हा कथेचे नाव - मृतिकामय ( समर्थ ) गगनबावडी एक तीनशे - साडेतीनशे लोकवस्ती ( आबादी ) असलेल गाव ! गाव ईतकं मागासलेल होत , की ईथे साधी लाईट सुद्धा नव्हती , भारत सरकारची अद्याप ह्या खेडूत गावावर नजर पडली नव्हती, ज्या कारणाने आताच्या ह्या तंत्रज्ञानयुक्त युगातल्या सर्व सोयीसुविधांपासून हे गाव अजाण, भरकटलेल होत..- मोठ-मोठ्या बिल्डर्सचे सुद्धा गगनबावडी पर्यंत अद्याप लक्ष गेलेले नव्हते -म्हंणूनच गावाच्या अवतीभवतीच वीस किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल हिरवगार भिमाशंकर प्रमाणे दिसणार जंगल अद्याप जसंच्या तसंच जिवंत होत - सकाळ- संध्याकाळ ईथे पक्ष्यांचा चिवचिवाट चालायचा , वाघ , सिंह हिंस्त्र श्वापदे तर कधी-कधी गगनबावडीत सुद्धा येत असत - परंतू कधीही त्या हिंस्त्र प्राण्यांनी बावडीतल्या मणुष्यांना ईजा केल्याचे कानांवर ऐकू आले नव्हते... म्हंणायला गगनबावडी सर्व नैसगिर्क सुविधांनी नटलेलंच गाव होत - मग त्यात सर्व प्रकार आले , नदी, धबधबे- सकाळी ऊठल्यावर दिसणार गुलाबी धुक- थंडगार मनाला प्रसन्न करणारी हवा सर्वच.. परंतू मित्रहो निसर्गाला नेहमीचंच दोन बाजू असतात - हा गगनबावडी गाव जितक सकाळी सुंदर वाटायचं , तितकाच तो रात्रीच्यावेळी भेसूर, विद्रूप दिसायचं - जस जस आकाशातील सुर्याचा तेज फिका पडायला सुरुवात होई , झाडांच्या काळ्या पिशाच्छी सावल्या थयथयाट करत जमिनीवरुन हिडिस, अभद्र हैवानी नंगानाच करत खाली उतरायच्या , दिवसभर ढोळीतगडप होऊन बसलेला बटा-या लालभडक डोळ्यांचा तो अपशकूनी, अभद्र थोबाड्या घुबड न जाणे कसा संध्याकाळी येऊन गगनबावडीतल्या कौलारु छपरांवर बसून घुत्कारत असायचं - मृत्युची वार्ताहा घेऊन येणारी ती टीटवी गावातल्या प्रत्येक घराच्या छपरावरुन टीवटीव आवाज करत एक धोक्याची चाहूल लावून देत उडत जायची - महिन्याभरा अगोदरपासून ह्या विचीत्र घटना गावात घडायला सुरुवात झाली होती , बायका घरात देव्हा-यात दिवा लावायला बसायच्या, आण हे असले आवाज सुरु होत असत, दिवा लावून त्या तेळकट पिवळ्याजर्द दिव्याच्या तांबूस उजेडात देवांवर नजर टाकली तर सुरक्षितेची उभ नाही तर भयाची सुरुवात होई- त्या पिवळ्या दिव्याच्या भेसूर उजेडात देवांच्या प्रतिमा फार भयंकर रुप घेऊन बसल्यासारख्या वाटायच्या जणू- जणू देवांच्यात उर्जाच उरली नाहीये, आपण देव नाही तर सैतान पुजतो की काय असा भक्ताला भास होई- गगनबावडीत महिनाभराअगोदरपासूनच ह्या विचीत्र, अकल्पनिय, अकल्पित घटनांची संसर्गजन्य साथ सुरु झाली होती - गितेश - स्वप्निल , निखील हे तीन गगनबावडीतले बेरोजगार - बापाच्या पैश्यावर जगणारे , व्यसनात डुंबूण मेलेले युवक - म्हंणे गगनबावडीतल्या त्या पुराणा मंदिरात गेले होते! गगनबावडीतल्या लोकांची अशी समजूत होती - की पुराणा मंदिरात , पाताळगर्भांत नामक तळघरात भगवान शिवाने शेकडो वर्षांअगोदर एका रक्तपिपासू , नरलांडग्याला एका संदूकात कैद केलं होत , जे संदूक ह्या तीन हरामखोर, नाजायज बापाच्या पैश्यावर जगणा-या मुलांनी खोळलं होतं - व तो हिंसक , रक्ताचा भुकेला , हिंस्त्रनरभक्षकलांडगा पुन्हा सुटकांत झाला होता..- हे तिघे तर त्याच्या हातून हकनाक बळी गेलेच परंतू येताच त्याने गगनबावडीतही आपली दहशत पसरवली होती - महिन्याभरात तब्बल पंधरा लोकांचे मूडदे पडले होते - प्रेत कशी दिसायची तर ही अशी , फाटलेली पोट, त्यातून कीडण्या-पचनसंस्थेच्या नालीका मैग्गी सारख्या बाहेर आलेल्या, चेहरा अर्धवट दातांनी ओरबाटून मांस खाल्लेला- दोन्ही डोळे खोंबणीतून बाहेर काढ़लेले , जीभ अर्धवट खाल्लेली , हाता-पायांच्या मांसाचा लचका तोडलेला , भयंकर - भयंकर घातपाती मृत्यु पाहणारा अक्षरक्ष भीतीने लटालटा कापत असायचा , चड्डीतच मुतत असायचा - अश्यात ह्या घडणा-या विचीत्र घटनांमध्ये संध्याकाळ झाली की गावात चिडीचूप शांतता पसरली जात होती , गावची घरे जणु मुर्दा कब्र होऊन जात होत - घरांबाहेर पेटलेल्या मशालिंच्या तपकीरी , लाल-भकास प्रकाशात कोणी मुक्त संचार करत असेल तर ती फक्त घोंघावती हवा असायची.. रात्री -अपरात्री गावक-यांना घराबाहेरुन धप,धप पायांचा , तर कधी रानटी हिंस्त्र अशी घोग-या खर्जातल्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू येई, जणु ते जे काही होत ते हैवानी, तामसी- सैतानी शक्तिने ग्रासलेल होत ... गगनबावडीतली लोक फार भोळी होती ,त्यांचा आपल्या त्रिनेत्रधारी शिवावर फार माया