Samarth Aani Bhoote - 8 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | समर्थ आणि भुते - भाग 8

Featured Books
Categories
Share

समर्थ आणि भुते - भाग 8

समर्थ कथा :   

    जहरी अंश !   म

 

        दूरवर पसरलेल ते घनदाट जंगल, रात्रीच्या चंद्राच्या श्रापित उजेडात  , आपल्याआत काही विषारी अंश दडवून बसल्याची साक्ष देत होता.. 

 

        " व्हउऊउऊ sssss..!"   उंच वृक्षावलयांनी  घेरलेल्या त्या घनगर्द वनातून एका रानटी श्वापदाची विव्हळ बाहेर पडली. 

 

    उभ्या नागड्या आकाशात वाहणा-या नागमोडी  वा-याच्या संपर्कात येऊन तो विव्हळ फुटी बेक्कार , भयाने ग्रासलेला आवाज दूर दूर पर्यंत वाहत गेला.. 

 

        निळभद्र आकाशात वर्तूळाकार बसून खाली भुतळाकडे पाहत होत - 

 

        त्याच्या नजरेला ती वर्तुळाकार दगडांच्यात , होळीसारखी लाकड रचून पेटवलेली  शेकोटी दिसत होती . 

 

       तपकीरी रंगाची आग  लाकडांना खात सुटली होती, आगीच्या झोततून  भगव्या रंगाच्या निखा-यामय लहानसर ठिंणग्या बाहेर पडत होत्या ...  जरा वर जात हवेत विरुन जात होत्या - त्यांची क्षणार्धात  हवेत सफेद राख होत होती ... तीच राख हवेत उडत वर वर जात होती.. 

 

        शेकोटीभवती समर्थ कृनाल, मेनका, गबलू तिघेही बसले होते . 

 

        आगीचा तांबडसर प्रकाश ह्या तिघांच्या चेह-यावर पडला होता , शेकोटीच्या उष्णतेने हिवाळ्यातील गारवा जाणवत नव्हता.. 

 

       गबलू मेनका दोघांच्या मागे तीन टेंट लावले होते , त्याही पूढे घनगर्द हिरव्या झाडीच जंगल होत -  

 

       तर समर्थांच्या मागे एक पन्नास मीटर अंतराव सरळ रेषेत पुढे वाहत गेलेली , शंकपुष्पा नदी होती.. 

 

        - नदीच्या काळ्यापाण्यावर चंद्राची गोळ आकार प्रतिमा उमटली होती. 

 

        "  ए मेनका तुला कैम्प फायर स्टोरीज ऐकायला आवडतात का ? !?" गबलूने मेनकाला विचारलं .

 

        " एं ते काय असत ?" मेनकाने न समजून म्हंटलं . 

 

        समर्थ कृनाल फक्त त्या दोघांच बोलण ऐकत होते. 

 

        त्यांच्या चेह-यावर तेच ते निर्मळ मंद स्मितहास्य झळकत होत.

 

        " अंग म्हंणजे , पाच सहा पोर नदी किनारी अशी शेकोटी पेटवून  गोल घोळका करून बसतात , आणी रात्रभर भुतांच्या गोष्टी सांगितल्या जातात .!" गबलू मेनकाला समजावत म्हंटलं .

 

        " चल मग आपण पण गोष्ट सांगूयात कैम्प फायर प्रमाणे,!" मेनका उत्साहित होत म्हंणाली. 

 

        त्यावर गबलूच्या चेह-यावर हसू फुटलं.

 

        " हो ठीके ना !" एवढ  बोलून होताच अचानक गबलूचा हसरा चेहरा पडला ..

 

        " काय रे काय झालं ? असा चेहरा का पाडलास ?" मेनकाने न समजून विचारलं .. 

    

 

         त्यावर गबलू म्हंटला. 

 

        " मला गोष्ट नाही आठवत हिहिहिहिही!" 

गबलू दात काढत हसू लागला.. 

 

         " अरे नॉट प्रोब्लेम , आपले समर्थ आहेत ना ? समर्थांनी आजतागायत शेकडो हजारो भुत , पिशाच्च, हैवान, राक्षस कैद केली आहेत , त्यांच्याकडे अनुभव असेलच ना !" अस म्हंणतच गबलू, मेनका दोघांनाही मोठ्या  आशेने समर्थांकडे पहिलं ... 

 

        त्या दोघांकडे पाहून समर्थ स्मित करत हसले , व होकारार्थी मान हळवत म्ह्ंटले.. 

 

        " बर ठिक आहे , सांगतो मी गोष्ट ऐका तर !"  समर्थ गोष्ट सांगायला तैयार झाले.. 

 

       गबलू , मेनका दोघांचही उत्साह शिंगेला पोहचला , गबलूने दात काढत हसत - दोन्ही हाताचे तळवे चोळले व समर्थांकडे उत्सुकतेने भरलेल्या नजरेने पाहू लागला.. 

 

        समर्थांनी उजव्या हातात - बाजूलाच जमिनीवर तोडलेल्या  लाकडांच ढिग मांडलेल तिथून एक  तोडलेल लाकूड उचल्ल्ं व शेकोटीत टाकलं .. 

 

        तसा सुक्या लाकड्याला चट चट आवाज करत आगीने खायला , आपल्या गर्भात  गिळायला सुरुवात केली व ईकडे समर्थांनी आपल्या भारदस्त, गंभीर , गुढ आवाजात गोष्ट सांगायला सुरुवात केली ... 

 

        रातकीटकांचे किरकिर, व शेकोटीची उब, व प्रकाश एक भयाचा आस्वाद चखवू लागला..

 

        ..

        

 

        नंदनराव  बावनकुळे  वय चाळीस , पेशाने ते एका मोठे कंपनीचे मालक , बडे असामीच.

त्यांच्या परिवारात पत्नीच एका अपघाटात आकस्मिक रित्या मृत्यू झालेला - आपलंस म्हंणायला त्यांना फक्त  एकुलता एक मुलगा विनीश होता......

   

 

    नंदन हे जरी बडे असामी असले तरी त्यांच स्वभाव म्हंणायला सरळमार्गी होता , आठवड्यातून सात दिवस न चुकता देवधर्म - उपास , तापास - चालू असायचं , अस समजा देवाचे सच्चे भक्तच - देवचारीच.!. 

