गांभीर्य कळतं का रे बाळ ? नसेल  कळंत ना , तर तुझी बंदूक दाखवतो  का जरा !  "  शेवटच्या वाक्यावर जयचा चेहरा  पुन्हा रागीट झाला -  डाव्या बाजूचा ओठ जरा वर नेहत, मग उजवी भुवई वर करत  त्याने जेठालाल कडे चंपकलाल चाचा पाहतो तस त्याच्याकडे पाहिलं..         त्यावर तृप्तेशने हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं , एक हात  मागे  नेहत कंबरेला खोवळेल्या त्याच्या बंदुकीला अजुन आत खोवल -  काय माहिती जयची सटकली आणि त्याने आपल्याला हेडशॉट दिलं तर ? ही भीती त्याला लागून राहीली  होती.!          "  समर्थ सांगा तुम्ही   !" मार्शल म्हंटला.     त्यावर समर्थ बोलू लागले.       "  माझी युक्ति अशी आहे !" अस म्हंणतच समर्थांनी त्यांच्या भगव्या रंगाच्या सद-याच्या खिशातून एक सीरीज उर्फ सुई बाहेर काढली, त्या सुईवर इंग्रजी आंकड्यात एक नाव होत -   ' D10 -30m'         D म्हंणजे ड्रेक्युला, 30m म्हंणजे तीस मिनिटाकरीता सीरीज टोचून घेणारा तीस मिनिटांकरीता ड्रेक्युलामध्ये रुपांतरीत होणार होता.          " ही तर तीच इंजेक्शन आहे  ना समर्थ ? जी अजमेरा कॉम्पलेक्स मध्ये  पिशाच्छ बनून घुसण्याकरीता आपण वापरली होती!" तृप्तेश हाताची घडी सोडत उच्चारला.         " होय अगदी बरोबर , आणि हिच इंजेक्शन आपल्याला येहूधीच्या तलघरात प्रवेश मिळवून देईल !" समर्थांनी एक एक करत ह्या तिघांकडे पाहिलं - तिघांच्याही चेह-यावर असमंजस , न समजल्यासारखे भाव पसरले होते..         " म्हंणजे समर्थ?" जयने न समजून विचारलं.         "   म्हंणजे , आपल्यातला कोणितरी  ही इंजेक्शन टोचून पिशाच्छ बनेल, आणी  उर्वरित तिघांना कैदी बनवून त्या तलघराआत  घेऊन जाईल, ज्याने  त्या खविसाना ही संशय येणार नाही !" समर्थ थोडक्यात त्यांची युक्ति कळवत उच्चारले.               " व्वा बॉस वा!" तृप्तेशने दोन्ही हाताच्या टाळ्या वाजवल्या पुढे बोलू लागला.            " समर्थ खर तर तुम्ही युक्ति थोडक्यात सांगितली आहे , पण आम्हाला कळली आहे - पण तो  सुई टोचवून घेणारा शक्तिमान कोण आहे? .!"   तृप्तेश दात काढत एक एक करत मार्शल, जय- समर्थांकडे पाहत होता..         आणि ते सर्वजण तृप्तेशकडे..- तोच जय मार्शल दोघांनी एकमेकांकडे पाहिल -  व एका गालात हसले..         तृप्तेशच  मात्र ते हसू पाहून चेहरा उतरला ..        " भेंडी ,  भेटला बकरा !"तृप्तेश  पुटपुटला..               xxxxxxसीन 2        xxxxxx     ते तिघेही खविस हातात शस्त्र घेऊन पहारा देत उभे होते - त्यांच्या लाळेलाल नजर सताड उघड्या अंधाराला चिरत समोर पाहत होत्या..        तोच त्या नजरेला अंधारातून चार काल्या सावल्या पुढे - पुढे येतांना दिसल्या -          सर्वात प्रथम सावली - पुढे होती - तर उर्वरित तीन सावल्या मागे - खांदे वाकवून , दोन्ही हात बांधलेल्या अवस्थेत   चालत होत्या -          " सावधान खविस हो , कोणीतरी येत आहे , सावधान..!" त्या तिघांमधला चार हात असलेला , तोंडावर एक डोळा असलेला तो खविस आपल्या भसाड्या आवाजात उद्दारला..  त्याच्या त्या वाक्यासहित बाकीचे उर्वरित दोन खविस हातातल्या शस्त्रांना गच्च पकडत उभे राहिले..          हळू हळु दूर असलेल्या त्या  काळ्या चार सावल्या  ह्या तिघांपाशी चालत आल्या -         आता त्या चार सावल्या कोण हे वेगळ सांगायलाच नको, प्रथम  तृप्तेश उभा होता - त्याने D10 घेतल्याने  त्याच सर्व शरीर पिशाच्छात बदल्ल होत ..         सर्व शरीराची कातडी प्रेताड़ पांढरी पडली होती , डोळयांतली बुभळे पांढरी - त्यात काळ्या मीरीचा लहानसर ठिपकामय बाहुल्या होत्या..- तोंडातला जबडा सुजला होता , त्यात ते पिशाच्छी दंत होते..   कान सश्यासारखे मोठे झाले होते..-   हाता -पायाची नख वाढली होती , अंगातून थंडगार वाफ़ बाहेर येत होती.       तृप्तेशच्या मागे  उजव्या हाताला समर्थ उभे होते , डाव्या बाजुला मार्शल होता ,  तर मधोमध जय होता..         ह्या तिघांच्याही हातांना एकजूट करुन दो-या बांधल्या होत्या , व त्या दो-यांचे पुढचे टोक तृप्तेशने धरले होते..      तृप्तेशच्या पुढे ते तीन खविस उभे होते -     त्यातला तो एक डोळ्याचा - चार हातांचा खविस मधोमध तृप्तेशची वाट अडवून उभा होता..         " कोण आहात तुम्ही ? ईथं काय करताय  ?" तो खविस आपल्या खर्जातल्या आवाजात म्हंटला..-        त्याच ते काळकुट्ट रंगाच राकीट देह, विस्तवी लाल धगधगते डोळे, आणि तो घोगरा आवाज ऐकून तृप्तेश जागीच गार झाला होता - भीतीने त्याचे अवसानच गळाले , बोबडीच बंद झाली होती..           पुतळा होऊन तो एकटक त्याच्या त्या दुधाळ बुभळांनी त्या तिघांना पाहत होता.       तोच जयला कळून चुकलं , हा तृप्तेश घाबरला गेला आहे , जर भीतीपोटी ह्याने काही अनाप-शनाप भुंकल तर  वाट लागेल..       " ह्यांनी आम्हाला पकडलं आहे !" मागून जय पटकन म्हंटला.          तसा त्या खविसाने एक कटाक्ष जयवर टाकला - त्याला खालून वर पर्यंत नेहाळलं.         " तू  माणुस दिसतो आहेस ? " त्या खविसाने संशयित नजरेने समर्थ, मार्शलकडे पाहिलं -  " तूम्ही  तिघे तर मांणस दिसत आहात ..! "  तो खविस आपल्या खर्जातल्या आवाजात म्हंटला.         " होय आम्ही मांणस आहोत  , आणि ह्या पिशाच्छाने आम्हाला पकडलं आहे..!" जयने समोर उभ्या तृप्तेशकडे ईशारा केला..         तसा त्या खविसाने तृप्तेशकडे पाहिलं , त्याचा पांढरा चेहरा  भीतीपोटी अजुनच पांढरा झाला होता - तोच तृप्तेशने मलूळ अस दात विचकत हास्य केलं.   त्याच्या तोंडातले पिशाच्छी दंत दिसले.!        "  तू पकडलंस ह्या तिघांना ?" त्या खविसाने आपल्या एका डोळ्याने तृप्तेशकडे पाहिलं - त्याची ती तपकीरी बेड़की नजर पाहून तृप्तेशची पावळ लटालटा कापू लागली..        " हो ह्यांनीच पकडलं आहे आम्हाला.!" जय पुन्हा मध्ये येत बाजू सारवत म्हंटला.         तोच त्या खविसाने जयकडे पाहिलं.        " ए गप्प ए क्षुद्र मानवा , तुला विचारत नाहीये मी ,  म्हंणूनच  मध्ये मध्ये बोलू नकोस- मी ह्या पिशाच्छाला विचारतो आहे - सांग रे ?" तो खविस  जयवर खेकसत ओरड़ला.         जय हळुच तृप्तेशच्या मागे आला , त्याच्या पाठिजवळ येऊन त्याने हळू आवाजात म्हंटलं .         " तुप्या बोल , बोल नाहीतर संशय येईल ह्या तिघांना !"          " हो , हो - आहा आहा..!"   तृप्तेशने मान हळवली-  घसा खाकरला..         " मी!" तृप्तेशच्या घश्यातून आवाज म्हंणुन फक्त हवा निघाली  होती.         " हं ?" त्या खविसाने न समजून हूंकार भरला.         " मी , मी..मीच  पकड़लं आहे ह्या तिघांना !" तृप्तेशने कसतरी धीर एकवटला व उच्चारला.         " कोणासाठी पकडलं आहे ? आणि कशाकरीता.!"  