होती - अतूट विश्वास होता. गावात एक पुरातन काळातल शिवमंदिर होत - महाशिवरात्रीच तो दिवस होता - सर्वगावकरी देऊळात जमले होते - सर्वाँनी शिवाला मनोभावे , गावात घडणा-या ह्या अघोरी,वाईट, भीतीदायक घटनांना विराम द्या अशी मनोभावे प्रार्थना केली होती.. ज्या भगवान शिवाने त्या हैवानाला त्या काळी ईथे कैद केलं होत . जरी कलियुगाच्या त्रेत्यांनी त्या हैवानाची पुन्हा सुटका केली असेल ,पन आपल्या भक्तांना वाचवण्याकरी तो पुन्हा येईल.. किंवा कोणालातरी नक्की पाठवेल - गगनबावडीतल्या लोकांना विश्वास होता - आपली प्रार्थना साकडा व्यर्थ जाणार नाही, तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या रुपार्थात येईल..- आणि आपल्या गगनबावडीला ह्या हैवानापासून तारेल..! म्हंणतात प्रत्येक काम सबुरीने होत नाही थोडीफार श्रद्धाही असायला हवी- महादेवाला साकड घालुन एक आठवडा उलटला असावा , आण तोच पुढच्या सोमवारी गगनबावडीत समर्थकृणाल यांच आगमन झालं- समर्थांच्या येण्याने सार गावखूश झाला होता , समर्थांना आदल्या रात्रीच दिव्यदृष्टीमार्फत साक्षात भगवान शिवानेच गगनबावडीत जाऊन तिथल्या लोकांची मदत कर असा दृष्टांत दिला होता..- आणी लागलीच पहाटे सहा वाजे दरम्यान समर्थ मुंबई शहरातून गगनबावडी गावात येऊन पोहचले होते - अंगात फुल बाह्यांचा भगवा सदरा , खाली पांढरी विजार - प्रसन्न चेह-यावर सदैव असलेल ते मंद स्मित हास्य - जे पाहताच जणु गगणबावडीतल्या लोकांच्या मनात एक सुरक्षित भावना निर्माण झाली होती , हा पुरुष साधारण नाही , ह्या पुरुषाला साक्षात शिवानेच आपल्या डोक्यावरच हैवानी संकट दूर करण्याकरीता ईथे पाठवलं आहे - लोकांची आपा-आपसात कुजबूज सुरु झाली होती..तोच समर्थांनी आपली ओळख करुन दिली. " नमस्कार मी समर्थ कृणाल, तुम्हा सर्वाँवर आलेल्या संकटाच अंत करायला आलो आहे , कृपया - मला तो पुराणा मंदिर दाखवा, जिथून ह्या अनाहूत घटनांची सुरुवात झाली आहे.!" समर्थांच्या वाक्यावर - गगनबावडीतले दहा-पंधरा मनुष्य जमले.. आताला संध्या काल व्हायला आली होती - उजेडाकरीता सर्वाँनी धगधगत्या मशाली- दिवट्या पेटवल्या .. ..- रात्रीच्या वेळेस स्मशानात एखादी मेलेल्या मांणसाची अंतयात्रा जायला निघावी तशी ही मांणस आणि त्यांसोबत समर्थ कृनाल पुराणा मंदिरच्या दिशेने निघाले .. जंगलातून चालत जाताना खालच्या तपकीरी मातीवर मशालीचा भडक असा भगवा जर्द प्रकाश पडत होता , आजुबाजुचा परिसर लक्खपणे उजळून निघाला होता..- रात्रीच्या कालोखात झाडांच्या आकाराना विविध भ्योत्पादक हिडिस- फिडिस, कृल्पती तामसी आकार प्राप्त झाले होते.- जंगलातल वातावरण परंतू किती वेगळं, साधा रातकीटकांचा कीरकिरण्याचा आवाजही ऐकू येत नव्हता - अगदी सारी पृथ्वीच काळ गोठल्यासारखी स्मशान शांतता पसरली होती ! दूर एका झाडावर बसलेला तो नाग ह्या मशाली दिवट्यांच्या ताफ्याला पुढे पुढे जातांना पाहत होता - काळ्या अंधाराने सुद्धा पाठ वळवली होती , हाच अंधार पाठ वळवून कोणालातरी काळ्या गर्भात दडवून आसरा देत होता , ते जे काही होत अंधारात लपून खेळ खेळत होत.. पंधरा वीस मांणस असून सुद्धा सर्व गावकरी भयबित झाले होते - ! कारण शत्रु सामान्य हाडा मांसाने बनलेला मानव नव्हता - तो एक नरभक्षक हैवानी लांडगा होता..- त्याची येण्याची चाहूल लागत नसे, मुंगीच्या आवाजाने , अंधाराच्या काळ्या पडद्याआड तो शिकार करत होता - चालता - चालता गावक-याना जंगलातल्या झाडाझुडपांच्या फांद्यांची सलसळ कानांना ऐकू येत होती ,... तसा भीतीने काळजात कस धस्स व्हायचं , जिव अगदी कंठात येऊन जायचा , हात पाय थरथरायचे , ज्वलंत मशालिंच्या तपकीरी भडक प्रकाशात भ्यायलेल्या त्या .. मांणसांचा चेहरा समोरच्यालाही भीतीने गर्भगळीत करत होता. चार -पाच जणांनी तर परतीची धाव घेत धुम ठोकली होती... कसेतरी सर्व गावक-यांनी समर्थांना पुराणा मंदिरापाशी आणलं... - " तुम्ही सर्व आता घरी परत जा !" समर्थ गावक-यांकडे न पाहता पुढे पाहत म्हंटले.. त्यांच्या चेह-यावर तेच ते मंद स्मितहास्य तरळत होतं.! गावक-यांनी समर्थांच्या पाठमो-या आकृतीला पाहून फक्त हात जोडले , व आले तसे मशाली दिवट्या नाचवत निघुन गेले - गडद धुक्याने त्या सर्व गावक-यांच्या आकृती गिळून त्यांना पार नाहिस करुन टाकलं.. . पुराना मंदिर म्हंणजे प्रथम दिडशे पाय-या ज्या वर वर जात होत्या - दिडशेव्या शेवटच्या पायरीसमोर दहापावळांवर एक पंधराफुट उंच