 

   महिन्यातून एकदा तरी गरीब,  गरजूना ते मदत करत - भुकेजलेल्या मानवाची भुक ते पुण्य म्हंणुन भागवायचे , . त्यांनी कधीही मदत मागायला आलेल्या  मदतकर्त्याला खाली हात  जाऊन दिलं  नव्हत किंवा , कधी अपशब्द वापरले नव्हते.  उलट ते मोठ्या मनाने म्हंणायचे " मनात जे काही असेल ते बिनधास्त माग "  त्या गरीब मांणसांच आशिर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी असायचं ...त्याचंच हे पुण्य फळ म्हंणा की आणखी काही पन त्यांची कंपनी भरभराट   नफा कमवत होती.

 

     .पैश्यांची कमी म्हंणाल तर कधीच लाभली नव्हती. ईश्वराच्या  कृपेने सर्वकाही सुरळीत सुरु होत.

 

  नंदनरावांच्या मुलाच नाव 

 विनित  बावनकूले वय 15 ! 

विनित   सध्या नववी ईयत्तेत शिकत होता.- खुप हूशार मुलगा , अभ्यासात तर नेहमीचंच हूशार होता , त्यासहितच दरवर्षी  परिक्षेत तीन नंबर मधील , कोणत न कोणत नंबर काढत असायचा...  

 

समर्थांनी एक कटाक्ष गबलू , मेनकाकडे टाकलं - त्यांच्या चेह-यावर गंभीर भाव होते , आगीचा प्रकाश, आजूबाजूचे आवाज त्या गंभीरतेला गडदता आणुन देत होते. 

 

       "  पुढे  काय झालं ? कृणाल?" 

गबलू उत्स्कूत होत म्हंटला.

       

समर्थांनी एक मोठा श्वास आत ओढ़ला व पुढे सांगू लागले..

 

 

        अशातच विनितला  मे महिन्याची सुट्टी होती.- मे महिना म्हंणजे  सुट्या आल्या, मित्रांसोबत वेगवेगळे खेळ आले..

 

        विनित गावातल्या एका रानातल्या 

 स्टेडीयमवर क्रिकेट खेळत होता - मैदानाच्या चारही बाजुंनी रान होत , मे  च्या उन्हाच्या झल्यांनी रानातली झाडे वाळली होती..  - चारही दिशेना पसरलेल ते रान रोगिटलेल्या रोग्यासारख भासत होत. 

 

        रात्रीच्या अंधारात मात्र ह्या झाडाना अजुनच भयावह रुप प्राप्त होत - असे!

 

         ह्या झाडांच्या काटकी  फेंदरलेल्या फांद्या

चेटकीणीच्या पंज्यांच रुप घेत असे..- तर खोड काटकी देहाच..!  

    झाडांभोवती चमकणारे जुगणू, त्या चेटकीणीच्या वखवखत्या नजरेच काम करत.!

    

 

      विनितला त्याच्या टिम कैप्टने  श्रेत्र रक्षणावर  दूर उभ ठेवल होत.!  

 

        पर्ंतू बॉल काही त्याच्याकडे टोळावला गेला नव्हता - जरा वेळाने प्रतिस्पर्धी टीमची खेळी संपली..   

 

        तसा विनित टिमकडे जायला निघाला तोच न जाणे कोठुन , अचानक वातावरन भाळल गेलं , स्वच्छ आकाशात काळे ढग  शिरले ,   सूर्य काळ्या ढ़गांआड़ दडला  . हळू हळू हलक्याश्या कालसर छटेने वातवरणात मळभमय रंगू पसरु लागल होत. 

 

        त्या काळ्या ढगांकडे पाहता विनितच्या मनाला कसल्यातरी धोक्याची चाहूल लागली..

 

  

        समर्थांनी  मेनका, गबलू दोघांकडे पाहिलं - 

 

        " एक गोष्ट लक्षात ठेवा,  आपल्या समवेत जर पुढे काही वाईट घडणार असेल - तर मन हे धोक्याची घडी ओळखून देत , जर कधीही मनाला अशी बिकट परिस्थिती जाणवली,  तर ती वाट बदलावी - तो निर्णय बदलावा , कारण मानवी चेतना संस्था ह्या कधीच भासात्मक धोका ओळखत नाहीत , त्यात सत्याचा अंश असतो.., मागे काहीतरी कारण असत.!" समर्थांच्या वाक्यावर मेनका - गबलू दोघांनी फक्त होकारार्थी मान हळवली..

 

 

        समर्थ गोष्ट पुढे सांगू लागले..

       

 

   विनीत जिथे उभा होता , त्याच्या मागे   सुकलेल्या झाड झुडपांनी वेढलेली जागा होती. - त्या झाडांच्या उंच राक्षसी कायांनी   अंधार पाडला होता.  आजुबाजुला  झाडांव्यतिरिक्त काहीही नव्हत. 

 

 

        विनित जागेवरच उभा होता , त्याचे मित्र व प्रतीस्पर्धी टीम त्याच्यापासून दूर  उभे होते.

     

 

           तेवढ्यात त्याच्या कानांवर तो  चिरकस , खर्जातला   आवाज आला.  विनितची पावले जागेवर गोठली थांबली..

विनितच्या बाळमनात त्या आवाजाकरीता एक जिज्ञासा, उत्सुकता  निर्माण झाली.  

 

"कसला आवाज आहे हा ?" तो स्वत:शीच म्हंटला.

 

        तोच पुन्हा तो आवाज आला..- 

जमिनीवरचा पाळापाचोळा पायांनी तुडवावा असा.. 

 

        सर, सर, चर, चर! 

 

        

        डाव्या अशुभ बाजुने तो आवाज येत होता. 

 

  झाडांच्या उभ्या जंजाळातून  तो आवाज येत होता.  झाडांच्या गर्दीत आत काहीतरी घडत होत -  अभद्र ,  अघोरी असं ..! 

 

विनितने त्या आवाजाचा पाठलाग केला. डाव्या बाजुला वळण घेत , चढ चढत तो झाडांच्या गर्तेत शिरला , दहा-बारा पावल चालून तो त्या झाडांच्या इलाक्यातून चालत जाऊ लागला .  