त्या खविसाने विचारलं.         " कोणासाठी ? कशारीता ?" तृप्तेशने वाक्य रिपिट केलं .          " उत्तर दे प्रश्ण मी विचारलं आहे.?" खविस.      जय पुन्हा तृप्तेशच्या मागे आला .. -         " मालकाला रे गाढवा , त्या विक्रालसाठी आणलेत सांग - हे तिघे खाद्य म्हंणून!" जय.           " हो , हो -!" तृप्तेशने हसत नंदी बैलासारखी मान हळवली- " विक्रालच्या मालकिणीसाठी आणलेत - हे तिघे खाद्य म्हंणून.!" तृप्तेश पटकन हसत म्हंटला.          परंतू लागलीच त्याच्या ओळखीत ती चुकही आलीच..- विक्राल मालकासाठी  खाद्य आणले  आहेत - अस बोलायचं होत , परंतू त्याने वाक्याची  रचनाच बदल्ली होती.         त्याच ते वाक्य ऐकून जयने तर उजवा हात कपाळावर मारुन घेतला , संपल सगळ मनोमन म्हंटलं.        परंतू घडलं ते वेगळंच - तो मधला खविस तृप्तेशच्या वाटेतून बाजू झाला.       " कंतनिया मालकिणीसाठी आणल आहे तर भोजन..-!"तो खविस म्हंणाला.         त्यावर तृप्तेशने जरा विचार करत म्हंटलं -             " कोण कंतनिया ?"       तृप्तेश जस हे वाक्य म्हंणाला.          जयने मागून  एक उजव्या पायाची लाथ त्याच्या बमवर मारली..         " आ ssssss s आठवलं, आठवलं.. !"तृप्तेशने  चेह-यावर आलेले वेदनेचे भाव लपवले..          " चला , चला रे मालकिणीला भुक लागली असेल - चला आत चला..!"  तृप्तेश ह्या तिघांना  - त्या पाषाणी गुहेच्या दिशेने ओढ़त घेऊन आत निघुन  गेला..        xxxxxxxxx          xxxxxxx                  त्या गुहेसारख्या पाषाणी भगदाडातून आत शिरताच , खाली जाणा-या  पाय -या लागत होत्या - त्याच पाय-यांवरुण सर्वात प्रथम तृप्तेश , मग जय,  तृतीय मार्शल आणी सर्वात शेवटी समर्थ असे चौघेजण चालत त्या पाय-या उतरत होते.            मोजून वीस पाय-या होत्या त्या, शेवटची पायरी उतरुन सर्वजन खाली आले , खाली पाषाणी जमिन होती ,  तर ह्या सर्वाँच्या पुढे दोन मांणस चालत जातील , एवढा गल्ली वजा बोळ  होता - त्या बोळाच्या दोन्ही बाजुला पाषाणी आठफुट उंचीच्या भिंत होत्या , आणि वर पाषाणी छप्पर ..-          त्या दोन्ही भिंतींवर  दहा हातांच अंतर सोडून तपकीरी  रंगाच्या खुपसा -या मशाली अडकवलेल्या दिसत होत्या..         मोजून चाळीस पन्नास मशाली असून ती वाट फार लांबलचक दूर पर्यंत पसरत गेलेली  दिसत होती.          मशालिंच्या उजेडाने ती वाट उजळून निघाली होती  -          सर्वात प्रथम समर्थ कृनाल, त्यांच्या बाजुला मार्शल त्या वाटेतून चालत जाऊ लागले , त्यांच्या मागून जय तृप्तेश  चालत निघाले...      "  जया ब्रदर , मग कशी वाटली माझी एक्टींग ?" तृप्तेश आभिमानाने छाती फुगवत उच्चारला..          त्यावर जयने त्याच्याकडे पाहिलं व दात  दाखवत हसला .. व म्हंणाला.         " मस्त होती ना ,कोठून ? कोठून शिकलास रे ही बकवास एकटीन्ग -!'           "  अं , बकवास ? !"         " हा मंग तर , तुझी एकटीन्ग पाहून तर कोणी तुला ओवर एकटीन्गचे पण पैसे देणार नाही,     तुला माहितीये त्यांना जर जरासाही संशय आला असता ना ? तर वाट लागली असती आपली..!"  जय..         ह्या दोघांचही हळूच पुटपुटत बोलण सुरु होत . -         पाच - दहा मिनिट चालून झाल्यावर शेवटी त्या गल्लीच्या वाटेच अंत आल, समोर एक अंधारी चौकट होती,      समर्थांनी   उजव्या बाजुला असलेल्या भिंतीवरची एक  जळती मशाल हाती घेतली,  व ती मशाल त्या चौकटीतून पुढे धरली-  तपकीरी रंगाच्या उजेड़ात अजुन खाली- खाली घेऊन जाणा-या पाषाणी काळ्याकुट्ट पाय-या दिसल्या..             " पुन्हा तलघर ?  पुन्हा पाय-या ? नक्की हा येहूधीचा तलघर आहे तरी कुठे ? " मार्शल जरा  खालावलेल्या स्वरात म्हंटला.                   " आपल्याकडे  दुसरा मार्ग नाही मार्शल ? पुढे जावंच लागेल!" समर्थ म्हंटले. समर्थांकडे जळणारी मशाल होती,  म्हंणूनच मार्ग दाखवण्याच काम करत  - तेच प्रथम पुढे चालत जाऊ लागले -       पायांखाली पाषाणाच्या काळ्याकुट्ट सापाच्या कातडीसारख्या पाय-या होत्या ,  तर पायरीच्या दोन्ही आजुबाजुला काळीकुट्ट अंधार फासलेली भिंत होती..-  पाय-या खोल गर्तेत घेऊन जात होत्या -  तसा एक बदल जाणवत होता .       ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती , हवेतली ऊष्णता हळू हळू कमी होत - होती , गारवा पडत चाल्ला होता..-          " तुम्हाला काही जाणवत आहे ?" समर्थांनी चालता चालताच विचारलं.         उजव्या हातात  धरलेल्या जळत्या मशालीचा तांबडसर हलता प्रकाश , समर्थ, मार्शल, जय , आणि शेवटला पिशाच्छी पांढ-या फिक्कट चेह-याच्या  तृप्तेशवर पडला होता.       " हवेतला ऑक्सिजन कमी झाला आहे ,       आणि थंडी हळू हळू वाढतीये. !" मार्शल उच्चारला.        " अगदी बरोबर ओळखलंस मार्शल, ह्याचा अर्थ आपण येहूधीच्या तलघराजवळ पोहचत आहोत..!"  समर्थ म्हंटले.          " पण मला काहीच का जाणवत नाहीये , ना थंडी वाजत आहे - नाही श्वास घ्यायला अडचण होत आहे , कही मैं अमर तो नही हो गया..!" तृप्तेश खूश होत म्हंटला.         तोच जयचा आवज आला..!          "  अरे मुर्खा तू अमर नाही तू सद्ध्या  पिशाच्छ आहेस , तुला कशी थंडी वाजेल, आणि मेलेली मांणस श्वास घेत नाहीत येड्या..!" जयच्या वाक्यावर तृप्तेशने समजल्यासारख करत मान हळवली.        तोच जयला पिशाच्छ वरुण एक गोष्ट आठवली तो पटकन म्हंणाला.     "   एक मिनिट , जर आपण जवळ पोहचत आहोत , तर मग  तुम्हाला आठवतंय काहीवेळा अगोदर बाहेर उभा तो खविस कंतनिया मालकीण असं काहीतरी म्हंटला होता , म्हंणजे  पिशाच्छराज विक्राल जरी ईथे नसला ; तरी त्याची पत्नी  आणि तिच्या सोबत अजुन नक्की ईथे कोणीतरी असेल - म्हंणूनच सर्वाँनी सावध रहा! "  जयने धोक्याची सुचना दिली.         त्यावर सर्वाँनी सावधानतेने फक्त होकारार्थी मान हळवली.         सर्वात पुढे समर्थ चालत होते -  हातातल्या मशालीचा तपकीरी तांबड़सर प्रकाश समोरचा मार्ग ऊजळून टाकत होता..         समर्थांच्या नजरेला त्यांच्यापासून खाली दूर वीस मीटर अंतरावर , एक  चौकट दिसली- ज्या चौकटीच्या आतून हिरवट रंगाचा प्रकाश आत येत होता , तो प्रकाश पाण्यावरच्या तरंगासारखा हळत - कमी जास्त होत - होता.      " तिथे एक चौकट आहे, लवकर चला..!"  समर्थ  म्हंटले.                xxxxxxxx     xxxxxxxxx   हिरवट रंगाचा प्रकाश काळ्या पाषाणी भिंतीवर पडला होता - त्याच हिरवट प्रकाशात एक चार फुट उंच चौकट दिसत होती. -      त्याच चौकटीतून  समर्थ बाहेर आले , त्यांच्या मागून मार्शल आला-  मग जय आला , आणि शेवटला तृप्तेश ..         समर्थ कृनाल, मार्शल- जय , तृप्तेश चौघेही आजुबाजुच दृष्य पाहत होते  -       हे चौघेही ज्या जागेत उभे होते , तेच येहूधीच कैवार तलघर होत..          