भिंत होती , खाली मधोमध तीन फुट उंच , दोन फुट लांब अशी चौकट होती - त्याही पुढे एक मंदिराचा गाभारा होता, पण गाभा-यात मुर्ती नव्हती, फक्त चौकोनी आकाराच साडे तीन फुट उंचीच एक पेटारा होता , त्या पेटा-याच झाकण उघडलं - खाली जाणा-या पाषाणी पाय-या होत्या , ज्या पाताळगर्भांत नामक तळघरात घेऊन जायच्या.. समर्थांनी जागेवर उभ राहून त्या दिडशे पाय-यांकडे पाहिलं, त्या पाषाणी काळ्याकुट्ट पाय-या जणू नागमोडी अजगर भासत होतं - पांढ-या धुक्यांची सर्पचाल वाकडीतिकडी वाहत , पाय-यांवरुन वाहत जात होती.. समर्थांची तीक्ष्ण नजर वातावरणातल्या हालचाली टिपत होती, आजुबाजुला स्मशानशांतता , वातावरणात गुढ वाढवत होती..- ह्या अभद्र परिसरात समर्थांचे सिकस्थ सेंस अगदी तीव्रतेने उत्तेजित झाले होते - समर्थांनी आता सावध पवित्रा घेतला होता - दोन्ही हाताच्या मुठी घट्ट मिटल्या होत्या..- धोका कोठून ही होऊ शकत होता- आपण एकले स्वत:हून शत्रुच्या ईलाक्यात जात आहोत , एक एक पाऊल सावधगिरीने उचलायला हव होतं ..- अन्यथा जिवावर बेतणार हे विधिलिखित होत.. समर्थांच्या ओठांवर तेच ते मंद स्मित हास्य तरळत होत , त्यांनी एक कटाक्ष त्या पाय-यांवर टाकलं , व हळूचंच आपले डोळे मिटले..बंद डोळ्यांआड तोंडावाटे काही दैवी शक्ति मंत्रांचा उच्चार झाला असावा - कारण तोंडाची हालचाल झाली होती - पन त्या मंत्रांसरशी नक्की काय घडलं ? त्या दहा - पंधरा सेकंद उच्चारलेल्या संस्कृत भाषेतल्या मंत्रामध्ये असं काय शक्तिसाठा साठला असावा ? कारण जस समर्थांनी पुन्हा डोळे उघडले , त्या दिडशे पाय-या त्यांच्या पाठीमागे दिसत होत्या , त्या पाय-यांवर पांढरट धुक वाहत जात होते - आणि समर्थ ह्याक्षणाला शेवटच्या पायरीवर - थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या चौकटीत उभे होते - सदर घडलेला प्रसंग मानवाच्या आकळण क्षमते पलिकडचा होता - पन समर्थ काही सामान्य नव्हते - ते एक दिव्य पुरुष होते , अनैसर्गिक, अमानवीय हालचाली करण्याची त्यांच्यात क्षमता होती - एकंदरीत ईतकंच समजा , समर्थ हे तुमच्या समजण्या पलिकडचे होते- सर्वशक्तिमान, अलैकीक- दैवी शक्तिचा पंचमहाभुतांच्या शक्तिचा साठा त्यांच्या देहात वसला होता , असं कोणतच काम नव्हत जे ते करु शकत नव्हते..- परंतू आपल्याला मिळालेल्या ह्या दैवी देणगीचा वापर फक्त समाज हितासाठी व्हावा - ही समर्थांची शिकवण होती, नाहीतर त्यांनी ही शक्तिचा दुरुपयोग नसता केला ? असो - समर्थांना नाव ठेवणारे खुप आहेत जलकुट कुठचे , पुढे पाहूयात ! समर्थांनी त्या समोरच्या तीन फुट चौकटीतून आत प्रवेश मिळवला , आत आले - समोर वीस पावळांवर मंदिराचा गाभारा होता - त्या गाभा-यात तो चौकोनी पेटारा दिसत होता- " हंम्म असं आहे तर !" समर्थांना त्यांच्या दैवी दिव्य दृष्टीने लाभलेल्या नजरेने त्या पेटा-याखाली जाणारा मार्ग दिसत होता - सामान्य मानवाला फक्त तो लाकडी पेटारा दिसेल - पण समर्थांना मात्र शक्तिने आतील सर्वकाही नजरेस पडत होत..- आजुबाजुच्या वातावरणात एक एंटीटीची उष्ण, वाईट धग जाणवत होती- समर्थांच्या धोकासुचक मनाला ह्या अवतीभवतीच्या प्रदेशात एक वेगळेपणा जाणवत होता.. समर्थ चालू लागले - चारही बाजूना एक मोकळा परिसर होता -खाली पाषाणी फरश्या होत्या - ईथे जुन्या काळात जेव्हा मंदिर सुरु होत - तेव्हा भक्त ध्यान लावून बसत असत - भगवंताच्या उपासनेकरीता बसत..- पण आता सर्वकाही भक्कास पडल होत , ह्याक्षणाला मंदिराच्या अवतीभवती त्या मोकळ्या वातावरणा वरुन अमन्वी अंश धुके वाहत होते..- आणि त्याच धुक्यात तीन काळ्या अभद्र , छीन्नविछीन्न -फाडलेल्या , देहाचे ते विद्रूप आत्मे भटकत होते.. ते आत्मे म्हंणजे तीच ती तीन मुल होती - ज्यांनी त्या वाईट, कैद शक्तिला मुक्त केलं होत.! ती शक्ति ईतकी निर्दयी, महापापी होती- की तीने त्या मुलांच्या आत्म्याना मरुणही सुटका बहाल केली नव्हती , ते भटकत होते , फिरत होते - रडत विव्हळत होते.. समर्थांनी त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता - चालत गाभा-याच्या दिशेने आले..- ह्या गाभा-यात ती शक्ति दबा धरुन बसली होती..- समर्थ गाभा-याच्या दरवाज्यासमोर उभे होते , त्यांची तीक्ष्ण नजर त्या पेटा-यावर खिळली होती..- समर्थांनी मनात काहीतरी अपेक्षित अस घडेल असा विचार केला होता - आणि तेच झालं , तो पेटा-याचा झाकण हळके हळके उघडला जाऊ लागला - त्या उघडत्या झाकणाच्या फटीतून हलकासा चकचकीत पांढरा शुभ्र प्रकाश , व सफेद वाफ बाहेर पडत होती - त्या वाफेसहितच हवेत एक घाणेरडा मांस कुजल्याचा वासाचा भपकार घुमू लागला होता..