 

        त्याच्या चारही बाजूना ती मोठ मोठी  उंच , पिशाच्छी देहाची  काटकूळी झाडे उभी होती- खुनशी नजरेने त्याच्याकडेच पाह्त होती.. 

 

        जणू मानवी आस्तित्व  त्यांना बोचत होत ?     खाली लाल - तपकीरी मातीची जामिन होती-

 

        उन्ह असूनही  अवतीभवती  जरासा   गारठा  जाणवत होता.  - मध्ये कोठूनतरी पांढर धुक येऊ लागलं..

 

        मोठ मोठाल्या स्तब्ध उभ्या झाडांची कालिशार सावली अंगावर झडप घातल्यासारखी , अंगावर पडतीये की काय असं वाटत होत. 

बालमनाचा  विनित  आता ह्याक्षणाला  एका  अश्या ठिकाणी उभा होता- ज्या ठिकाणी  चेटूक,करणी, भानामती, अश्या विविध विधींची क्रिया केली जाणार तामसी ,अघोरलेल, मंडळ.. मैदान होत..   

 

        

आनिशाच्या समोर एक भलमोठ्ठ काटेरी  बोरीच  झाड होत -  बोरीच्याच्या झाडाच्या फांद्या जाडजुड होत्या-   वाकड्या तिकड्या अवस्थेत वेताळासारख्या खाली तोंड़ वर पाय अश्या अवस्थेत लोंबत होत्या -  

 

        त्या काटेरी झुडपांच्या फांद्यांना लाल-पिवळ्या दो-यांनी  काचेच्या बाटळ्या बांधल्या- अटकवल्या होत्या,   आणि त्या बाटळ्यांमध्ये काळे केस, कुठे गोल घडी करुन टाकलेले.फोटो कोंबून ठेवले होते .

 

         झाडाची सुखलेली पाने तुटुन  खाली जमिनिवर  मेलेली चित्तेत जळुन गेलेल्या काळ्या कोळश्यासारखी खच होऊन  पडली होती- त्यांचा पाळापाचोळा  अवतीभवती मृत शवांच्या कबरींसारखा साचला होता.

 

 

        झाडाच्या खाली  काही काही अघोरी , जादू - टोण्याच ते विचीत्र, भयकारक दृष्य दिसून येत होत.

 

       त्या जागेत घाणेरडा, कुजकट, आम्ळी, ओकारियुक्त दर्प दरवळत होता, विनितने नाकावर हात ठेवल आणि आजुबाजुला पाहू लागला.. 

 

       त्याच्या बालमनाला हे अघोरी दृष्य  , मोठ गंमतीदार , आवडीच वाटत होत.

 

 

        एक काल्या रंगाचा पाषाणी ,   दोन फुट उंच असा चौकोनी आकाराचा बोरीला   टेकवून  उभा करून ठेवला होता.- त्या पाषाणावर लाल, पिवळा,  बुक्का ओतला होता.  सफेद चुन्याने वटारलेले डोळे चित्तारले होते -  त्या चित्तारलेल्या डोळ्यांमध्ये काळे ठिपके  वठवले होते..-  

 

        डोळ्यांखाली लाल  रक्ताने जबडा कोरला होता..-  त्यातून बत्तीस बूता-यासारखे दात बाहेर आलेले दाखवले होते..- 

 

        पाहणा-याला वाटेल हे ध्यान तर जिवंत आहे.!

 

        खाली गोलसर पानांच्या पत्रावल्यांच्यात लाल-पिवळा कुंकू - त्यावर  टाचण्या टोचलेले पिवळे , काळे  लिंबू ठेवलेले,  तुकडे केलेले कच्चे  मटणाचे मांस,हाताच्या पंज्या एवढ्या काळ्या बाहूल्या  , तर कुठे काळ्या बिबव्यांची माळ, कुठे उडीद ..

 

        तर झाडांच्या खोडांवर जिवंत मांणसांचे फोटो टाचण्या टोचून अडकवले होते.  फोटोंवर गुणाकाराच्या फुळल्या मारल्या होत्या..आणि त्यांपुढेच अगरबत्या , पेटुन ठेवल्या होत्या.. कुठे मेंबत्त्या  लावल्या होत्या. वशीकरण-जारण, मारण असल काहीतरी अभ्द्र प्रकार होता का हा ?  

 

     झाडापासून  जरा  हिरवी झुडपे होती , नकळत विनितची नजर त्या झुडपावर पडली तस ते झुडूप, ती पाने सळसळू लागली, जणु आत काहीतरी दबा धरुन बसलेल , पानांची सलसळ वेगान वाढत होती. 

 

        हवा , वारा काहीही वाहत नव्हत मग ती झुडपे कशी सळसलत होती..- 

 

    तोच त्या झुडपांतून एक विन धडाचा बोकड, धावत विनितच्या दिशेने आला..- व त्याच्या पायाखालीच पड्ला . 

 

        बोकडाचा गळा चिरला होता- त्यातून  जाड,पातळसर नसा  लालसर रक्ताने माखल्या जात बाहेर आलेल्या , खालच्या पाळा  - पाचोळ्यावर रक्ताचे शिंतोडे उडालेले,  सडा  साचले होते- 

 

        त्या काळ्या बोकडाच्या देहातुन शेवटची हालचाल तडफड  फडफड होत  होती. 

सर्व शरीराला हादरे बसत होते  , तो घडणारा भयंकर ह्दय पिळवटून टाकणारा  प्रकार विनित डोळे फाडुन, तोंडाचा आ- वासून पाहत होता... 

 

        तोच त्या बोकडाच्या हालचालीने काहीस लाल रक्त विनितच्या  तोंडात उडाल...  मंद गतीने , तोंडातून थेट घश्यावाटे शरीरात प्रवेशल.. 

 

        तत्क्षणाला , विनितच्या डोळ्यांसमोर अंधारी आली, डोक गरगरल्यासारख वाटत आहे , आताच आपला तोळ जाईल , आपण बेशुद्ध होऊ , असं वाटू लागलं - 

 

       सर्वशरीर थंड पडलं , श्वास वेगान आत बाहेर होऊ लागले.-  हाता पायाला मुंग्या आल्या- परंतू दोन मिनिटेच हे सर्व बदल जाणवलं होत -  

 

        मग सर्वकाही पहिल्यासारख झालं , ती संवेदना आली तशी निघुन गेली. 