चारही दिशेना काळ्याकुट्ट पाषाणी दगडाच्या भिंत होत्या , त्या चारही भिंतिंवर जादूई हिरवट रंगाच्या कधीच न विझणा-या मशाली पेटत होत्या -            त्या हिरवट मशालींचा तो हिरवा फेसाळता जहरी प्रकाश उभा तलघर ऊजलूण  गेला होता.          त्याच हिरव्या प्रकाशात ते दृष्य दिसत होते.. -          तलघराच्या मधोमध एक चौकोणी आकाराचा तलाव होता - त्या तलावात काळकुट्ट पाणी होत.- शांत , निर्वीकार पाणी..      त्या तलावाच्या आतून पुढे वर-वर जाणा-या   पाय -या होत्या , ज्या पाय-या चढुन झाल्यानंतर पाषाणी फरशी होती , मग त्याही पुढे वीस पावळांवर अजुन पाच - दहा  पाय-या होत्या , ज्या चढताच समोर येहूधीच सर्पसिंहासन दिसत होत !          त्या सिंहासनामागे , तीस पावळांवर अजुन एक अंधारी चौकट  दिसत होती - तर त्या चौकटीच्या  उजव्या बाजुलाही  तीस पावळांवर अजुन एक चौकट दिसत होती.. तरडाव्या बाजुला सुद्धा एक चौकट होती.         अस समजुयात की तलघराच्या चारही भिंतींना चार चौकट दरवाजे होते..- कोठे ना कोठे तरी घेऊन जात होते.         " हेच येहूधीच तलघर आहे ! तो पहा त्याचा कृरसर्पसिंहासन !" समर्थांनी आपला उजवा हात वर केला, त्याची तर्जनी पुढे त्या सिंहासनाकडे  दाखवत म्हंटले.     " हे सिंहासन खुप डेंजर दिसतंय नाही, असं वाटतंय जिवंत आहे !" तृप्तेशने मनातली भीती व्यक्त केली- बोलताना त्याचा चेहरा जरा भ्यायलेला दिसत होता.         त्याचे ते बोल ऐकून समर्थांचा चेहरा गंभीर झाला होता - त्यावर ते म्हंटले.        " जिवंतच आहे ते सिंहासन, असो मार्ग शोधूयात.. !"  समर्थांच्या ह्या वाक्यावर तृप्तेशने   भीतीदायक नजरेने जयकडे पाहिलं -          त्यावर जयने डोळे वटारले - व हळूच तृप्तेशच्या कानापाशी तोंड घेऊन येत पुटपुटला.        " त्याच्या जवळ जाऊ नको, आणि जास्त येडचाळे करु नको, कारण एनाकोंडा आहे तो , येडचाळे करणा-यांना खातो , तुला पण  खाईल ...! "          " न..न..नाय, न..न..नाय , म..म..मी  काहीही बोलत नाय.!" तृप्तेशने उजव्या हाताची तर्जनी ओठांवर ठेवली..-          जय  त्याची ती केलेली फजिती पाहून गालातल्या  गालात हसत होता.           " चार चौकट आहेत ईथे , ह्या चार  चौकटींमध्ये नक्की - रक्षकास कैद केलेली चौकट कोणती ? जी आपल्याला तलघरात घेऊन जाईल! "  मार्शल आजुबाजूला  प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हंटला..        " होना , जर चारही चौकटींमध्ये घुसलो , तर शोधता शोधता खुप वेळ निघुन जाईल.!"जयने खंता व्यक्त केली..         " मग काय करायचं आता ?" मार्शलने विचारलं..         सर्वाँच्या चेह-यावर चिंताजनक भाव पसरले होते - काय कराव ? काय नाही? काहीही कळून येत नव्हत.!          तोच अचानक त्या तलघरात  जमिनीवरुन काहीतरी  अवजड वस्तू ओढ़त घेऊन जात आहे असं आवाज येऊ लागला..                 ' खर,खर ,खर..! '        हा आवाज संपुर्ण तळघरात घुमत होता.ह्या चौघांनाही त्या आवाजाची चाहुल लागली, तसे ह्या सर्वाँची  गाळन उडाली जात पळता भुई थोडी झाली..        " कोणितर येत आहे, लपा - लपा लवकर लपा.!"  जय हळु आवाजात परंतू पटकन घाई घाईत पुटपुटला..            " कुठे लपायचं पण?  " तृप्तेश .            " ते पण मीच सांगू आता ?" जय .            "  साला  ईथे एक जागा नाही लपायला ...!" जय जरा रागातच म्हंणाला.           " हो ना जस काय आपण ईथे रोज येणार आहोत लपाछपी खेळायला हिहिहिहिह ..?" तृप्तेशने ह्या वाईट प्रसंगीत परिस्थितीत सुद्धा जोक मारला -             त्यावर जयच्या डोक्यात एक सणक गेली-  त्याने दात ओठ खात तृप्तेशकडे पाहिलं..                "  तुमच दोघांच भांडण बंद करा रे , एक काम करुयात , ह्या चौकटीत लपुयात !" मार्शल.         " नाही  - ते जे कोणी येत आहे ? ते  ह्या चारही चौकटींमधून बाहेर पड़ण्याची दाट  शक्यता आहे , ज्याने आपण पाहिले जाऊ शकतो..!" समर्थ अस म्हंणतच लपायची जागा  शोधू लागले , तेवढ्यात त्यांची शोधक नजर समोरच्या तलावावर पडली..         समर्थांच्या चेह-यावर हसू उमटलं..व ते म्हंणाले.       " लपायची जागा मिळाली , चला..!"                    xxxxxxx         xxxxxx            त्या काळ्याभोर अंधा -या चौकटीतून , दोन काळेभोर पायघोळ झगे घातलेले सैतानी मजुर बाहेर आले -            त्या दोघांच्याही उजव्या  हातात  , एक एक अश्या मिळून दोन दो-या होत्या - दोघेही ती दोरी ओढत होते , तसा तो खर , खर , असा आवाज येत घुमत होता.           ते दोघेही दरवाज्यातून बाहेर आले - तसा त्या दोघांच्या मागून चौकटीतून एक तीन फुट लांब ,  दिड फुट उंच अशी बर्फाची लादी खर ,खर आवाज करत जमिनीवरुन सरपटत बाहेर आली..           त्याच  चौकटीतून  पिशाच्छराच विक्रालची पिशाच्छीन    पत्नी  कंतनिया केट वॉल्क स्टाईलने चालत बाहेर आली.. -          तिच्या अंगावर एक काळ्या रंगाच शॉर्ट  ड्रेस होता - जो तिच्या दुधाळ कांतीच्या मादक देहावर खुलून दिसत होता.          तिच्या दूधाळ मांसळ गो-यापान मांड्या जणू नागिणीच चमचमत देह होत !       (  त्या काळ्या शॉर्ट ड्रेसमधून तिच्या छातीवरची दुधाळ स्तनाग्रांमधली ती दरी दिसत होती , त्यासहितच तिच्या शॉर्टड्रेसवरुन तिच्या ताठरलेल्या मणूक्यांचा दर्शन घडत होत.)        त्या चौकटीतून  चालत ती बाहेर आली , तिच्या मागून येहूधीचा प्रिय कैवार चालत आला.       कैवार  दिसायला तो एका चार पायाच्या पाळीव प्राण्यासारखाच होता -  परंतू त्याचे गुण? स्वभाव ? वागण? सामान्य नव्हतं !      ते एक हिंस्त्र , अमानवीय जनावर होत - रक्ताच्या तहाणेने मांसाच्या भुकेने  हवरटलेल ते एक हिंस्त्र , अमानवी,कृल्पती जनावर होत.   तीन फुट उंच , सर्वशरीराची कातडी काळीशार कवचासारखी शक्तिशाली होती - चारही पायांना धार - धार तीक्ष्ण सुईसारखी टोकदार नखे होती.          डोक एका क्रूर पिसाळलेल्या - चवताळलेल्या लांडग्यासारख होत - जबड्यातले काळेकूट्ट विषारी दात बाहेर आले होते..-  त्या उघड्या जबड्यातून पाण्यासारखी लाळ गलत होती -   त्याचे ते दोन्ही जांभळ्या रंगाचे चकाकते डोळे आपल्या सर्वाँकडे पाहत होते.          आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी , की त्या हैवानी श्वापदाच्या चेह-यावर श्वास घेण्याकरीता नाक दिसत नव्हत.         आता तुम्हाला एक प्रश्ण पडलाच असेल ,मग तो श्वास  घेत कसा होता ? तर या पाहूयात.    कैवारच्या - मानेच्या - जरा खाली डाव्या उजव्या अश्या  दोन्ही बाजुला     चार चिरा  पडल्या होत्या -  ज्या चिरांमधून श्वास आत ओढल्याचा, बाहेर सोड़ल्याचा  आवाज ऐकू येत होता.