- अचानक वेगान ते झाकण उघडलं - मागे मागे जात एक मोठा धाड असा आवाज होत आदळल.. तो आवाज त्या शांततेत संपुर्णत परिसरात मयताच्या पालखीत वाजणा-या फटाक्या सारख अशुभ,मनी धडकी भरवत्या स्वरात गुंजला.. हा झालेला प्रकार शत्रुला घाबरवण्याकरीता होता - परंतू समर्थ? ते काही घाबरले नव्हते.. त्या उघड्या पेटा-यातून शुभ्र चंदेरी प्रकाश , व ती हिम वाफ वेगान बाहेर पडत होती - ती हिम वाफ एक भीतीचा आभास करुन देत होती , की आत कोणीतरी आहे ..! तोच त्या पेटा-याच्या उघड्या तोंडातून एक सहा फुट उंचीचा अभद्र काळआकार एक अमानवी मृत्यूझेप घेत बाहेत पडला.. व पुढच्याक्षणाला धप्प असा आवाज करत तो नरभक्षक लांडगा जमिनीवर आला.. त्याचे दोन्ही पाय एक फुट लांब होते , दोन्ही पायांच्या बोटांना तीन इंच चार टोकदार सूळ्यांची बोट होती, पायाच्या पंज्यापासून वर वाकलेलेले दोन - दोन फुट उंचीचे गुढघ्याएवढे पाय होते - त्या पायांच्या वर दोन फुगीर मांड्या होत्या - वर कंबर - मग सपाट पोट, पुढे ती भक्कम बांध्याची केसाळ छाती, मग खांद्याच्या डाव्या उजव्या बाजुला दोन तीन फुट लांबीचे बलदंड काळे फुगीर बाहूचे हात - आणी त्या हातांच्या दोन्ही पंज्यांना होती- लांबसडक बोटांची धार- धार, रक्तपात , मांस चिरणारी नख- व त्या हातापासून शरीरामधोमध होत - एक खुंखार , अभद्र- पिसाटलेल्या ,वखवखत्या - हिंस्त्र नरलांडग्याच शिर -.. वी आकाराचा चेहरा, मागे चोपून बसवलेले काळे केस - टोकदार कान -जबडा सदा वासलेला होता त्यातून ते धार धार तीक्ष्ण दंतांच दर्शन घडत होत , व एक गुरगुर बाहेर पडत होती.. डोळ्यांची ती खूनशी लेझरप्रमाणे चकाकती नजर समर्थांवर खिळली होती.- त्यात द्वेष, जलन, अहंकार, क्रोध- बदलण्याची तिरस्काराची भावना घुमसत होती. हाच तो हिंस्त्र ,पापी नरलांडगा होता - - त्याच हे रुप भयंकर , पाश्वी - प्रतिस्पर्धी शत्रूच्या मनात मृत्यूभय- धडकी भरवणार होत..- लढ्याची वेळ झाली होती , त्रिविक्रम उर्फ समर्थ युद्धात उतरले होते.. ! त्रिविक्रम म्हणजे त्रिलोकांवर विजय मिळवणारा सम्राट आधिपती होय चारही दिशेना वातावरणात व्हू व्हू व्हू आवाजात हवा वाहत होती..- जणु ही हवा ह्या लढ्याचे प्रेक्षक होते - जे लढा सुरु होण्या अगोदर दोन्ही योद्धयांना चेव चढवत होते. त्या हैवान नरलांडग्याचे तीक्ष्ण धार धार धगधगते लालविस्तवी डोळे समर्थांवर खिळले होते - " तू ? कोण आहेस तू ? !" त्या नरलांडग्याने आपला काळा फेसाळता , हात वर केला घोग-या आवाजात विचारलं. " मी समर्थ ?" ते गड़गडाटी आवाजात , न भीता म्हंटले. " अच्छा , म्हंणजे तू त्या गावक-यांचा वाली मला मारायला आला आहेस तर !?" " होय खासच -!" समर्थ ठामपणे म्हंटले... " ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" समर्थांचा हा दृढविश्वास पाहून त्या हैवानाला हसू आवरेनास झालं ,- " हे कलियुग आहे , कोणताही भटू - भटूर्ड़ीण, बाबा- मांत्रिक मला मारु शकत नाही, तो एक म्हाद्या होता , पन तो तर आता येऊ शकत नाही.. हह्ह्ह्ह्ह्ज!" ते हैवान आसुरी आनंदीत होत म्हंटलं.. " होय पाहूच!" समर्थ आपली धारधार नजर त्या हैवानावरुन न हळवता म्हंटले.. त्या सैतानी लांडग्याच्या जबड्यावर एक छद्मी, क्रूर, आसुरी आनंदीमय हसू चिटकलं होत. हा आनंद आपल्याला कोणिही हरवू शकत नाही ह्याचंच होत. " भट्या !" तो नरलांडगा एवढ बोलून जरा वेळ थांबला - मग पुढे बोलू लागला. "स्वप्न भ्रमात राहण ही चांगली गोष्ट नाही, सत्य हे विचारधारे पेक्षा फार वेगळं असत - तू जे काही आता म्हंणालास ते सार तुझं एक भ्रम आहे , मला कोणीच मारु शक नाही - कारण माझं देह, आणि आत्मा दोन्हीही अमर आहेत..!" त्या सैतानाच्या ह्या बोलण्यात गर्विष्ठपणा जाणवत होता - - हा साधारणसा भटू आपल्यासनोर काय चीज आहे ? ह्याला सूद्धा आपण अलगद हरवू ! परंतू शिकारी जसा सावजासोबत खेळ करुन , मज्जा घेत मारतो तसा ह्यावेळेस ह्या समर्थांना मारण्याचा त्या हैवानाच डाव होत ; म्हंणूनच तर ही भाषणबाजी सुरु होती. त्या हैवानाच्या ह्या वाक्यावर समर्थांनी फक्त एका गालात हसत नाही नाही करत मान हळवली..