 

        " पण कृनाल , विनितला मध्ये हा बदल का घडलं होत !"  गबलूने समर्थांना प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं . 

 

        त्यावर समर्थ म्हंटले. 

 

        "  कारण  वाईट शक्तिचा जहरी अंश , विनितच्या देहात प्रवेशला होता -त्याचंच  एक  तो पुरावा होता. " समर्थ स्पष्टीकरण देत म्हंटले. 

 

        " अच्छा म्हंणजे समर्थ, त्या बोकडाच्या देहातून जे  विनितच्या तोंडात पडलेल रक्ताच थेंब होत तोच जहरी अंश होता तर , ज्याने विनितच्या शरीरात तो बदल झाला होता !" मेनका आपली बुद्धी लावत म्हंटली. 

 

     " बरोबर मेनका !" समर्थांनी दुजोरा दिला.

        

        त्यावर -  गबलूने सर्वकाही समजल्यासारखी  होकारार्थी मान हळवली..  

 

      समर्थ पुढे  सांगू लागले..

 

    "    करणी, भानामती -जादू-टोणा करणा-यांच क्षेत्र होत ते. त्या इलाक्यात काळ्या अघोरी , विदेचे प्रयोग जादू टोणा- टोटका केला जात होता , दुस-याचे यश पाहू न  शकणारे ईथे येऊन मुठ मारत,  वशिकरण, करणी असे वाम मार्गी, अघोरी तामसी, भीतीदायक अघोरी क्रिया करायचे, सैतानी देवाला कोंबडा , बोकड़ वगेरे बळी म्हंणून चढवायचे, तसंच कोणितरी तो बोकड  नैवेद्य म्हंणून किंवा, उतारा म्हंणून त्या तिथे उपस्थित अभद्र सैतानी शक्तिस चढवला होता. 

 

  समोर बिन धडाच तडफडत ते बोकड पाहून विनित भ्यायला, अद्याप त्याच्या शरीराची पुरेपूर वाढ ही झाली नव्हती - की हे असलं भयंकर  रक्तपाती द्रुष्य नजर आत दडवू शकेल..  

 

         विनितने लागलीच भीतच तिथून काढत्स पाय घेतला. 

 

        " येस , म्हंणजे विनित सुखरुप घरी परत आला तर ? आणि कथेची चांगली एंड़ झाली ..! हिहिहीहीही!" गबलूने आनंद व्यक्त करत.दोन्ही हाताच्या टाळ्या  वाजवल्या.... 

 

        दात काढत समर्थ, मेनका कडे पाहू लागला. 

 

        " नाही गबलू !" समर्थांनी गंभीर नजरेने गबलूकडे पाहिलं .

 

        "  एक गोष्ट तू विसरतो आहेस -  की विनितच्या अंगातच तो जहरी अंश शिरला होता , ह्याचा अर्थ तो जरी त्या जागेतून बाहेर पडला असला , तरी तो जिथे जाईल तिथे ती  अशणार होती..- मग त्या जागेतून जरी तो बाहेर पड़ला तरी काय फायदा, कारण ती अमानवीय किड तर विनितच्या देहातच वसली गेली होती ना..! विनित जागेतून त्या एकटाच बाहेर पडला नव्हता तर...त्याच्या मागे काहीतरी आल होत.  मुळीच नव्हे त्या रक्तामार्फत  तीच्या आत्म्याशी त्या अमानविय शक्तिचा संबंध प्रस्थापित झाला होता. जोडला गेला ,एकरुप झाला होता."   

 

      काहीवेळातच विनित  घरी पोहचला.. 

घरी आल्यावर त्याने आपल्या आईला सायलीला घडलेला घटनाक्रम सांगायचं ठरवलं होत , परंतू सायलीबाई बाहेर गेल्या होत्या , घरात फक्त नोकर होते..

 

    आई आल्यावर आईला हा प्रकार सांगू असं ठरवून विनित  अभ्यास करायला बसला..

आणि अभ्यासात तो ईतका गुंतून गेला की घडलेला प्रकार आईला सांगायचं होत हे तो पार विसरुन गेला..  

 

      

   रात्रीच  जेवण  खावन करुन विनित आपल्या दुस-या मजल्या झोपायला निघुन गेला .

 

        शाळा, अभ्यास , डोक्यावर ताण पडत  नाही का ? बैडवर पडताच विनितला झोप लागली..!

 

        

त्याच रात्री विनीतच्या बंगल्याबाहेर काहीतरी घिरट्या घालत होत. 

मध्यरात्रीच्या तीनच्या प्रहाराला .. अचानक त्या स्मशान शांततेत घुबडेचा घुत्कारण्याचा आवाज ऐकू येत होता. 

" व्हू,व्हू,व्हू!"  अशुभ संकेत घेऊन येणारा हा काळ प्राणी घुबड , ह्या वेळेस ओरडण म्हंणजे अशुभ होत..नक्कीच त्याला काहीतरी दिसत होत का? किंवा कोन्या अशुभाची तो चाहूल लावून देत होता?    

 

        "समर्थ!" मेनकाने समर्थांकडे पाहिलं "नक्कीच  त्या  घुबडेला विनितच्या देहात घुसलेल्या त्या वाईट शक्तिची जाणिव झाली अशणार म्हंणूनच ती बंगल्याबाहेर घिरट्या घालत होती.!." 

 

        " होय बरोबर , मेनका!  मुक जनावरांच्या नजरेला निसर्गामार्फत लाभलेल्या शक्तिने ह्या गोष्टींची उपस्थिती मानवापेक्षा लवकर  जाणवते..!" समर्थ म्हंटले. 

 

         " मंग पुढे काय झालं ? त्या शक्तिने विनितला काही अपाय केला का ? विनित वाचलं का ? काय झालं पुढे ?" 

गबलूने  उत्साहित प्रश्नार्थक नजरेने समर्थांकडे पाहिलं..   