-  नक्कीच तेथूनच  ते अभद्र , हिडिस अमानवीय, सैतानी श्वान श्वास  घेत होत.                ह्या चौघांपासून  उजव्या बाजुला ,  जरा दूर तो कैवार तलाव होता , त्याच तलावाच्या पाण्यातून हळूच चार डोकी  वर आली -      समर्थ कृनाल , मार्शल-  जय- आणी तृप्तेश त्या   चौघा जणांनी  पाण्यातून डोक बाहेर काढल, व एकटक पुढे पाहू लागले.          " चला , लवकर हे बर्फ घेऊन त्या तलघरात चला , नाथांनी सांगितलं आहे - आम्ही परत येई पर्यंत त्याच्या देहावर बर्फाचा  आभिषेक घालतच रहा - बर्फाचा वर्षाव थांबायला नको..!" कंतनिया म्हंटली..      व  त्या दोन मजुरांच्या पुढे कंतनिया उजव्या बाजुला असलेल्या चौकटीच्या दिशेने चालत निघाली ,   तिच्या मागून ते मजुर बर्फाची लादी खरडत, खरडत , ओढत  घेऊन जाऊ लागले - .         "  काय भारी पीस आहे !" बर्फ ?" तृप्तेशने लागलीच विषय बदलत भुवया बारीक केल्या.         " तिच्या अंगावर बर्फाचा वर्षाव थांबायला नको?" ह्यावेळेस जय म्हंटला.  तसा त्यालाही कळून चुकलं  आपण जरा आंबट बोललो नाही..          " आई मीन त्याच्या..!" जयने जिभळ्या चाटल्या..         " समथिंग ईज रोन्ग हेअर !"  तृप्तेशने पुन्हा त्याच्या इंग्लिशची आई - मध्ये घातली..!            कैवारच्या मानेखाली असलेल्या चार नाकपुड्या ह्ंह्ह्ह- हूह्ह्ह असा आवाज करत  फुगल्या होत्या -           त्याने मानवी देहाचा वास हुंगला होता -त्याचे जांभळे डोळे हळुच संशयित नजरेने लहान झाले - व पुढच्याक्षणाला त्याने - आपल डोक उज्व्या दिशेला वळवल - व थेट तलावाच्या पाण्यावर नजर टाकली..          तसे त्याला ते दिसलं..!     xxxxxx    xxxxxx        कैवारच्या दोन्ही जांभळसर चकचकीत बुभळांवर  काळ्या मीरीचे दोन ठिपके  होते - त्याच्या तोंडाचा जबडा वासला गेला होता , त्या वासलेल्या जबड्यातून हलकीशी गुरगूर बाहेर पडत होती...!          त्या हिंस्त्र , हिंसक- अमानवीय श्वापदास ह्या चौघांची चाहुल तर लागली नव्हती ना ? त्या काळ्या शांत निर्विकार पाण्याच्या आत लपलेले हे  चौघे - एकमेकांच्या चेह-याकडे पाहत होते.         चौघांच्या चेह-यावर भीतीजनक, भाव पसरले होते -      तृप्तेशचा पांढरा फटक चेहरा हळु हळू सामान्य होऊ लागला - त्याच्या तोंडातले टोस्कूले दात सामान्य झाले , डोळ्यांतली बुभळे सामान्य झाली- D 10 सिरिजचा प्रभाव उतरत होता , तृप्तेश पिशाच्छ योनीतून - मानवी  रुपात येत होता..      अचानक झालेल्या ह्या क्रियेने त्याचा  श्वास अपुरा पडू लागला - दम   घुटु लागला -     कोणत्याही क्षणी तो पाण्यात  श्वास न मिळाल्याने गुदमरुन बाहेर  येणार होता ?        हळु हळु तृप्तेशचा चेहरा काळा-निळा व्हायला सुरुवात झाली, जयने त्याला दोन्ही हातांनी जरा दम धर असा ईशारा करत धीर दिला..          तो कैवार हळू हळू तलावाच्या दिशेने येत होता - त्याचे दोन्ही जांभळे डोळे तलावाच्या पाण्यात खिळले होते.. !          ईकडे तृप्तेशची हालत खराब झाली होती-  पाण्या बाहेर यायचं तर  त्या कैवारला कळणार होत ? ईकडे ही मृत्यू आण तिकडेही मृत्यु अशी  गत त्याची झाली होती.        " कैव्वार !" अचानक पिशाच्छीण  कंतनियाची हाक आली- " अरे तिकडे  काय करतोयस , चल ये ईकडे. आपल्याला तलघरात जायचं आहे..!"          " घुर्र्र घुर्र्र..!" कैवारने आपला जबड्यातले ते तीक्ष्ण , दात  एकमेकांवर रागाने घासत - तलावाच्या पाण्याकडे पाहिलं..  व  हळू हळू चालत - त्या चौकटीतून बाहेर निघुन गेला..         ' झर्रर्र ssss..'  असा आवाज करत , तलावातल पाणी हवेत उडवत तृप्तेश पाण्यातून बाहेर पडला..-          " ह्ह्ह्ह ह्ह्ह्ह ह्ह्ह!"  छाती फुग्यासारखी फुगवून - फूगवून आत श्वास भरु लागला..        "  यू ओके तृप्तेश ?"  जयने काळजीपूर्वक  नजरेने तृप्तेशकडे  पाहतच  विचारलं . त्यावर त्याने मोठमोठ्याने श्वास घेत  फक्त होकारार्थी  मान हळवली..       " मीही sss मी ही ss ठि.. ठिक आ..आहे ,आपल्याला त्यांचा पिच्छा करायला हवा..- ते पुढे निघुन जाण्या अगोदर !" तृप्तेश फुळलेल्या श्वासांसहित कसातरी मोडक्या शब्दांत म्हंणाला..         चौघेही पाण्यातून बाहेर पड़ले..     xxxxx       xxxx ती एक चार मांणस चालत जातील , अशी पाषाणी दगडांची बोगद्यासारखी वाट होती , दर वीस पावळांच अंतर सोडून भिंतीवर एक - एक अश्या मशाली जळत पेटत होत्या -           पाषाणी काल्याकुट्ट जमिनीवरुन  " खर , खर !" असा आवाज करत - ते दोन सैतानी  काळे पायघोळ झगे घातलेले मजुर  ती बर्फाची लादी ओढत घेऊन चालले होते..         त्या दोघांच्या पुढे कंतनिया चालत जात होती -  तिच्या बाजुहून ते हैवानी श्वापद कैवार चालत होत.. -  चालतांना त्याची काळीशार शेपटी सापाच्या शेपटीसारखी खाली वर होत वळवलत होती.          ह्या तिघांच्या मागून अगदी चोर पावळांनी - छुप्या रुस्तम सारखे हे चारजण पाठलाग करत चालत येत होते.              मध्येच  कैवारची पाऊले जागीच थांबली त्याच्या काल्याशार सश्याच्या कानांची हालचाल झाली -           ते ध्यान थांबलं हे पाहताच , ह्या चौघांच्या छातीत श्वास अडकले , चौघांनी आजुबाजूला असलेल्या पाषाणी  दगडधोंड्यांचा आधार घेत आप-आपल शरीर लपवल..               त्या ध्यानाला कसलीतरी चाहूल लागली होती ? नक्कीच ह्या चारजणांची अशणार..!  त्याने गर्रकन  वळून मागे पाहिलं -          कालोखात त्याचे ते दोन खूनशी डोळे चंदेरी रंगाने चकाकले - कैवार थांबला हे पाहताच , कंतनिया ही थांबली, ती थांबताच ते मजूर थांबले , तो बर्फाच्या लादीचा खरखर आवाज थांबला -         एकार्धात सृष्टीचे आवाज थांबल्यासारखी स्मशान शांती सन्नाटा छा गया - ईकडे दगडा आड लपलेल्या ह्या चौघांच्या अंगावर भीतीने शहारा फुटत होता.         कंतनियाने खाली वाकून कैवारच्या डोक्यावर हत ठेवला , तो जिकडे पाहत आहे तिकडे पाहिलं -     " घुर्र्र्र्र !" कैवार अंधारात पाहत  गुरगुरला कंतनियाच्या लाळेलाल ओठांवर एक  गुढहसू फुटलं , त्या अंधारात पाहत ती कुत्सिक हसली- तीने काहीतरी कसलातरी विचार करत होकारार्थी  मान  हळवली..     पुन्हा चालू लागली, तिच्या मागोमाग कैवार - आणी  ते मजुर चालू लागले - तो बर्फाचा खर,  खर असा हदयाला चीर पाडणारा आवाजही पुन्हा ऐकू येऊ लागला.. - त्या आवाजाने शांतता भंग पावली जात होती.         " चला , ती गेली- चला.!" मार्शल पुटपुटला..         हळूच एक एक करत तिघेही समर्थ,तृप्तेश, मार्शल दगडाआडून बाहेर आले- जय सुद्धा बाहेर येणार होता , परंतू त्याचा डावा पाय एका दगडात अडकला होता .-      हे तिघेही जसे बाहेर आले -तोच तेवढ्यात ह्या तिघांच्या छाताडावर तीन लाथा बसल्या..-त्या लाथांच्या माराने तिघेही तीन फुट उंच हवेत उडाले जात  ' धप्प  ' आवाज करत पाठीवर जमिनीवर कोसळले..          