- " ह्यात हसण्यासारख काहीच नाही भट्या , उलट मी तुला एक चान्स देतोय , चल चालता हो ईथला - मी तुझे प्राण बक्षतो जा. !" तो हैवान समर्थांना प्राण बक्ष ऑफर देत म्हंणाला.. - तो नरलांडगा शांत उभा राहून आपल्या लाल डोळ्यांनी समर्थांच्या उत्तरार्धाची वाट पाहत होता. समर्थ खेदाने हसले - मान नाही नाही करत हळवली. " मरणाला मी कधीचंच घाबरत नाही , कारण मी भक्त आहे महाकालचा !" समर्थ मान वर करत छाती फुगवत म्हंटले... " भटूरड्या मला आवाहन करुन तू मृत्युला हाक मारतोयस , माझ्या ईमानाला धुडकावून तू माझा अहंकार डिवचलायेस , पन मला मारशील कस ? मी तर अमर आहे..!" तो हैवान गडगडाटी आवाजात गरजला.. त्याच्या त्या वाक्यावर समर्थांनी आपला पवित्रा बदल्ला , ते जागेवर लढवय्या पावित्र्यात उभे राहिले..! " - मला ठावूक आहे , सर्व ठावूक आहे - तुझी आत्मा अमर आहे , हे सुद्धा मला ठावूक आहे..- म्हंणूनच तर , मी काल रात्री - पुराण ग्रंथांतल्या गहि-या गुढ माहितींना एकत्र करुन , अमरत्व आत्म्याला ईजा पोहचवतील अश्या शस्त्रांची माहिती काढलीये - आणि काय आश्चर्य!" पाहता -पाहता , समर्थांच्या डोळ्यांत चमक आली- ओठांवर एक मंद स्मित कुत्सिक हसू फुटलं.. " मृतिकामय ग्रंथात मला एक मंत्र मिळालं , ज्या मंत्राने मी कोणत्याही शस्त्रास हाती घेऊन उच्चारताच ते शस्त्र तुझ्या ह्या आसुरी मृतीकामय देहावर आघात घालुन तुला ईजा पोहचवू शकेल , व मला तुला कैद करण्यास कसलाही अडथळा येणार नाही.. आता तू ज्या ज्या निष्पाप लोकांची हत्या केलीस त्या सर्वाँचा बदला आता हा समर्थ घेईल..! " समर्थ ह्यांच्या शब्दांत कमालीच राग, द्वेष उफाळून भरलेला दिसत होता..- त्या नरलांडग्याच्या डोळ्यांत भीतीची लय दिसत होती - तो भ्यायला होता का ? की ते भय खोट होत ? कोणास ठावूक ! समर्थांनी उजवा हात वर आकाशात धरला - त्या हाताची बोट मिटली, डोळे बंद केले.- तोंडातल्या तोंडात मंत्राचा उच्चार सुरु झाला..- "भग भंग भुंगें -अहंमं- त्तसंम - सुवांक्ष्चेरं- भग, भगं - त्रागोत्ररी - क्लिष्टे उर्जाहैंतं sss ! " समर्थ ह्यांच्या मंत्राला धार होती - ते शब्द मुखातून बाहेर पडत होते - त्या शब्दांना जणु वजन होत - चेतना होती, त्यांना जिव होता , वातावरणातला बदल त्यांच्या शक्ति उर्जेच आस्तित्व दाखवून देत होता..- त्रिविक्रम ह्यांच्या त्या मंत्रांसरशी हवेत धरलेल्या पंचमुठी भोवताली , वर्तुळाकारात एक निळ्या रंगाची उर्जा साठली जात होती , तीचा निळसर विजेसारखा फेसाळता चर्रचर्र आवाजा आणी तो प्रकाश त्रिविक्रम ह्यांच्या अंगावर - आजुबाजूला खाली- जमिनीवर पडला होता.. त्यांच्या त्या हातावर उमटलेल्या प्रकाशावर निळसर फेसाळता प्रकाश उमटला जात तेज झिरपत होता, एक विजेचा शॉर्ट सर्किट झाल्याचा आवाज ऐकू येत होता.. - मंत्रासरशी शस्त्र तैयार होत , होत..- त्या मंत्रांनी शस्त्राला आकार प्राप्त होत होत.. - शक्ति एकवटत चाललेली.. " भुगे,भग्न-भागोदरी - औंह्ंम मृतिकामिणीयंम - भग भुगे भग्नोदरी भट,फट, शक्तीं प्रधार मृतिकामय स्वाsssssssss हा sss!" समर्थांच्या शेवटच्या श्ब्दासरशी.. खाडकन त्यांनी डोळे उघडले - त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या कडा जांभळ्या रंगाने उजळुन निघाल्या होत्या - त्या जांभळ्या बुभळांत गुलाबी रंगाचे ठिपके होते..- हात-पाय, डोक, सर्व शरीर शुभ्रधवल प्रकाशाने उजळून निघालं होत , हाताच्या तळव्यापासून ते खांद्यांपर्यंत सोनेरी रंगाची पातळसर प्रकाशीत धुळीकण बाहेर पडत होती.... त्या नरलांडग्याने ह्या द्रुष्याला पाहता तो भीतीने म्हंणा किंवा प्राणभयाने पन तो दोन पावळ मागे सरला - त्याची ती विस्फारलेली नजर समर्थांच्या हवेत धरलेल्या हातावर खिळली होती..- समर्थांच्या पंचमुठीत शस्त्र धरलं होत- एक तीन फुट लांबीची दंडआकाराची निळसर रंगाची हाडाप्रमाणे जाड़जुड काठी होती , काठीच्या दोन्ही टोकांना खाली आणि वर असे एक एक डाव्या आणी उज्व्या बाजुला पंख्यासारखे - पण लोखंडी तीक्ष्ण धार धार पाते होते - हे दोन्ही पाते शस्त्र हवेतून फेकताच ते भिंगत शत्रुच्या देहावर आघात करुन पुन्हा शस्त्र वापरकर्त्याच्या दिशेने परत आणायचं काम करायचे.. - शस्त्राच्या मधोमध - जिथे समर्थांच्या शस्त्र पकडलं होत - तिथून तो निळ्या रंगाचा प्रकाश झिरपत बाहेर पडत होता.- कारण तिथे आत एक मणी दडल होत..