 

        शेकोटीतली आग हळू हळू कमी-कमी होत होती, आजुबाजुला असलेला अंधार हळु हळू समर्थ, गबलू, मेनका तिघांनाही गिळणकृत करायला पुढे येत होता.. 

 

    तोच   समर्थांनी पुन्हा बाजूची दोन  लाकड  उचलून शेकोटीत टाकली , हवेत आगीचा एक भडका उडाला.. 

 

        जवळ आलेला अंधार चित्कार करत दूर पळाला , तपकीरी प्रकाशाने मेनका - गबलू दोघांचेही  गुढ भयबीत चेहरे उजळुन निघाले... 

 

        समर्थांनी एक गुढ स्मित हास्यासहित मेनका गबलूकडे पाहिलं... व पुढे म्हंटले.

 

        "  काळोख हा विनाशकारी आहे ,  त्याहून कालोखात वाढलेले , कालोखाचा आसरा घेऊन शेकडो वर्ष भटकणारे ते पिशाच्छी आत्मे फार भयंकर आहेत ,  म्हंणतात अपघाती,अत्याचार अकाळी, म्रित्यू पावळेला मनुष्य पिशाच्छ योनी धारण करतो - आणि असा  हा आत्मा सततच 

एका चांगक्या मानवी आत्म्याच्या शोधात  असतो , एकदा का ह्या पिशाच्छाला तसा झाड मिळालं की हे लागलीच - धरतात ,  तसंच विनितला एका पिशाच्छाने धरलं होत..- 

विनितच्या मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या , आणि   पावसाळ्यात विनितच्या शाळेतल्या मुलांची सहळ माथेरानच्या एका  धबधब्यावर गेली होती.! 

 

       एक दिवस त्यांचा माथेरान मध्ये स्टे होता -

टेंटमध्ये सर्वजण राहणार होते..! 

 धबधब्यावर एंन्जॉय करुन सर्व मुल  दमून भागूब शांत आप-आपल्या टेंट मध्ये झोपी गेली होती. 

 

      मुलांच्या दंगा मस्तीने गजबजलेली टेंटच्या भवताळची जागा ,आता मुल झोपताच शांत  झाली होती.   मुलांच्या आवाजाने कमी  वाजत असलेली रातकीटकांची किरकीर  हो आता , अभद्र आवाज करत मोठ्याने  वाजत होती..

 

 

        हवेने आजूबाजूची झाडे  सळसळत होती-  उघड्या वातावरणात थंड हवा वाहत जात होती.

 

         कानांत शिल घालून  जात होती. 

टेंटच्या आत असलेले पिवळे दिवे  विझवले होते. 

 

         गुडूप  अंधार पसरला होता.   मुल मुली व शिक्षक   सर्व मुल झोपेच्या आधिन झाली होती.

 

माथेरानच्या  घाटातुन   वेड्यावाकड्या रस्त्यावरुन नागमोडी वळण घेत अहोरात्र वाहणांच्या पिवळ्या हेड़लाईट फिरत जातांना दिसत होती.    

 

    रात्रीचे  बारा  झाले होते.  

 अचानक एका टेंटमधील लाईट लावली गेली..  

 

" काय झाल रे कशाला ऊठलास ?"  टेंटमधू न मुलांची कुजबूज ऐकू येत होती.

 

" लघवीला जायचं होत !" 

आतून विनितचा आवाज आला..

      -

 

त्या टेंटमध्ये नक्कीच विनित सुद्धा होता.

 

हळूच टेंटची चैन उघडली , तसा   विनितच्या  अंगावर हिम मोर्गमधली  हवा धावून आली.त्या थंड हवेने   त्याच्या अंगावर मुळाच्या देठापासून शहारा उमटला.

 

         टेंटच्या उघड्या दरवाज्यातून तीन -मुल बाहेर आली त्यात - विनित सुद्धा होता.. - 

 

        त्याने हातात एक पिवळी बैटरी धरलेली..

       पिवळ्या बैटरीच्या प्रकाशाने  काला अंधारी आकार उजळून निघत होता.

 

        पाऊस थांबलं होत , आजुबाजूला मंद पांढरट धुके वाहत होते , अंगाला थंडी झोंबत होती..

  

विनित आपल्या दोन चार मित्रांसोबत टेंट  पासून जरा दूर झुडपांत आला ,आता समोर  झाडझुडपांची उभी मृत बाजू होती. झाडांभोवताळून थंड हिमवाफ धुक वाहत जात होत.. 

 

        पावसाच्या पाण्याने खाली चिखल तैयार झालं होत , आकाशातल्या चंद्राच्या उजेडात त्या झाडांच्या सावल्या अंगावर धावल्यासारख्या भास होत होता. 

 

        वरच्या आकासातून नभ उतरल्यासारखे   हळकस पांढर धुक घेऊन चारही दिशेना पडला होता..

रातकीड्यांची किरकिर मंद गतीने वाजत होती.

     एक अपरिचित डर का एहसास दे जा रही थी.

        त्याच झाडाझुड़पांवर न जाणे कोठे ते अभद्र घुबड  बसुन घुत्कारत होत. "व्हूऊ,व्हूऊ,व्हूऊ"  कमरे इतक्या झुड़पांत न जाणे कसली"सल,सल, "   ऐकू येत होती? कुणास ठाऊक! 

 

 

       विनित  जरा दूर आपल नित्यकर्म आटोपत होता. त्याचे मित्र तो पर्यंत  त्याला न सांगता पुन्हा   टेंटपाशी निघुन  आले होते..

 टेंटेबाहेर. उभ राहून वाट पाहू लागले होते..

 

फ्रेश होताच   विनितने जीन्सची चैन लावली .

 

        .बरोबर आणलेल्या सेनिटायझरने त्याने हात स्वच्छ केले व व मित्रांकडे जायला निघणार तोच

 

" विनित !"  अवतीभोवती पसरलेल्या धुक्याच्या पातळसर  रेशमी पडद्याला चिरत तो , संमोहिंत करणारा मधाळ गोड़ स्वरातला आवाज आला. 

 

         विनितची पावले जागीच थांबली.  त्याने वळून मागे पाहील.  पुढे पांढ-या धुक्याच्या वलयांतुन निलगीरीच्या झाडांची ती तमाम गर्दी उभी होती. 