ह्या घडलेल्या क्रीयेने जय सावध झाला ,        तो अंधारात दडून बसला - दगडाआडून चोरट्या नजरेने  त्याने समोर वळून पाहिलं ,समोर तेच ते पहाडी उंचीचे सैतानी खविस उभे होते..       xxxxxx     xxxxxx                 " हिहिहिहिहिही -" ह्या तिघांनाही जमिनीवर पडलेल पाहून ते तिघेही चांडाळ हैवानी हास्य करत हसू लागले..          समर्थ कृनाल, मार्शल , तृप्तेश तिघेही जमिनीवरुन उठले.-       समर्थांच्या डाव्या हाताला चार पावळ पुढे , एका दगडाच्या आडोश्याला जय लपला होता ,समर्थांनी गंभीर चेह-याने त्याच्याकडे पाहत मान हळवली - इशारा करत तिथेच थांबायला सांगितलं व  तृप्तेशकडे पाहत म्हंटले.         " जय  ,आम्ही ह्यांना सांभाळतो - तू त्यांचा पाठलाग कर !" समर्थांनी तृप्तेशकडे पाहिलं .          मार्शलला समर्थांच्या ह्या बोलण्याचा रोख कळाल होत.    परंतू    समर्थांच हे युक्तिरुपी वाक्य कमी बुद्धीच्या तृप्तेशला मात्र समजलं नाही - तसा तो म्हंणाला.        " समर्थ अहो मी जय नाही, अहो मी तृप्तेश आहे तो जय  तर .!"  तृप्तेशच्या वाक्यावर  दगडा बाजुला दडलेल्या जयने डोक्यावर हात मारला.-  तर मार्शलच्या चेह-यावरही चोरी पकडल्यासारखे गोंधळलेले भाव पसरले ...         तो मनातच म्हंटला.         " काय गाढव आहे हा!"                " माहितीये , माहीतीये -" समर्थांनी तृप्तेशच्या खांद्यावर हात ठेवलं.         त्याच्या चेह-याकडे पाहत म्हंणाले. " तुझ नाव जयतृप्तेश आहे - " समर्थ पुढील वाक्य हळू आवाजात म्हंटले. " गप्प बैस्स , हे वाक्य जयला ऊद्देशून आहे .!"       ते तिघेही खविस एकटक समर्थ, तृप्तेश, मार्शल- ह्या तिघांकडे पाहत होते.         " ए , काय खुसुर पूसूर सुरु आहे ! " तो एक डोळ्याचा - चार हातांचा खविस  मोठ्याने गुरकत म्हंटला.         त्याच्या आवाजासरशी , ह्या तिघांनीही त्याच्याकडे पाहिलं.      " मला आधीच शक होता तुमच्यावर , पन तो पिशाच्छ? कुठे आहे तो ?" त्या खविसाने ओरडून विचारलं..         " मारला, खल्लास केलं  आम्ही त्याला !" मार्शल मध्येच त्या खविसाला डिवचत म्हंटला.   त्याच्या त्या वाक्यावर तृप्तेशने  डोळे-  तोंड  मोठे कत्याच्याकडे पाहिलं...-  व तो मनातच म्हंणाला.       " मी तर जित्ता हाये भेंडी..! मंग हा मारतोय कोणाला..!"          "  होय , मारलं त्यांला आम्ही - आणि आता तुमची बारी आहे..!" समर्थांनी अस म्हंणतच उजव्या हातातला रूद्राक्ष मुठीत आणला..           " अस्ं !" त्या एक डोळ्याच्या खविसाने समर्थांकडे खून्नशी नजरेने पाहिलं " मंग होऊन जाऊदे ना ?  पाहू तर कोण जिंकतय!"  तो खविस एका गालात खुनशी हसला - त्याने आपले चारही हातांचे पंजे  एकमेकांवर जोरात आदळत चोळले..          " आ sssss...!"  तिन्ही खविसांचा युद्धपुकार आवाज घुमला.         " यह्ह्ह्ह्ह्ह्ह !" समर्थांसहित त्यांच्या रक्षकांनीही युद्ध गर्जना केली.        धारधार पातिंच्या तलवारीच्या दोन्ही पात्यांवर - पाते आदळून ठिंणग्या उडाव्या तसा तीन  अमानवीय खविस आणी दैवी शक्तिचे रक्षक असा हा द्वंद सुरु झाला.          अमानवीय विरुद्ध  दैवी रक्षक भीडले गेले..         तो चार हातांचा , एक डोळ्याचा खविस समर्थांपाशी पोहचताच  , समर्थांनी उजव्या  हातात घातलेल्या मुठीची पंच वेगाने त्या खविसाच्या थोबाडात लगावण्यासाठी पुढे आणला , तोच  त्या खविसाने चार हातांमधील  डाव्या बाजुच्या एका हाताने समर्थांचा उजवा हात हवेत धरला , मग उजव्या हातांनी समर्थांची मान पकड़त - त्यांना हवेत चार फुट उंच उचलून वर धरल-  उजव्याबाजुच्या  भिंतीवर , समर्थांना पाठीवर जोरात आदळल -           ' धप, धप,धप,'  पाठीवर आदळताच आवाज होत - होता , त्यासहितच समर्थांच्या चेह-यावर वेदना उमटत होती.        दुस-या खविसाने मार्शलपाशी पोहचताच - आपल्या शस्त्राने  त्याच्या छाताडावर  उलटा वार केला , त्या वाराने मार्शल मागे दूर उडाला..        पाच फुट्या  काठी पैलवान  तृप्तेश समोर सहा फुट उंचीचा काळ्याकुट्ट राकट देहाचा खविस उभा राहीला होता.          तृप्तेशने आपल्या उजव्या हाताची मुठ झाकली, व एक जोरदार टोळा  त्या खविसाच्या थोबाडात लगावली-   परंतू त्या हैवानाची कातडी जनू अंबूजा सिमेंटपासून बनली होती की काय - साला  त्याला मार लागतच नव्हतं ?        तृप्तेशने ह्यावेळेस डाव्या हाताचा  टोळा  त्या हैवानाच्या थोबाडात लगावला - परंतू  नाहीच !  त्या हैवानाच्या चेह-यावर एक वेदनेचा एक टीपूसही दिसत नव्हता.            तृप्तेशने आपला डावा पाय उचलला, व त्या पायाची किक  त्या खविसाच्या पोटात मारली, पण नाहीच -  ते खविस शैतान तसंच उभ होत.         तृप्तेशने पुन्हा डावा पाय उचल्ला , व पुन्हा त्या खविसाच्या पोटात लाथ लगावणार तोच त्या खविसाने  डाव्या हातात तृप्तेशचा ड़ावा पाय  धरला - मग उजव्या हातात तृप्तेशची गंचोंडी धरली व त्याला दूर फ़ेकल... तसा तृप्तेश मागे जाऊन , मार्शलजवळ  पडला..          कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही ,  हिच संधी साधून  जय कंतनियाच्या मागे निघुन गेला..!           मार्शलने आपल्या बाजुला पडलेल्या तृप्तेशकडे  पाहिलं -  दोघांचिही नजरा नजर झाली- मार्शलने तृप्तेशला मानेने जा आणि मार त्या खविसाला असा ईशार केला -  त्यावर तृप्तेशने  घशाखाली आवंढा गिळला, व मानेनेच मी असा ईशारा केला.. - ह्या दोघांच ईशा-या ईशा-याने बोलण सुरु होत , तोच ते दोन्ही खविस पुढे आले - दोघांणीही एक एक करत तृप्तेश- मार्शल दोघांच्या गंचोंड्या धरल्या व अलगद जमिनीवरुन वर उचल्ल..          त्या दोन्ही खविसांनी जसे  चियर्सचे ग्लास एकमेकांना टेकवतात तसंच    मार्शल- तृप्तेश दोघांनाही जवळ आणत  एकमेकांच्या  शरीरावर जोरात आदळल - व उजव्या बाजुला उभ्या खविसाने तृप्तेशला पुन्हा मागे फ़ेकल , तसा  तृप्तेश पाठीवर पडला , पाठीवर पडताच त्याने दोन्ही पाय मागे नेहले - व सर्व शरीर उलटी उडी प्रमाणे भिंगवत वर नेहलेले पाय पुन्हा खाली आणत पटकन जागेवर उभा राहिला -  व चपळपणे विद्युत विजेच्या वेगाने हालचाल करत , उजवा हात मागे घेऊन जात , कंबरेला खोवळेली ओल्ड मॉडल बंदुक  बाहेर काढली-         डावा हात आड़वा धरुन, उजवा बंदूक धरलेला हात त्या डाव्या हातावर ठेवला, डावा डोळा बंद करुन - उजवा उघडा ठेवत बंदूकीच्या  नळीतून थेट त्या खविसाच्या भुवई मधोमध नेम  धरत   ट्रिगर दाबला -  तत्क्षणाला  बंदुकीच्या आत एक विशिष्ट प्रकारची क्रिया घडली जात , धाड असा कानठळ्या  बसवणारा आवाज करत बंदूकीच्या नळीतून उधळलेल्या बैलासारखी पांढरट धुर उडवत जलद गतीने गोळी बाहेर पडली..         ' सुईssss  ' असा आवाज करत हवेला छाटत , ती चंदेरी रंगाची चांदीची टोकदार गोळी  त्या खविसाच्या कपाळावरची कातडी मांस, फाडत , कवटी फोडून आत घुसली,  रक्ताची चिलकांडी उडाली-  गोळी पुढुन जात थेट मागचा मेंदूच्या भागाजवळची कवटी एटम बॉम्बसारखी फट आवाज करत चिंधड्या उडवत बाहेर पडली..        तसा तो खविस निर्जीव पुतळ्यासारखा मंद गतीने - पाठीमागे , हवेतून खाली खाली जात धप्प आवाज करत जमिनीवर पडला..       दुस-या एका खविसाने मार्शलला गंचोडीला धरुन ठेवलं होत - त्याने मार्शलला तृप्तेशच्या दिशेने फेकलं , मार्शल हवेतून फुटबॉलसारख उडत जात तृप्तेशच्या अंगावर कोसळला..  xxxxxxx   xxxxxx     जय   पाषाणी गल्लीतून जोरात धावत जात होता .   भिंतीवर वीस मीटरच अंतर ठेवून ,  जरा दूर दूर अश्या मशाली अडकवल्या होत्या - मशालिंचा प्रकाश , एका ठराविक अंतरापर्यंत पडत होता ,  तेवढी जागा प्रकाशाने भरुन निघत होती - बाकी जागा मात्र अंधारात बुडाली होती.         जयची धावती आकृती कधी त्या उजेडात दिसत होती , तर कधी अंधारात गायब होत- होती..  - न जाणे किती उशीर झाला असेल तो धावतच होता..     " अरे यार ईतक्यात कुठे गेले  हे सर्वजण!" अस म्हंणतच जय जागेवरच थांबला.        आजुबाजुला गडद शांतता पसरली होती -  जयला फक्त त्याच्या श्वासांचा आवाज तेवढा ऐकू येत होता ...          तोच त्या आवाजात अजुन एक आवाज मिसळला , काहीतरी फोडत असल्याचा - ठक, ठक असा आवाज ऐकू येत होता , जणु हातोड्याने कशावर तरी घाव घातला जात होता...             " हा आवाज ? कोठुन येतोय?" जयने स्वत:शीच म्हंटलं .         डोळे बंद करुन - श्वास रोखून तो त्या आवाजाची दिशा ओळखू लागला -          एक तलघर  दिसत होत - तलघरातल्या तपकीरी भिंतींवर सात आठ मशाली पेटल्या होत्या - त्याच मशालींच्या उजेडात पुढील दृष्य दिसत होते.        ते दोन सैतानी मजुर हातात हातोडे घेऊन , जमिनीवर असलेल्या बर्फाच्या लादीवर घाव घालत होते..         त्या दोघांच्या बाजुला पिशाच्छ  कंतनिया ,  व ते अमानवीय ध्यान म्हंणजेच कैवार उभा होता -          त्या दोघांच्याही पुढ्यात एक  पाषाणी चौकोनाकार दगडी ओटा होता - त्या ओट्यावर  एक कब्र ठेवली होती.. -         " लवकर , लवकर  बर्फाचे तुकडे  करुन त्या कबरीत टाका.. -  नाहीतर त्याच देह तापेल , आणि त्याची शक्ति उर्जा परत येईल- त्याला थंड करायला हवं ,उसके जिस्मसे अगर थंडाहट कम हो गई  तो वह जाग जायेगा , और अगर वह जाग गया तो कोहराम मचा देगा वह ..! जल्दी करा,  घाई करा...!"   कंतनिया भीत भीत म्हंटली.. तिच्या आवाजात भयाची कंपने उमटत होती.. तीचे विस्फारलेले डोळे त्या कबरीवर खिळले होते..!       त्या सैतानी मजुरांनी हातोड्या मार्फत त्या बर्फाच्या लादीचे मध्यम तुकडे केले, एका सैतानी मजुराने दोन्ही हातांत बर्फाचे तुकडे उचल्ले -  त्या तुकड्यांतून सफेद हिमवाफ   मंद गतीने बाहेर पडत होती..           दुस-या सैतानी मजुराने हळूचंच कबरेच झाकण उघडलं  - झाकण उघडताच आतून आतिउष्ण धगेची गरम वाफ़ वेगान झपकन बाहेर पडली, वाफेने त्या सैतानी  मजुराचा चेहरा भाजला ..         " आह्ह्ह्ह्ह ..- आह्ह्ह्ह्ह्ह्ह..!"  तो सैतानी मजुर गुरा- ढोरासारखा ओरडला ,       त्याने आपले दोन्ही  हात चेह-यावर ठेवले , त्याचा सर्व चेहरा भाजला होता , कातडी मेणासारखी वितळली होती..          पुढच्याक्षणाला तो मजुर जमिनीवर मृत होऊन कोसळला..          कंतनियाचे भीतीने डोळे पांढरे झाले होते - भयाने भीतीने  ती दोन पावले मागे सरली..जयने खाडकन डोळे  उघडले - त्याचे उघडलेले डोळे हळू हळू खाली  खाली येऊ लागले , कारण आवाज जमिनीतून आला होता.            कबरीच उघड झाकण दिसत होत , त्या उघड्या झाकणातून पांढ-या गरम वाफेचे लोट नी लोट बाहेर पडत होते..-         तो बर्फ धरलेला मजुर धावत त्या कबरीच्या उघड्या मुखापाशी आला , त्याने हातातील बर्फ त्या कबरीतून निघणा-या वाफेत सोडलं , परंतू  त्या वाफेच तापमान ईतक होत, की बर्फ हवेतच वितळला..         पुढच्याक्षणाला त्या पांढरट वाफेत एक तेजस्वी तपकीरी रंगाचा सुर्यासारखा प्रकाश प्रज्वलित झाला..-          " नाही, नाही - त्याला त्याची शक्ति मिळतीये - अस व्हायला नको, अस व्हायला नको!"  कंतनियाने अस म्हंणतच -         आपला उजवा हात त्या खाली फोडलेल्या बर्फाच्या दिशेने केला - कंतनियाच्या उजव्या हाताच्या पंज्यावर निळसर रंगाचा वर्तुळाकार शक्तिपुरवठा तैयार झाला , ती शक्ति जणु चुंबकिय असावी ? कारण खाली जमिनीवर पडलेल बर्फ - बिना आधारासहित वर हवेत उडालं - कंतनियाने त्या उजव्या हाताच्या पंजाची हालचाल केली, तो हात त्या कबरीच्या दिशेने आणला - त्यासहितच बर्फाचीही  हालचाल झाली गेली , ते सर्व बर्फ  एकदाच त्या कबरीच्या उघड्या मुखाआत , त्या पांढरट अतिउष्ण धगेत पडल गेल -             " लवकर  , लवकर तो कबरेचा झाकण बंद करा !" कंतनिया मोठ्याने ओरड़त म्हंटली..     हळू हळू  कबरेत पेटलेला तो तपकीरी प्रकाश निमुळता होत - होत  , विझला गेला..!   कबरीच्या बाजुला उभा त्या सैतानी मजुराने लागलीच कबरीच झाकण लावून घेतलं - झाकण लावताना हळुच आत जे कोणी होत ! किंवा तो रक्षक होता ? त्याने कबरीआतून  आपला मानवी पाच बोटांचा हाताचा पंजा बाहेर काढ़ला - त्या पंज्यावर  यमाच्या रेड्याच डोक्याच चिन्ह होत ..!           " हूशश्श वाचलो!" कंतनियाने सुटकेचा श्वास सोड़ला - तोच  अचानक धाड असा आवाज झाला -कंतनियाच्या मागे वीस पावल दूर , वरच पाषाणी छप्पर खाली कोसळल होत - खाली पडलेल्या त्या पाषाणी दगड धोंड्यांमधून तपकीरी धुळ हवेत उडत होती - आणि त्याच धुळीतून एक आवाज आला -        "   नॉट वाचलो बेबी ,  अडकलीस..!" त्या आवाजासहितच त्या धुळीतून - एक काळीशार सावली चालत पुढे पुढे येऊ लागली- उजेडात आली..         " कोण आहेस तू ?" कंतनियाने विचारलं..        " जय , जयविक..!" .. जयने जस हे नाव उच्चारलं .  कंतनियाला विक्रालचा घाबरलेला चेहरा आठवला..-  ज्या रक्षकाला घाबरुन विक्राल मेनकास मृत्यूंजय मणी मिलवण्याकरीता  घेऊन गेला होता..-         तोच रक्षक कंतनियासमोर उभा होता.-  त्याच्या शक्तिची उच्चांकता किती असेल? हा विचार करुनच हळू   हळू कंतनियाची पाऊळे मागे मागे जाऊ लागली..                  "    नो , नो, नो, नो ड़रीये मत ! आम्ही सच्चाई - और अच्छाई के रक्षक हाय मैड़म- औरतों पें हात नहीं उठाते ..!" जय मंद स्मित आणत म्हंटला...      तोच कंतनिया एका गालात आसुरी , छद्मी हसली- त्या हास्याच कारण मात्र जयला कळाल  नाही,  तेवढ्यात ते कारण  कंतनियाच्या मागून डोक्यावरुन थेट जयच्या दिशेने झेपावलं - तो म्हंणजे कैवार होय!"   ×××××××××××   ×××××××××××         " फट!" आवाज करत त्या खविसाने समर्थांच्या गालावर उजव्या हाताची पंच मारली- मग डाव्या हाताची मारली, मग उजव्या - प्रत्येक पंचवर , मुक्क्यावर समर्थांच्या गालावर जखम होत - होती..           नाक- तोंड, गाळ सर्वकाही काल निल पडलं जात सुजल होत..       तोच समर्थांनी डाव्या हातातला रुद्राक्ष कडा , मुठीत धरला - व त्या दैवी रुद्राक्ष कड्याची तपकीरी रंगाने ऊजळलेली मुठ त्या खविसाच्या तोंडावर मारली, तसा तो खविस समर्थांपासून दूर झाला..            " स्स्स्स हा हाहाहाह..!" तृप्तेशने उजवा हात पाठिला लावला , त्याच्या पाठीला मुका मार बसला होता.          मार्शल जागेवर उठुन बसला -          " यू ओके तृप्त !" मार्शलने काळजीपूर्वक  स्वरात उच्चारलं .           " आई एम नाट फायीन, भेंडी- एंशी किलोचा गेंडा अंगावर पडला तर कय होईल.?" तृप्तेशने मार्शलला गेंडा म्हंटलं होत ..         " आई एम सॉरी  ,  त्याने मला तुझ्या अंगावर फेकलं !" मार्शलने तृप्तेशला हात देत त्याला खालून वर उठवलं - तोच  एक पायाचा पंज्या वेगान तृप्तेशच्या थोबाडावर बसला , त्या माराने तृप्तेश  जमिनीवरुन चेंडूसारखा फरफटत, टप्पे खात - सात फुट दूर उडत गेला,          " तृप!" मार्शल पुढे काही बोलणार तोच त्या खविसाने , पुन्हा त्याची गंचोंडी आवळली, जमिनीवरुन वर चार फुट वर उचल्ल..          त्या खविसाने मार्शलची मान डाव्या हातात गच्च धरली होती- त्याच्या उजव्या हातात  त्याच दंडगोल लाकडी शस्त्र होत , ज्या शस्त्राच्या मधोमध - धार धार टोस्कूल पाषाण अडकवल होत ..         " तुझा खेळ- खल्लास !"  घोग-या आवाजात अस म्हंणतच - त्या खविसाने उजव्या हातातला तो आदिमानव युगातला शस्त्र वर  उचल्ला -वेगान पुढे आणला तोच..        " धाड!" आवाज करत - तृप्तेशने गोळी झाडली, जी येऊन थेट त्या लाकडावर आदळली..            नेम चुकला हे पाहता , तृप्तेशने पुन्हा चारवेळा फायर केलं ..        " धाड, धाड, धाड, धाड़..!" गोळीचे बार फुटले!           परंतू त्या खविसाने बंदुकीच्या गोळीचे सर्व वार लाकडाच्या शस्त्राने अडवले -   तो लाकडाचा शस्त्र त्याने तृप्तेशच्या दिशेने फ़ेकला , जो गरा-गरा फिरत जात तृप्तेशच्या छाताडावर बसला , त्याची किस्मत चांगली  होती- की ते पाषाणी दंत पुढे होत - मागे नाही, परंतू त्या माराने तृप्तेश पुन्हा पाच फुट मागे उडाला ,  मागे जाऊन एका चौकटी बाजुच्या भिंतीवर आदळला.. -           समर्थांनी  उजव्या हातातील रुद्राक्ष कडे त्या चार हातांच्या राक्षसी खविसाच्या दिशेने भिंगरीसारखे फ़ेकले , हवेतून ज्वलंत - विस्तवासारखे पेट घेत - चक्रीसारखा गरा गरा फिरत तो रुद्राक्ष कडा  त्या खविसाच्या दिशेने पोहचला , रुद्राक्ष कड्याच्या भिंगरीला अडवण्याकरीता - त्या खविसाने आपल्या चार हातांमधील दोन हात समोर धरले - परंतू ते रुद्राक्ष काही साधारण होते का  ?  त्या  रुद्राक्षांच्या शक्तिचा उच्चांक त्या खविसाला माहिती नव्हत , त्या खविसाचे दोन्ही हात मुळापासून छाटले गेले - तुकडे होऊन.जमिनीवर पडले..   'धप्प  '  आवाज करत जय पाठीवर कोसळला - वेदना व्यक्त करायला ही त्याला वेळ मिळाला नाही- कारण त्याच्या  छाताडावर तो पिसाळलेला कैवार दोन्ही पाय ठेवून, जबड्यातले तीक्ष्ण  दात - बाहेर काढुन त्याच्या मानेचा चावा घेऊ पाहत होता.- त्याचे ते काळेशार पिशाच्छी सुईसारखे दंत - घश्यातून निघणारी गुरगुर - ते जांभळ्या रंगाचे वटारलेले खूनशी डोळे ..         xxxxx                   जयने आपल्या दोन्ही हातांनी कैवारचा गळा धरला होता - अन्यथा केव्हाचंच त्या हैवानाने त्याच्या मानेच मांस ओरबाडून खाल्ल असत.         " कोणत्या प्रजातिचा कुत्र आहे रे तू?"  जयविक दात ओठ खात कैवारला रोखत म्हंटला..कैवारची शक्ति फार असीम होती,  जयला कैवार सांभाळायला कठीण  जात होता - त्याच्या शक्तिचा उच्चांक कमी होता -मानव विरुद्ध अमानवीय शक्तिच द्वंद सुरु होत.         कैवारचा ते रानटी लांडग्यासारख हिंस्त्र श्वापदी तोंड  हळू हळू जयच्या तोंडाजवळ त्याच चावा घ्यायला येऊ लागला , कैवारच्या वासलेल्या जबड्यातून चिपचिपीत पाण्यासारखी लाळ बाहेर येऊ लागली- जी की जयने पहिली , जर ह्या रानटी हैवानी कुत्र्याला दूर केलं नाही, तर ते मिश्रण चुंबण म्हंणून त्याच्या तोंडात पडणार होत , जी कल्पना करुनच जयचा राग, व किळस उफाळून वर आली..        " शीssss  , माझ्यापासून दूर हो रानटी कुत्र्या sssss !"  जयने होती नाही तेवढी शरीरातील सर्व ताकद  एकवटली, आणि त्यासहितच अनावधणाने एक प्रकार घडला - जयच्या गळ्यात असलेला मृत्यूंजय मणी- त्या मण्यात एक शक्तिपुरवठामय उर्जासाठली, मणी लाल रंगाने प्रकाशीत होत - चकाकली, व साठलेली उर्जाकीरणे झुम असा आवाज करत बाहेर पडली, व त्या शक्ति किरणांनी कैवारच्या सर्व देहाला धड़क देत त्याला जयपासून दूर हिबाळल- कैवार नामक तो रानटी श्वापद  हवेतून उडत समोरच्या भिंतीवर  जोरात जाऊना आदळला , ( मरण पावला ) बेशुद्ध झाला..          " आह्ह्ह्ह , आह्ह्ह्ह्ह!"  आपले दोन्ही हात तूटले पाहून तो खविस  वेदनेने ओरडला ,          " आता होईल बराबरीची स्पर्धा  !" समर्थांनी नजरेनेच त्या खविसाला आपल्या दिशेने ये असा ईशारा केला..             " तुला मारण्याकरीता मला शस्त्राची गरज नाही क्षुद्र मानवा !" मार्शलला गंचोंडीला धरुन वर उचल्लेला तो खविस म्हंटला..         मार्शलने आपले दोन्ही पाय वर उचल्ले   - त्या दोन्ही पायांचे पंजे त्या खविसाच्या छाताडावर मारले - तसा मार्शलच्या गळ्यावर असलेल्या खविसाच्या हाताची पकड सुटली..      तेवढ्यात  वेळेची गती मंदावली-  सर्वकाही मंद गतीने घडायला सुरुवात झाली- पृथ्वीचा वेळ काळ गोठला गेला-         मार्शलने आपले  गुढघे पोटात घेत सर्व , सर्व शरीर मागे  सोडून दिलं - व हवेतच उलटी उडी घेतली, वेगान धप्प असा आवाज करत खाली आला -  खाली येताच          मार्शलने  आपल्या उजव्या हातात असलेल्या नायनॉ टेक्नॉलोजिने बनलेल्या गेजेट वॉचमध्ये पाहिलं ,  डाव्या हाताने वॉचवर टच केलं..-  तसा त्याचक्षणी त्या चौकोणी वॉचवर एक निळसर रंगाचा स्फटीकासारखा फुगवटा निर्माण झाला - ज्या फुगवट्याने मार्शलचा पंजा    एक बॉक्सिंग  ग्लोव्ह घातल्यासारखा दिसू लागला..            xxxxx जय पटकन जागेवरुन उठला ,  त्याने फुललेल्या श्वासांसहित समोर पाहिलं - तो रानटी हिंस्त्र श्वापद कैवार जमिनीवर निपचीत पडला होता -            जयने त्याच्यावरुन नजर हटवत कंतनियाकडे पाहिलं - त्याची व तिची  नजरा , नजर होताच तो दात दाखवत  हसला..         " नाथ पाहून घेतील तुला..!"  ती रागात म्हंणाली.. पुढच्याक्षणाला.- तिच सर्व शरीर लाल रंगाची चमचती  धुळवाफ उडवत वटवाघळूत बदल्ल - व हवेतून उडत  जय जे छप्पर तोडून आत आला होता तिथून बाहेर पडली..         " तुलाच पहायचं होत बाई, काय मस्त रापचिक पीस होता !" जय स्वत:शीच निर्लज्जा सारखा हसला.        जयने पुन्हा समोर पाहिलं - तर तिथे एक सैतानी मजुर उभा होता - ज्याची जयला पाहून फाटुन हातात आली होती..        " मार खातो का ? पळतो आता . ?" जय ने अस म्हंणतच  वरचे दात , खालच्या ओठांत दाबत त्याला दम  दिला तसा तो   धुम ठोकून तिथून पसार झाला..         जयची नजर त्या कबरेवर पडली, त्या कबरेच्या झाकणात एक मानवी पंजा अडकला होता , ज्याने ते झाकण अर्धवट उघड होत - त्या उघड्या झाकणाच्या फटीतून पांढरी वाफ़ बाहेर येत होती..         जय त्या कबरीपाशी चालत आला - त्याने त्या कबरीच झाकण उघडलं - आतून थंडगार हिम वाफ अंगावर धावून आली, जरावेळाने आतील द्र्ष्य साफ  झालं -          जयच्या चेह-यावर  चौथ्या रक्षकाला पाहायची उत्सुकता , व काळजी मिश्रित छटा उमटली होती.          पांढरट वाफ़ बाजुला सरताच - जयला कबरीत एक नग्न अव्स्थेतला तरुण झोपलेला दिसला - ज्याच्या संपूर्णत अंगावर बर्फ पसरवलं होत , बर्फामुळे त्याची सर्व कातडी पांढरी फटक पडली होती..-          " आईशप्पथ बेंचो - ह्याला तर केल्यासारख साळपाट काढुन झोपावला आहे, भेंडी एवढ्या थंडीत कुल्फी सारखा गोठून  गेल असला तर हा ? जित्ता हाई का रे बाबा तू.. ! "    जय स्वत:शीच म्हंटला - तोच त्या तरुणाने  हळुच आपल्या दोन्ही जड पापण्या उघडल्या - त्याच्या निळसर डोळ्यांत अशक्तपणाची झलक दिसत होती..         " हेय ब्रदर ,  तू तर जिवंत आहेस- थेंक्स भोळेबाबा - !" जयने दोन्ही हात जोडत महादेवाचे आभार मानले..        त्या तरुणाच्या दोन्ही डोळ्यांना जयच्या हालचाली हसणारा चेहरा , आवाज , सर्वकाही मंद गतीने घडतांना दिसत होत - व ऐकू येत होत..               " हे बघ मी तुला वाचवायला आलो आहे , टेंशन घेऊ नकोस, !" जयने त्या रक्षकाच हात आपल्या हाती घेतल - दिलासा देत म्हंणाला.             जयने त्या रक्षकाच्या अंगावरच सर्व बर्फ बाजुला करत - खाली फ़ेकल.. मग त्याला त्या कबरेतून बाहेर काढल..        . " भाई  तूला कायतरी  घालायला द्याव लागेल रे , तुला असा नंगा  - पुंगा घेऊन गेलो तर ईज्जतचा पार कचरा होईल रे माझा - !"अशातच  जयची नजर  जरा बाजुला  खाली जमिनीवर मरुन पडलेल्या त्या हैवानी मजुरावर पडली..         जयच्या चेह-यावर विजयी स्माईल पसरली, त्याने हळूच डोळे मिटले व उघडले. तर समोर मरुन पडलेल्या त्या मजुराच्या अंगावरचे कपडे गायब झाले होते , व त्या रक्षकाच्या अंगावर घातले गेले होते..         " हा आता कसा दिसतोय हिरो, आता चल , निघूयात आपण..!"  जय हसत म्हंटला..        त्या रक्षकाला घेऊन  तो एक हैवानी मजुर ज्या दिशेने धावत गेला होता - त्याच दिशेने हे दोघेही निघुन गेले..                   xxxxx          " आह्ह्हह्ह्ह!" तो खविस  मार्शलकडे पाहून ओरडला - वेगान धप, धप- आवाज करत  पाऊले उचलत मार्शलच्या दिशेने धावत निघाला.         ईकडे समर्थांच्याही दिशेने तो  दुसरा खविस त्यांचा घात करण्याकरीता धावत निघाला -          एकीकडे दोन रक्षक तर दुसरीकडे दैवी रक्षक होते..-  दोघांनाही आप-आपल्या शत्रूंचा काटा काढायचा होता...-          ईकडे समर्थांनी आपल्या उजव्या हातांची मुठी समोर धरली -  तोंडावाटे दैवी मंत्राचा उच्चार केला -  समर्थांच्या मुखातून निघणा-या मंत्रासरशी , उजव्या हाताच्या मुठीतून गरम- वाफ बाहेर पडू लागली, हाताचा मिटलेला पंजा  लाव्ह्यासारखा तापला जात -चामडी लोखंड तापावा तशी लाल, भगवी, तपकीरी रंगाने उजळून निघाली, व पुढच्याक्षणाला त्या झाकलेल्या मुठीतून एक आग्नि गोळा बाहेर  पडला - झू sss असा आवाज करत , अणूबॉम्ब प्रमाणे पेटता लाव्ह्याचा तो आग्निगोळा  हवेतून वेगान पुढे जात त्या खविसाच्या छाताडावर आदळत फुटला गेला ,       '  धाड ' असा  आवाज होत - आगीचा लोट उडाला - त्या खविसाच्या देहाची जागीच राख झाली - ...         मार्शलने भुवया ताणत समोर पाहिलं -    तो खविस मार्शलपाशी धावत आला - त्या खविसाने आपल्या उजव्या हाताची मुठ मार्शलच्या थोबाडावर मारण्यासाठी पुढे आणली, तोच मार्शलने स्वत:ची कंबर  खाली झुकवली-         पुन्हा एकदा वेळ मंदहिन झाला - एक्शन मॉड  सुरु झाला - मार्शलने आपली कंबर उजव्या बाजुला जराशी वाकवली- आणी तत्क्षणाला त्याचवेळी उजव्या हाताची मुठ प्रकांड वेगान हवेला चिरत पुढे आणत - एक अप्पर कट त्या खविसाच्या हनुवटीवर फट आवाज करत बसवली-          पंचचा वार ईतका मेन पॉइंट वर बसला होता , की त्या खविसाच्या नाका- तोंडातून काळ्या घाणेरड्या रक्ताची धार बाहेर निघाली , व ते ध्यान  निर्जीव वस्तूप्रमाणे खाली जमिनीवर कोसळलं...      तसा  धप असा आवाज झाला..-  माती धुळ- हवेत उडाली..            मार्शलने  समर्थांकडे पाहिलं - त्यांचाही चेहरा त्याच्यासारखा  जखमांनी  काळा निळा होत सुजला होता -          " तुम्ही ठिक आहात !" मार्शलने विचारलं - त्यावर समर्थांनी फक्त होकार दर्शवला..-  मार्शलने सुकलेल्या गळ्यात आवंढा गिळला..      तेवढ्यात मार्शल - समर्थांची नजर समोर गेली,..         दूरुन जय एका तरुणाला आधार देत त्याच्यासोबत घेऊन येतांना दिसला.- ज्याच्या अंगावर काळा झगा घातलेला होता..        जय त्या तरुणाला घेऊन ह्या दोघांपाशी आला..-          आजुबाजुला  द्वंद घडून गेल्याचे चिन्ह दिसत होते..- त्या दोन खविसांचे मूडदे पडलेहोते ,समर्थ- मार्शल, दोघांचाही चेहरा मार बसून काळा निळा झाला होता , डोळा गाल सुजला होता..         " समर्थ - मार्शल तुम्ही ठिक आहात !" तृप्तेशच्या वाक्यावर - समर्थ - मार्शल दोघांनी फक्त हो करत मान हळवली..            " तृप्तेश कुठे आहे ?" जयला कुठेही तृप्तेश दिसत नाही हे पाहून तो म्हंणाला..             तसा मार्शलने थकलेल्या चेह-यानेच डावा हात - पुढे केला ..       " तो तिथे पडला आहे - " मार्शल खालावलेल्या स्वरात  म्हंटला.        "   ,ठिक आहे.. ! सो रक्षक मिळाला   आहे ,  सो फॉल बैक  टू सेफ झून नाऊ  .."  जय मार्शल - समर्थांकडे  खूश होत पाहत म्हंटला..          त्याच्या त्या वाक्यावर समर्थ  मार्शल-दोघांनीही - जय , मग रक्षकाकडे पाहत होकारार्थी मान हलवली..          व समर्थ आपल्या रक्षकांसहित रक्षकाला वाचवून पुन्हा सहिसलामत घरी परतले..         अशा त-हेने समर्थांचा पुन्हा एकदा विजय झाला..        क्रमश :                                                                                                   xxxx        xxxx