- आज ख-या अर्थाने सैतान लांड़ग्याची परिक्षा होती - समर्थ ह्यां समवेत मृत्युकामय शस्त्र होत - त्या हैवानाला ह्या मंत्राबद्दल ठावूक होत ? होय खासच त्याने मृत्यूकामय ग्रंथ काळात वाचलं होतं , त्याच्या बुद्धीत आठवणींच्यात त्या मंत्राबद्दल माहिती होती - ह्या मंत्राने आत्म्याला यातना देतात येतात, मारहाण केली जाते - त्यासहितच हे सूद्धा वाचलं होत की म्रुत्युकामय ह्या मंत्राच्या वापराने सिद्ध केलेले जास्तीत जास्त शस्त्र हे यमदेवतेच्या नरकात पापी आत्म्यांना त्रास, सजा देण्यासाठी राक्षसांतर्फे वापर केला जातो - ह्याचा अर्थ त्रिविक्रम आपल्या आत्म्याला सुद्धा यातना देऊन - मार , मारु शकत होता. त्यासहितच त्या हैवानाला हे सुद्धा ठावूक होत किह्या शस्त्राने फक्त हाणी होइल, अंत नाही. " समर्था, हरामजाद्या - हरामी! एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेव ? की ह्या मृत्यकामय मंत्राने तू जे शस्त्र अभिमंत्रित केलं आहेस - ते फक्त मला यातना पोहचवू शकतात !" आपला उजवा हात उंचावत , पंज्याची ती काळशार तर्जनी समर्थांच्या दिशेने केली. " हे मृतिकामय शस्त्र माझ समाप्ती काळ मुळीचंच ठरु शकत नाही- मला अंत नाही!" त्या नरलांडग्याने आपले दोन्ही हात हवेत धरले. " मी अंधकार अमर आहे - मी काळाचा काळ आहे, मी एकला सर्वश्रेष्ठआहे ..- मज अंत नाही, मुळीचंच नाही !" त्या नरलांडग्याने आपल डोक वर हवेत करत - गडगडाहाटी, गुंजत्या आवाजात - आसुरी आनंद व्यक्त करत हसायला सुरुवात केली.. " हहहहहहहहहह..!" त्याचा आवाज संपुर्णत पुराणा मंदिरात घुमला जात , गगनबावडीच्या कानाकोप-या पर्यंत जात गुंजत होता. हवा सुद्धा जणु त्याची हेर झाली होती - वा-याच्या गतीने वेग पकड़लं होत - ईकडे समर्थांनी वर धरलेला उजवा हात विजेच्या वेगान खाली आणला - तो हैवान अद्याप दोन्ही हात हवेत उचलून हसतच होता.. समर्थांनी उजवा पाय पुढे केला , डावा पाय एका रेषेत मागे नेहत - पायाची टाच वर केली, डावा हात पुढे आणत - तर्जनी मध्यमा ह्या दोन बोटांमार्फत डावा डोळा बंद करत , उजव्या डोळ्याने तर्जनी , मध्यमा ह्या दोन बोटांमार्फत नेम धरत पुढे पाहिलं - पंचवीस पावळांवर हवेत हात करुन हसणारा येहूधी उभा दिसत होता - समर्थांनी उजवा हात मागे नेहला - त्या हातात मृतिकामय शस्त्र धरल होत - तोच शस्त्र त्यांनी - कैप्टन अमेरिकाच्या चिलखताप्रमाणे त्या सैतानाच्या दिशेने फेकला.. शस्त्राला असलेल्या खाली आणि वर ह्या दोन पातांमार्फत हवेत संतूलन साधत - तो मृतिकामय सजस्त्र - व्हव,व्हव,व्हव- असा आवाज करत हवेतून खाली वर होत - जमिनीवरची सोनेरी माती उडवत - तीव्र वेगान त्या नरभक्षकापाशी पोहचला - तेवढ्याचक्षणाला त्या हैवान नरभक्षका लांडग्याला हवेत उडत काहीतरी वेगान आपल्या दिशेने येत आहे , असा आवाज कानांवर ऐकू येऊ लागला..- त्याच्या चेह-यावरच हसू विरल दोन्ही हात झटक्यात खाली आले , मान खाली आली - आण जशी खाली आली- त्याच्या छाताडावर मृतिकामय शस्त्राचा वार बसला - धान्न्नsss असा चिलखतावर लोखंड आदळाव तसा आवाज झाला , तपकीरी रंगाच्या ज्वालामुखीतून लाव्ह्याचा उद्रेक व्हावा तश्या ठिंणग्या उडाल्या - त्या सैतानाच्या छाती जवळचा भाग विस्तवासारखा तापून ऊठला होता - तेवढ्या जागेवर एक फुट लांबीची आडवी चिर तैयार झाली होती. - धगधगती,विस्तवासारखी चकचकती- " आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" त्या हैवानाची आत्मा मरणासन्न किंकाळी फोडत ओरड़ली - त्याच्या छाताडावर वार करुन ते शस्त्र एक फिरती गिरकी घेत , हवेतून व्हव,व्हव,व्हव असा आवाज करत पुन्हा समर्थांच्या हाती आलं... त्या हैवानाने आपला थरथरता काळ्या वाफेचा उजवा हात त्याच्या छातीजवळ झालेल्या वारावर ठेवलं - ती तेवढी जागा जणु विस्तव चिकटल्याप्रमाणे झालेली आतून तपकीरी लाल विस्तव घुमसत होता.. " ईययह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" पुन्हा एकदा शरीरात होणा-या वेदनेना आरोळीमार्फत त्या हैवानाने बाहेर काढलं.. वीस सेकंद , फक्त वीस सेकंद त्या वेदनेचा काळ होता , मग त्या छातीवरची आडवी चिर, मंद -मंद होत विझली..- वेदना गायब ! परंतू ते वीस सेकंद फार भयंकर वेदना दायक होते..