 

        जिकडे पाहाव तिकडे निलगिरीची ती पांढ-या खोडांची भुतासारखी  बुटकी झाडे उभी होती. आणि तिथूनच तो आवाज आला होता ना ? 

 

" कोण आहे ऽऽ?"   विनितने आवाज दिला. त्या अंधा-या स्मशान शांततेत आवाज घुमला. एकक्षण   विनितच्या अंगावर सर्र्कन काटा उभा राहीला. दिलेल्या ओ आवजास प्रतिउत्तर आल नाही हे  पाहून

विनित पुन्हा माघारी वळला..

 

" खिखिखिखी,हिहिहिह!   विनित ऽऽऽऽऽऽ"   

 

विनितच्या कानांत ते अभद्र , हिडिस हसू आण ती हाक, कानांतुन थेट काळजास भिडली.  त्या गर्द अंधाराला पाहून मोठ्या मांणसाची सुद्धा पाचावर धारण बसेल, तर तो विनित  -तेरा -चौदा वर्षाची पोर काय चिज होती? 

 

        समर्थांनी एक गुढ , गंभीर वटारलेल्या डोळ्यांची नजर गबलू मेनकावर टाकली..  

 

        त्या दोघांच्याही चेह-यावर शेकोटीच तपकीरी प्रकाश चित्तारला  होता , ज्या प्रकाशाने त्यांचे चेहरा भय- भेसूरपणे उजळुन निघाले होत्र..

 

" को..को..कोण आहे?"  विनितचा थरथरता आवाज . 

 

" मी !"    घोगरा खर्जातला आवाज. त्या आवाजात , गुर्मी होती- अहंकार होता.

 

" म..म...मी कोण?"   विनितने थरथरत्या आवाजात विचारत म्हंटल.

 

" पाहायचं मला, हिहि,...हिहि!"  त्याने  आमंत्रण मागल होत, 

 

त्या  वाक्यावर विनित काहीही बोल्ला नाही. त्याच्या बाळ मनाला सुद्धा त्या धोक्याची चाहूल लागली होती.

 

        .हो म्हंणालो आणि काही वेगळच समोर आल तर?हिडिस, कृल्प्ती, अमानविय,अनैसर्गीक काहीतरी? 

जे बाहेर येताच न जाणे काय करेल?  लढा देन म्हंणजे निव्वळ मुर्खपणा!  ते विचार तर सोडाच पन त्याच ते लहानग मन त्या कुरुप, अभद्र रुपाच ! काया स्वरुप  दृष्य तरी पेलू शकणार होत का?  

 

        अंधाराने जन्माला घातलेल ते ध्यान त्याच्या नुसत्या रुपानेच काही जणांच्या धडधड़त्या ह्दयात कळ मारुन मृत्यू होतो..

 

" वि ऽऽऽऽऽनूऽऽऽऽ! ये...ऊऽऽऽऽऽ काऽऽऽ मी ! हिहिहिह!"  

त्या पुढे असलेल्या निलगिरीच्या झाडांवर, विस्फारलेल्या नजरेने  विनितची नजर टिकली होती. 

 

         तिच्या कपाळावरुन तो एका रेषेत खाली येणार द्रव बिंदू सर्रकन एकदाचा खाली येऊन जमिनीवर पडला... 

खालच्या तपकीरी मातीने ते थेंब शोषून  घेतल..

 

        

  त्या पांढ-या फट्ट निलगिरीच्या झाडावरुन हलकेच एक राखाडी प्रेताड आकृती कोळ्यासारखी चालत खाली  आली, त्या ध्यानाची संपुर्णत देहाची कातडी  पांढरीफट्ट होती.. हातांना काळी नख होती.

 

      धप्प आवाज करत  जमिनीवर  त्या ध्यानाने उडी घेतली, चार पायांवर कोळ्यासारख हात -पाय टेकवून - त्या तप्त निखा-यामय डोळ्यांनी विनितला , दात विचकत हसत पाहू लागला..- 

 

        

 

        त्याचे कीडलेली , तपकीरी विषारी दंत 

त्या छद्मी हास्याला भयंकर , भयकल्पित रुप 

प्रधान करत होते..

          बिभत्स आकाराच डोक ,  डोक्यावर चकचकीत टक्कळ होत , कपाळावर एक भगव्या गडद रंगाचा रुपया एवढ़ा  गोल टिकळा होता, बिन भुवयांच्या त्या वटारलेल्या बेडमासारख्या बटबटीत डोळयात भगव्या, आगीचे पेटते निखा-यामग रंगाची बुभळ होती,  चेटकिणीसारख टोकदार  नाक होत , जबडा विचकून ते ध्यान हसला. त्याच्या त्या काळपट, तपकीरी दातांच हिडिस हास्य पाहून .. ! 

 

        " आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह !" अचानक मध्येच गबलू किंचाळला..- 

 

      समर्थांच्या तोंडून ते वर्णन ऐकून गबलूला जनू असा भास झाला  की ते ध्यान आपल्यासमोरच उभा आहे.. 

 

        मेनका गबलूच्या अश्या किंचाळल्याने एटेक येऊन मरता मरता वाचली तोच  रागात तीने गबलूच्या डोक्यात एक टपली मारली..

 

      " ए पागल, गोष्ट ऐकना फक्त , साला खुद्द तो मरेगा दुसरे को भी मरवायेगा..!" मेनकाने पुन्हा एक टपली गबलूच्या डोक्यात हाणली..

 

 

        डोक चोळत , गबलू रागात तिच्याकडे पाहू लागला - बघून घेईल तुला मेनका मनातच पुटपुटला..

 

         परंतू मेनकाने त्याला भिक घातली नाही..

      " समर्थ पूढे सांगा  ना ? !" 

     मेनका  उत्सुकत स्वरात म्हंटली.    

 

        गबलूच्याही चेह-यावरच  लटका राग उडाला , समर्थ पुढे काय सांगतायेत ते ऐकू लागला. 

 लहानग्या   विनितच्या  पाठीवरून कोणितरी थंडगार बर्फ फिरवल्याची जाणिव झाली - भीतिने त्याची पावले जागीच  जमिनीला खिळली होती..डोळे बेडकासारखे मोठे झालेल.तोंड़ वासल गेल. होत.

 

        

" येऊ मी..? त्या दिवशी  माझ बोकडाच रक्त पिलास तू , माझ्या नैवेद्याच भोग फक्त मी घेतो , मला  दुस-यांना वाटलेल आवडत नाही. पन तू माझ नैवेद्य माझं भक्ष  चाखलंस  !"   बोकड़  हा शब्द ऐकून एका क्षणात  विनितच्या डोळ्यांसमोर  काहीदिवसां अगोदरची ती  घटना  फ्लैश होत दिसली. 

 

"  विनित ऽऽऽऽऽ! आता मी तुला खाणार , तुझी चामडी  कचा कचा खाणार , मांस मिटक्या मारुन खाणार! "  अस म्हंणतच ते ध्यान  एक एक पाऊल पुढे आल.

 

        त्याची  उंची साडे पाच फुट होती  , 

प्रेताड रंगाच हाडकूल देह होत, त्याच्या अंगावर वस्त्र नव्हत. अंधारात जन्मलेल ते निर्लज्ज होत   ते ! निर्लज्ज , वासनेने भरलेले मलवट ध्यान होत ते. त्याचे भगवे निखा -यामय  डोळे विनितच्या काळजाच ठाव घेत होते. 

 

" ना...ना...ना..नाऽऽही!च"  त्याच ते किळसवाण रुप पाहून विनितच्या   छातित श्वास अडकला. पोटात भीतीने खड्डा पडला. शरीरावरचा एक नी  

एक केस ताठरला होता. भीतीने अशी काही वाचा बसली होती. की डोळ्यांतुन बुभळ बाहेर येतील, खाली पडतील.

 

"    विनित ऽऽऽऽ!  मी कधीपासुन तूझ्यासाठी थांबलोय..चल  मला तुझा भोग दे  , हे बघ मी तुला आरामात खाईल  चल ये माझ्याजवळ..!  "  ते ध्यान घोग-या आवजात, पन तितक्याच प्रेमळ स्वरात उच्चारल.

 

 साडे पाच फुट उंचीच ते अभद्रध्यान पुढे येत होत. त्याच्या तोंडावर पसरलेल विचकट वासनांधीश हास्य.. त्याच क्प्टी हेतू साध्य झाल होत ह्याची शाश्वती देत होत .

 

" ये ..ये..ये!हिहिहिहिही!"  त्याने त्याचे ते काडीसारखे वाळले  पांढरेफट्ट हात पुढे वाढवले...     पंज्यांची बोट हळवली..

 

 विनित भितिपोटी मागे मागे जाऊ लागला.

 -  दोन पावळ चालून त्याने गर्रकन गिरकी घेतली  आणी अंधारातून , वाट मिळेल तिक्डे धावत सुटला.. 

 

     आणी जरा दूर जाताच   दगडाला ठेच लागून तो  धप्पकन  खाली , जमिनीवर पाळा पाचोळ्यात पडला. 

 

        " बापरे !" गबलू  बोलू लागला.

      " त्या जंगलात जायच्या पेक्षा , बसच्या दिशेने धावायचं होत ना ? म्हंणजे वाचला असता तो ? आता मेला ना !" गबलूचा चेहरा निराश झाला...- खाली पडला.

 

       गबलूच्या वाक्यावर समर्थ नाही- नाही मान हळवत हसले..  ! 

 

        " नाही मी असतांना त्याच्या केसाला धक्का कसा लागेल?" 

 

        " म्हंणजे !" गबलूचा चेहरा खुळला.. त्यावरची निराशेची धुळ उडाली..- आनंद पसरला.

 

        "  म्हणजे , ज्या जंगलात विनित पळाला होता , त्याच जंगलात मी सुद्धा होतो , जंगली औषधी वन्सपती शोध फिरत होत!" समर्थांच्या मी सुद्धा होतो ह्या वाक्यावर .. 

 

        मेनका - गबलू दोघांणीही एकमेकांकडे पाहिलं , हलकेच त्या दोघांच्याही चेह-यावर हसू फुटलं .. व दोघेही एकदाच म्हंटले.. 

 

        " म्हंणजे समर्थ ईन एक्शन मॉड सुरु !" 

मेनका - गबलू दोघांच्या वाक्यावर समर्थ हो अशी मान हळव मंद स्मित करत हसले.. व पुढचा सीन सुरु झाला..

 

        विनीत खाली जमिनीवर पडला होता , त्याची विस्फारलेली भयाने भरलेली नजर - समोर पाहत होती , त्याच्या नजरेसमोर  ते ध्यान उभ होत ,  नाही नाही ध्यान  नजी मृत्यू उभा होता -  

 

        दात विचकत , दोन्ही हात समोर करत ,  ज्या हाताना खुराची धारधार नख होती ,  ते ध्यान मर्कट  चाले करत विनितला भीती दाखव जवल जवळ येत होत.. 

         

 

आणि तेवढ्यातच  विनितच्या मागे एक उंचपुरी , तटस्थ बांध्याची- एक पाचफुट उंचीची सावली येऊन उभी राहिली, अंगात भगव्या रंगांचा फुल बाह्यांचा कुर्ता, खाली सफेद पेंट होती..! 

 

        दोन्ही हातांत दोन रुद्राक्ष कडे घातले होते - ज्या रुद्राक्षांकड्यांचा हात हळुच समोर धरला गेला , ज्या रुद्राक्ष कड्यांतून तपकीरी , भगवाजर्द  स्वच्छ लखलखता दैवी प्रकाश बाहेर पडला...

        

 

 व एक मानवी भारदस्त, स्वरातला, करडा अज्ञाधारकी  आवाज आला.  

 

"  मागे हो नराधमा -?"   त्या आवाजात कमालीची जरब होती.  राकीट स्वरातला, हुकमी  आवाज होता तो. त्या आवाजात   विनितला एक पाठीराख्याची भावना जाणवली.

 

         एक सुखरुप, सुरक्षतेची उब जाणवली .

आणि तो  आवाज विनितच्या मागून आला होता.   

 

        व विनितच्या मागेच आपले समर्थ कृनाल उभे होते..