- " बोलण बंद करुन युद्धास सुरुवात केली तर बर होइल,नाही का?" समर्थ तिखट स्वरात उच्चारले. त्या नरभक्षकाचा रागाने तिळपापड होत होता , अहंकार दुखावला डिवचला जात होता - हा साधारणसा त्रिविक्रम आपल्याला - आपल्याला पुकारतोय, आपल्यावर वार करतोय? त्या आपली नजर जरा उजव्या दिशेला टाकली, जरा दूर वीस पावळांवर एक तीन फुट उंच, आणि चार फुट रुंद गोलाकार अस सोनेरी रंगाच वाळूने बनलेल दगड होत .. त्या हैवानाने आपला उजवा हात त्या दगडाच्या दिशेने केला , पुढच्याक्षणाला काहीतरी आश्चर्यकारक,चमत्कारी , विलक्षण घटना घडली.... समोरचा दगड कंपने पावत थरथरत हळला , हळुचंच जमिनीवरुन - एक इंच, दोन इंच, तीन इंच अस करत वर वर उचल्ला जाऊ लागला , चार फुटांवर येताच त्याने उजवा हात वेगात उजव्या दिशेहून उजवीकडे आणत सरळ धरला - तोच ह्या क्रियेने ते दगड वेगान थर्माकोलप्रमाणे हवेतून उडत समर्थांच्या दिशेने फ़ेकल गेल- समर्थ आधीच तैयार होते - त्यांनी हातातिल मृतिकामय शस्त्र , त्या दगडाच्या दिशेने हवेत भिरकावल.. व्हव,व्हव,व्हव- असा आवाज करत ते शस्त्र व दगड दोघेही एकमेकांवर आदळले - ' फट ' असा आवाज झाला , त्या सोनेरी वाळुच्या दगडाचा हवेत चक्काचूर झाला, सोनेरी वाळुची बारीक बारीक धुळ उडाली, व त्याच धुळीतून व्हव,व्हव,व्हव आवाज करत गरागरा भिंगत मृतिकामय शस्त्र पुन्हा समर्थांच्या दिशेने परत आलं .. उजवा हात वर करत त्यांनी तो हवेतच मध्य भागी पकडला. " ह्याय् न्हाय्य!" तो हैवान चिडला ,.गरजला..- " नरभक्षका !" समर्थांनी त्या नरभक्षक लांडग्याकडे पाहिलं - त्याची ती लाळेलाल नजर - विस्तवगात तापली होती. " हे असे पोकळ वार करण्यापेक्षा तूला नाही वाटत ? की आपण जरा हात पाय चालवूयात !" समर्थ म्हंटले..व तोच त्यांनी आपल्या हातातल्या मृतिकामय शस्त्रासहित त्या हैवानाच्या दिशेने धाव घेतली..- " आर्घ्ह्घ्ह्ह घ्ह्घ्ह्ह्ह्हर्र्र !" त्या हैवान नरलांडग्याने - तोंड वर करत आकाशात पाहून , विचीत्र स्वरात त्रिकाळ गर्जना ठोकली.... उभा आसमंत दणाणून शहारुन ऊठला , वातावरणातली हवा थरथरली- सत्य- विरुद्ध असत्याचा रोमहर्षक लढा सुरु झाला - दूर एक पाषाणी दगडावर एक हिरव्या रंगाचा सरडा बसलेला , त्या सरड्याचे लाल डोळे, त्या दोन्ही डोळ्यांत काळे ठिपके होते.. - त्या डोळ्यांनी तो सरडा दूर त्या दोन हालचालीमय आकारांना पूढे पुढे येतांना पाहत होता.. - जणु ते आकार आता भिडतील, एक द्वंद सुरु होईल.- भयंकर रक्तपाती - एकमेकांच्या जिवावर बेतणार द्वंद..! " हर हर हर महादेव sssss!" समर्थांनी महादेवाचा जयघोष केला - नरलांडगा , हात- पाय जामिनीवर आपटत वेगान समर्थांच्या दिशेने येत होता - त्याच्या त्या धार.- धार हाता पायांच्या नखांनी खालची सोनेरी वाळू वर हवेत उडत होती.- धप,धप,खालची वाळू पायाने वर उडवत , समर्थ त्या नरलांडग्याच्या दिशेने धावत जात होते - उजव्या हातात मृतिकामय शस्त्र धरलं.. समर्थ -नरलांड़ग्यापाशी पोहचले - उजव्या हातातील शस्त्रावर डाव्या हाताची पकडत देत तो शस्त्र त्यांनी वर हवेत उचल्ला- व तोच तिप्पट वज्राघाती वेगान खाली आणत नरलांडग्याच्या छाताडावर मारणार , तोच त्या सैतानीरुप नरलांडग्याने आपले दोन्ही हात छातीवर गुणाकारात धरले - ' ठणssss!" असा आवाज होत- मृतिकामय शस्त्र - नरलांडग्याच्या हातांवर बसल- तत्क्षणाला जादूई मंत्राने आभिमंत्रित झालेल्या त्या शस्त्राने आपली कमाल दाखवली.. त्या हातावर निळ्या, जांभळ्या रंगाच्या असंख्या लहान-लहान ठिंणग्या उडाल्या गेल्या.. वाईट शक्तिवर - जर सत्याच्या शक्तिचा वार झाला तर काय होईल, हेच जणु त्या शक्तिने दाखवून दिलं.. त्या नरलांडग्याच्या हातावर निळसर - जांभळ्या रंगाच्या ठिणग्या उडाल्या , व सर्व शरीराला एक जोरदार , महाशक्तिशाली धडक बसली - तो हैवान जागेवरुन हवेत मागे सात फुट उंच उडाला - धप्प आवाज करत जमिनीवर कोसळला.. त्याच्या दोन्ही काळ्याकुट्ट हातांवर तप्त विस्तवधारी खून उमटली होती - एकेप्रकारे ती जखमच म्हंणा... तीच्या वेदनेसरशी " आर्र्घ्ह्घ्ह्र्र्र्र.. !" ते ध्यान जबड्यातले ते तीक्ष्ण काळेकुट्ट पाषाणी दंत बाहेर काढत त्रिकाळ गर्जणा फोडत चिरकल- वीस सेकंद होऊन जाताच वेदनेचा अंमळ नाहीसा झाला.. तसे तो नरलांडगा पुन्हा जागेवर उठून उभा राहीला - .. त्याची ती विस्तवी धगधगती दोन डोळ्यांची नजर त्रिविक्रमवर खिळली होती , उजव्या बाजुला गाल रागाने, क्रोधाने फडफडत होता - दोन्ही गुढघ्यापर्यंतचे पाय वाकले होते - हातांच्या धारधार काळ्याकट्ट नखांचा चाळा सुरु होता.. " आर्घssss !"पुन्हा एकदा किंकाळी फोडत - ओरडत ते ध्यान - कुत्र्यासारख हाता-पायांवर तीव्र जलद वेगाने धावत समर्थांच्या दिशेने निघालं.. समर्थ ह्यांनी दोन्ही डोळे बारीक केले- समोरुन तो नरलांडगा रुपी येहूधी हैवान , खालची सोनेरी वाळू हाता -पायाने वर हवेत उडवत - वेगाने त्रिविक्रमच्या मानेचा लचका तोडायला येत होता.... तोच समर्थांपासून दहा पावळ दुरुन त्याने हाता-पायांवर सर्व शरीराचा जोर देत - जागेवरुन एक उडी घेतली- सर्व शरीर हवेत झेपावल - ईकडून समर्थांनी सुद्धा धाव घेतली, पाच पावळ चालून होताच - दोन्ही पायाचे गुढघे वाकवले , जमिनीवरुन गुढघ्यांमार्फत सर्वशरीर घसरवत पुढे नेहऊ लागले - तत्क्षणाला वेळ-काळ सर्वकाही मंदावलं गेलं , जणु काळाच्या चक्र गोठले - सर्वकाही स्लोमोशनने घडू लागलं.. - 0:25xच्या व्हिडिओचा नजारा सुरु झाला.. त्रिविक्रम ह्यांच्या नजरेला आपल्या डोक्यावरुन तो नरलांडगा हवेतून पुढे जातांना दिसत होता - त्याची ती काळीकुट्ट हैवानी काया भयंकर दिसत होती, धार - धार नखांचे हात- पाय हवेत होते.- परंतू त्या राकीट नरलांडग्याच्या चेह-यावरचे ते दोन तप्त, विस्तवधारी, निखा-यासम पेटलेले डोळे खालून सरपटत जाणा-या समर्थांवद खिळले होते - तोच समर्थांनी दोन्ही हातातील मृतिकामय शस्त्र हलकेच वर धरल, मृतिकामय शस्त्राची पात वर हवेतून पुढे पुढे जाणा-या त्या नरलांडग्याच्या पोटात रतली..- टरा , टरा, एका रेषेत पोट फाडत तो नरलांडगा पुढच्या दिशेने निघुन गेला - तोंडावर जमिनीवर कोसळला... समर्थ तसेच जमिनीवरुन पुढे सरपटत गेले , मग लागलीच वरच सर्वशरीर तोळ सांभाळत उभ केल- जागेवरच एक गिरकी घेतली.. मागे वळून पाहिलं.. त्या नरलांडग्याच्या पोटाखालच फाटलेल दोन फुट एका रेषेतल भाग तपकीरी विस्तवधारी रंगाने उजळुन निघालेल..- जमिनीवर पाठीवर पडलेल्या अवस्थेत ते ध्यान वेदनेन तळमळत होत - त्याच्या तोंडून हदय पिळवटुन आक्रोश सुरु होता ! त्याच्या तोंडून एक निघणारी एक नी एक वेदनादायक किंकाळी अंगावर शहारा आणत होती.. समर्थ जागेवर उभ राहून पाहत होते - वेदनेचा काळ संपत आला तसे - पोटावर उजळुन निघालेली ती चिर हळु हळू भरु लागली.. - त्या नरलांड़ग्याच्या शरीराची थरथर थांबली होती - हळुहळु नरलांडग्याच रुप अशक्त होत चाललं , फुगीर बलदंड बाहूचे हात -पाय, छाती , त्या हातांवरच्या नख्या, ते चेह-यावरचे कान, नाक, जबड्यातले दात हळुहळू आत खेचले जात होते , हात -पाय हवा निघाल्यासारखे लहान -लहान झाले , सर्व शरीर काटकुल झालं - अगदी एका रोग्यासारखी अवस्था .. मग शेवटला ते दोन तप्तविस्तवधारी डोळे , थंड -- थंड होत विझले , त्या डोळ्यांमध्ये आता फक्त दोन सफेद रंगाचे राखेचे गोळे होते..- समर्थ न घाबरता - न भीता , थाट छातीने चालत त्या नरलांड़ग्यापाशी पोहचले - त्रिविक्रम खाली पाहत होते - त्यांच्या नजरेसमोर तो अशक्त नरलांडग्याचा सांगाडा पडला होता - " चांडाळा खुनीकदंत ! " समर्थ गडगडाटी आवाजात बोलू लागले .शेवटी तूझ्या कर्माच फळ तुला भोगायला आलंच ज्या ज्या निष्पाप प्राणांचा तू बळी घेतलंस - आज त्या सर्वाँच्या आत्म्याला सुटकेची धग मिळेल .. !" समर्थांनी मृतिकामय शस्त्र दोन्ही हातांच्या पंज्यात पकडलं..- कू-हाड़ लाकडावर आपटावी तसं ते शस्त्र दोन्ही हातांत पकडून वर नेहल- हवेला कापत वेगान खाली-खाली आणायला सुरुवात केली, जशी जशी कू-हाडीची पात खाली खाली येत होती - ती पात विस्तवासारखत होती , जणु तप्त भट्टीतून बाहेर काढली आहे - ती तप्त जर का त्या हैवानाच्या त्या काळ्या पाषाणी अभद्र आत्म्यावर आपटली, तर अक्षरक्ष दोन तुकडे होतील..- हवेतून खाली- खाली येत असतांना त्या पातेतून सून्न असा मंद आवाज येत होता - शेवटच्याक्षणाला ती पात त्या अशक्त सांगाड्याच्या अगदी छाताडाजवळ फक्त एक फुटांवर येऊन पोहचली व पुढच्याक्षणाला सप्पक आवाज करत त्या हैवानाच्या छाताडाजवळची चामडी मांस फाडत ती तळवार आत घुसली.. समर्थांनी उजव्या हाताचा तळवा सरळ धरला - " तुझी कैदेची वेळ झाली, घनआत्मशोषक प्रगटम !" समर्थांच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा प्रकाशसाठा निर्माण झाला , त्या निळसर प्रकाशात लहान-लहान चमकीली निलि,हिरवी धुळीकण फिरू लागली- त्या धुळीकणांनी एका घनाकार क्यूबचा आकार धारण केला - व त्या हातात ते घनआत्मशोषक यंत्र तैयार झालं ... त्या नरभक्षक लांडग्याच्या सर्वशरीराच गुलाबी राखेत रुपांतर झालं , ती गुलाबी चमचमती राख - हवेतून नागमोडी वळणे घेत घनआत्मशोषक यंत्रापाशी आली- व त्यात सामावली गेली.. शेवटी समर्थांनी गगनबावडीतल्या लोकांच्या डोक्यावरच नरलांड़ग्याच्या खूनी पंज्याचा अंत केला होता.. गगनबावडीतल्या लोकांना तारुन ते पुन्हामुंबईला आश्रमात निघुन आले - समाप्त :