 

" लहान मुलांना   एकटे पाहून घाबरवतो काय रे निच,पापी आत्म्या .! !"   समर्थांच्या मुखातून पुन्हा तोच करडा आवाज आला. 

विनितने गर्रकन वळून मागे पाहील.

तस त्याला समर्थ दिसले... ! 

पाच फुट उंच , अंगात भगवा कुर्ता, खाली सफेद पेंट, पायांत कोल्हापुरी चपला,  पिलदार शरीरयष्टी ,  डोक्यावरच्या केसांचा उजव्या बाजुला भांग पाडलेला..  

 

        समर्थांनी विनितकडे पाहून मंद स्मित केलं , व त्याला आधार देत उठवलं - 

 

     समर्थांच्या हातातल्या रुद्राक्ष कड्यांमधून लखलखती, धगधगती, चमकिली धुळीकणांची प्रकाश किरणे बाहेर पड़त होती..

 

        ज्या दैवी प्रकाशाच्या किरणांना  ते पिशाच्छी अभद्र ,ध्यान भ्यायल होत.

 

"तू..तू....तू...? कशाला आला आहेस इथ !"   ते ध्यान काफ-या स्वरात उच्चारल झटकण दोन पावल माग सरकल. 

 

" भगवंताचा वारसा जपणारे आम्ही समर्थ  वंशज आहोत, तुझ्या सारख्या पापी, अमानविय शक्तिपासून , मानवांची रक्षा करण हाच आमचा ध्याय आहे. !" समर्थ करड्या  भारदस्त आवाजात उच्चारले.

 

" नाही समर्था हा  पोर माझा भक्ष आहे , मी ह्याला माझ्या सोबत घेऊन जाणार, ह्याच्या मांसावर माझं नव लिहिलं आहे.! ."   

 

ते ध्यान गरजल , दोन पावल पूढे टाकत त्याने आपले हात विनितच्या दिशेने वाढवले तोच समर्थांनी दैवी रुद्राक्षाची उजवी उजळलेली  मुठ जमिनिवर जोरात आपटली , 

 

        उजव्या हाताच्या मुठीचा स्पर्श जस जमिनीला झाला, रुद्राक्ष कड्यांतून शक्तिसाठा बाहेर पडला , जमिनीवर त्या शक्तिसाठ्याचा  पांढ़-या शुभ्र चकचकत्या धुळीकणांचा प्रकाश उमटवत स्फोट झाला , हवेत झुंंणन्न असा आवां करत कंपन निर्माण झाली, 

 

  . सह्स्त्रो हजारो टाळांचा घंटानांद घुमल्यासारख वाटल . आजुबाजुला वाहणारा विषारी वारा, दैवीशक्तिच्या प्रचितीने न्हाऊन निघाला.  हजारो -लाखो सुर्यासारख्या तप्त दैवी शक्ति कणांची उर्जा त्या  कंपनांफू बाहेर  निघाली..व त्या ध्यानाच्या अंगावर जाऊन पडली.

" आऽऽऽऽऽऽऽ!" त्या ध्यानाच्या मुखातुन एक विचित्र गर्जणारा आवाज अंधाराला भोक फाडत बाहेर पडला.   

 

        विनितने आपले दोन्ही कान झाकून घेतले , नाहीतर त्या आवाजाने त्याचे कानाचे पडदे फाटले असते.

 

 

  त्या ध्यानावर समर्थांनी प्रकांश शक्तिचा आघात केला होता - त्या वाराने त्या ध्यानाच देह , लाल , पिवळ्या, गुलाबी, अश्या विविध रंगांनी चमकू लागल .. व पुढच्याक्षणाला त्या ध्यानाच्या अंगातूब    विचित्र सडका , कुजकट वास बाहेर येत त्या अशुभ, अमानवीय शक्तिच्या देहाच लाल रंगाच्या वाफेत रुपांतर झालं , 

 

   समर्थांनी उजव्या हाताचा तळवा सरल धरला.. व मंत्र म्हंटलं.

 

           " घनआत्मशोषक प्रगटम..!" 

   समर्थांच्या मंत्रासरशी त्यांच्या हाताच्या तळव्यावर घनकाराचा क्यूब अवतरला , त्या क्यूबमधून निळसर रंगाचा प्रकाश झोत बाहेर पडत होता.     

 

       ती हवेत भिरभिरणारी  काळी, लाल चमचमती, गोमसारखी धूलीकण वेगान वाकडीतिकडी भिंगत घनआत्मशोषकाच्या दिशेने येत त्यात सामावली..

 

     समर्थांनी  त्या पिशाच्छाला  घनआत्मशोषकात कैद केल होत.

 

     मग समर्थांनी विनितला सुखरुप बस पर्यंत आणून सोडलं.

 

        

 

         " येस , म्हंणजे सत्याचा पुन्हा विजय झाला तर !" मेनकाने अस म्हंणतच , गबलूला टाळी दिली...  

 

        " कृनाल  मस्त गोष्ट होती -आता दुसरी गोष्ट सांग ! हिहिहिहिहिहीही!" गबलू दात काढत हसला.. 

 

        " हो सांगतो ना , पण त्यासाठी तुला मला काहीतरी द्याव लागेल!" समर्थ एका गालात हसले.

 

        " काय ?" गबलू न समजून म्हंटला. 

 

       " सोन्याचे नाणे, पहिली गोष्ट फ्री- दुसरी मात्र प्रिमीयम - आता तू ठरव उद्या रात्री पुन्हा.फ्री गोष्ट ऐकायची की, प्रिमीयम  सोन देऊन.ऐकतोस..!" समर्थ म्हंटले. 

 

        तोच ईकडे गबलूने जांभई दिली..

 

       " आह्ह्ह मला खुप झोप आले , उद्या रात्री पाहू..!" गबलू अस  म्हंणतच - त्याच्या बारीकश्या तुरु तुरु पावळांनी धावत जात टेंट मध्ये घुसला, त्यावर समर्थ- मेनका दोघेही हसू लागले... 

 

        " हहह्ह्ह्ह्ह्ह्ह!" 

हळू हळू जळणारी शेकोटी मंद मंद होत विझली.. 

 

        चौहो दिशेना अंधार पसरला..

        

 

        

 

        

 

         

 

        

समाप्त: