********************
९
उन्हाळ्याचे दिवस होते. स्वानंदच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या होत्या. तशा स्नेहललाही सुट्ट्याच होत्या उन्हाळी. उन्हाळभर स्वानंद शेती विकत घेण्यासाठी वणवण फिरला. ज्यात त्याची भेट स्नेहलशी झाली नाही. फोन नसल्यानं फोनद्वारेही तिच्याशी संपर्क करता आला नाही. हाच अवकाश मिळाला स्नेहलला. अन् याच दरम्यान तिला एक व्यक्ती पाहायला आला. मुलगा देखणा होता व इंजीनियर असल्यानं तो तिला पसंत पडला. तिनं आपल्या वडिलांच्या इच्छेखातर आपला विवाह साजरा केला व ती सासरी गेली होती. ज्यातून ती स्वानंदनं तिला केलेली मदतही विसरुन गेली होती. हे तिनं तिच्या वडिलांच्या हार्ट अटॅकच्या आजारामुळं केलं होतं.
स्वानंदनं शेती पाहिली. त्याला शेती पसंत पडली. तिचे त्यानं पैसे दिले व रजिस्ट्री केली व स्वानंदनं शेतीची रजिस्ट्री स्नेहलच्या वडिलांसमोर ठेवण्यासाठी तिच्या घरी आला. आज त्याच्या मनात त्या गोष्टीचा विलक्षण आनंद होता. त्यानं शेतीची रजिस्ट्री स्नेहलच्या वडिलांसमोर ठेवली. तसं त्यानं तिच्या वडिलांना दोन वर्षापुर्वीची आठवण दिली. सांगीतलं की त्यांनी दोन एकर शेती घ्यावी असं त्याला सांगीतलं होतं. बदल्यात त्याचा विवाह आपल्या मुलीशी लावून देवू. हेही वचन दिलं होतं. परंतु जशी आज रजिस्ट्री स्वानंदनं स्नेहलच्या वडिलांसमोर ठेवली व जसा विषय मांडला. तसे तिचे वडील बोलके झाले. ते म्हणाले,
"बेटा, स्नेहलनं विवाह केलाय व ती आपल्या संसारात सुखी आहे. तुही सुखी राहा. मी तुला आव्हान यासाठी केलं होतं की तुझी गेलेली शेती तुला परत मिळावी. कारण शेती ही तुझ्यासाठी लक्ष्मी होती. तू ती जीवनभरही घेवू शकला नसता. परंतु ज्याप्रमाणे हनुमानाला उडण्याची शक्ती अवगत होती. परंतु कालानुकालीक तो आपली शक्ती विसरला होता. त्यानंतर त्याची आठवण समुद्र ओलांडण्यापुर्वी त्याला जांबवंतांनं करुन दिली. मीही तेच कार्य केलेलं आहे. कारण तू नोकरी मिळताच शेती घेवू शकत नव्हता. त्यासाठी तुला कोणीतरी आव्हान करण्याची गरज होती. जे आव्हान मी केलेले आहे. बेटा, मला माफ कर. मी तुझ्याशी माझ्या मुलीचा विवाह लावू शकलो नाही. कारण काहीही का असेना. आता तू जावू शकतोस."
स्नेहलचे वडील स्वानंद समोर बोलून गेले. ते जसजसे बोलत होते. तसतशी त्याच्या पायासमोरुन जमीन सरकत होती. वाटत होतं की आपण जीवनात अशी चूक का केली की आपण आपला पैसा मोजून तिला नोकरी लावून दिली. त्याचा त्याला पश्चाताप येत होता. परंतु तिनंही त्याचे उपकार ठेवले नव्हते. तिनंही त्याला आपल्या नोकरीतून कर्ज काढून त्याला शेती घेण्यास पैसे दिले होते नव्हे तर केलेले उपकार फेडले होते. परंतु स्वानंदसाठी शेती घेणं महत्वपुर्ण नव्हतं. महत्वपुर्ण होती ती. ती त्याला भेटणे गरजेचे होते. कारण ती न भेटण्यानं आज त्याचा जीव कासावीस झाला होता. त्याला आता काय करावं व काय नको असं होवून गेलं होतं. त्याला आज तो संस्थाचालक व त्याचं बोलणं आठवत होतं की माणसं स्वार्थी निघतात. त्याला आठवत होती तिची नोकरी. ज्यातून त्याच्याही संसारात हातभार लागून त्याचंही जीवन सुखी बनणार होतं. आज त्याला ती क्षणोक्षणी आठवत होती आणि आठवत होत्या त्या आठवणी. ज्या आठवणीत त्यानं आजपर्यंतचे बरेच दिवस काढले होते.
स्वानंदनं शेतीचे कागदपत्र आपल्या हाती घेतले आणि तो परत फिरला. एक क्षणही त्याला तिथं थांबावसं वाटलं नाही.
स्वानंद गेल्यापावली परत आला. त्याला अतीव दुःख झालं होतं. असं दुःख की त्या दुःखातून तो सावरु शकत नव्हता. तसं पाहिल्यास तो ते दुःख कसा विसरणार? कारण ते दुःख सागराएवढं मोठं होतं.
स्वानंदला ती जास्त आठवत होती. जेव्हा तो घरी गेला. आजचा दिवस त्याच्यासाठी अतीशय कंटाळवाणाच होता. त्याला घरी करमत नव्हतं. सारखी तिचीच येणारी आठवण त्याला बेचैन करीत होती. परंतु आता त्यावर काही उपाय नव्हता. कारण त्यानं आता कितीही प्रयत्न केले तरी ती काही त्याला परत मिळणार नव्हती. त्यातच तो आता विचार करु लागला होता.
पावसाळा लागला होता. शाळा सुरु झाल्या होत्या. आज शाळेचा पहिलाच दिवस होता. तशी स्नेहल आली. तीच ती भरजरी साडी. कपाळाला जुनीच टिकली. तसा तिच्या शरीरचनेवर काहीच बदल दिसला नाही. गळ्यात मंगळसूत्रही दिसलं नाही. ज्यातून स्वानंदला विचार आला. कदाचित तिचे वडील खोटं बोलत असावेत. याची शंकाही आली. तसं त्यानं तिला विचारलं,
"स्नेहल, मला कळलं की तुझं लग्न झालंय. परंतु मंगळसूत्र दिसत नाही. मंगळसूत्र ही सौभागीनीची शान आहे. तू मंगळसूत्र वापरायला हवं."
स्वानंद बोलून गेला स्नेहलला. तो णनातून बोलत नव्हता. मात्र स्नेहलला तो मनातून बोलल्यासारखा वाटला. वाटलं की त्यानं तिला माफ केलं. आता स्नेहल नित्यनेमानं शाळेत येत असे. ती त्याचेशी बोलतही असे. जशी पुर्वी बोलत होती तशी. तसं पाहिल्यास बरेच दिवस तो तिच्या घरी न गेल्यानं तिच्या लग्नाचं बिंग आतापर्यंत फुटलं नव्हतं. ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. ते मंगळसूत्र नसल्यानं तिचं लग्न झालं की नाही हे सुद्धा समजत नव्हतं. कदाचीत त्याला आपलं लग्न झालं आहे हे माहित होवू नये म्हणून तिनं शाळेत मंगळसूत्र घालमतलं नव्हतं. कदाचीत ती ते काढून शाळेत आली असावी किंवा नव्या फॅशनेबलच्या काळात तिच्या गळ्यात जी सोन्याची चैन होती. त्यात दोन चार असलेल्या काळ्या मण्यावरुन तिचं लग्न झालं हे सुद्धा कळत नव्हतं. अन् स्वानंदला ते मंगळसूत्र दिसलंही असतं तरी त्यानं तिचं लग्न झालेलं आहे हे ओळखलं नसतं. कारण ते मंगळसूत्र त्याच्या गांधर्व विवाहाची निशाणी आहे असं त्याला वाटलं असतं. परंतु तिच्या वडिलांकडून त्याला तिच्या विवाहाबद्दल माहित झाल्यानं तिची भीती दूर करावी या उद्देशातून त्यानं तिच्या विवाहाची कल्पना त्याला आहे, असं सांगीतलं होतं.
स्नेहलनं त्याचा विश्वासघात केला होता नव्हे तर त्याला धोका दिला होता. तिनं आपला केलेला दुसरा विवाह म्हणजे शुद्ध त्याची फसवणूक होती. कारण तिनं जो पहिला स्वानंद सोबत गांधर्व विवाह केलेला होता. त्या विवाहापासून तिनं फारकत न घेता दुसरा विवाह केलेला होता आणि तोही तिनं केलेल्या अशा नवीन विवाहाबद्दल तिला काहीही म्हणू वा बोलू शकत नव्हता. कारण त्याचेजवळ काहीही पुरावे नव्हते.
आज तिनं विवाह केला होता. त्याचं कारण होतं ती जात. तिच्या वडीलांनी तिला जातीचं बंधन टाकलं होतं, ज्यातून ती नोकरीवर कायम होताच तिनं आपल्या वडिलांची इच्छा पुर्ण केली होती. तिच्या वडिलांना तिच्याच जातीचा मुलगा तिच्यासाठी पती म्हणून हवा होता.
स्नेहल ही आधी विश्वासघातकी मुलगी नव्हती, ना ही तिला स्वानंद सोडून दुसऱ्या पर पुरुषाशी विवाह करायचा होता. परंतु ती परमानंट होताच तिच्या वडिलांनी तिला म्हटलं,
"बेटा, विवाह करुन टाक. आता तू नोकरीवर परमानंट झालीय. आता तुला चांगले चांगले रिश्ते मिळू शकतात."
ते वडिलांचं म्हणणं. त्यावर स्नेहलनं स्वानंदची आठवण दिली व वडिलांना म्हटलं की हा विश्वासघात होईल. ज्यातून स्वानंदचं मन दुखवलं जाईल. त्यावर तिचे वडील म्हणाले,
"आता स्वानंद, स्वानंद लावू नकोस. जात, जात असते आणि शेवटी जात महत्वाची असते. जातीत विवाह केला की आपल्याला सन्मान मिळतो व त्याच सन्मानानं जगत असतो आपण. जातीत आपला विवाह झालाच नाही तर आपला सन्मान जातो. नीतीमत्ता ढासळते व लोकं आपली इज्जत करीत नाही. शिवाय स्वानंद हा एक साधारण अध्यापक आहे. त्यापेक्षा तुला येणारे रिश्ते हे डॉक्टर, इंजिनिअर वा त्याचेपेक्षा जास्त शिकलेले असू शकतात. आता ठरव तुला जातीत विवाह करुन आपला संसार सुखी करायचा आहे की त्या स्वानंद सोबत विवाह करुन साऱ्या जीवनभर दुःख सोसायचं आहे. तसंही तू साऱ्या जीवनभर दुःखच शोषत आलीय. शिवाय तू जर असा स्वानंद सोबत विवाह केलाच आणि मला माहित झालं तर मी जीवंत राहू शकणार नाही. तसाही मी हार्ट पेशंट आहे व मला लवकरच अटॅक येवू शकतो. आता तू ठरव की तुला स्वानंद सोबत विवाह करायचा आहे की एखादा जातीचा उच्चशिक्षीत व्यक्ती शोधायचा आहे. तुझ्या निर्णयातून कदाचीत माझाही जीव वाचू शकतो वा जावू शकतो."
ते वडिलांचं म्हणणं. ते आव्हानात्मक म्हणणं. त्यावर स्नेहल विचार करु लागली होती. तिला आठवत होता तो स्वानंद, ज्यानं तिच्याशी गांधर्व विवाह केला होता आणि त्याचाच फायदा घेवून ती परमनंट होताच त्यानं तिला कर्ज काढायला लावले होते. ज्या पैशातून त्यानं शेती विकत घेतली होती. तिला वाटत होतं की त्यानं तिच्याशी विवाह करण्यासाठी जणू स्वार्थच साधला. विवाह करता यावा म्हणून कर्ज काढायला लावलं. याचाच अर्थ असा तिच्या मनात आला की त्यानं शेती घेण्यासाठी तिला इस्तेमाल केलंय. असं तिला वाटत होतं. मात्र त्यानं तिच्या नोकरीसाठी संस्थाचालकाशी बोलणी केली व त्यासाठी त्यांना पैसेही दिले. हे तिला माहित नव्हतं, ना ही त्यानं संस्थाचालकाला सांगीतलं होतं. त्यानं संस्थाचालकाला सांगीतलं होतं की त्यांनी त्यानं तिच्या नोकरीसाठी दिलेले पैसे तिला सांगू नयेत. कधीही ती गोष्ट सांगू नये. आजही ती गोष्ट तिला माहित झालेली नव्हती.
वडिलांनी म्हटलेलं लग्न. ते जातीचं लग्न. तसं पाहिल्यास आजपर्यंत म्हणजे तिची नोकरी परमनंट होईपर्यंत कोणताच व्यक्ती ना तिला पाहायला आला होता ना तिला कोणत्याच व्यक्तीनं मागणीही घातली होती. अशातच तिला उतारवय चालू झालं होतं. परंतु जशी ती परमनंट झाली. तसे वेगवेगळ्या ठिकाणचे रिश्ते आले. जे जातीचे होते. ज्यात त्यांनी तिला मागणी घातली व ते जातीचे असल्यानं तिनंही होकार दिला, आपल्या वडिलांचा मान ठेवण्यासाठी.
स्नेहलनं आपला विवाह केला होता. त्यासाठी तिनं जात पाहिली होती. तिनं दुसऱ्या जातीच्या असलेल्या स्वानंदशी विवाह केला नव्हता. कारण तिलाही जात महत्वाची वाटत होती आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी. तिला वाटत होतं की माझे वडील हे हार्ट पेशंट असल्यानं मी आगळेवेगळे पाऊल घेतल्यास ते मरण पावतील.
आज तिनं आपला विवाह थाटामाटात केला होता. परंतु त्याची भनक स्वानंदलाही लागू दिली नव्हती. ना ही ती भनक तिच्या शाळेत लागली होती. आज तिनं आपला विवाह साजरा केला असला तरी तिला स्वानंद आठवत होता. ते त्याचेसोबत फिरणे तिला आठवत होते. अन् आठवत होत्या त्या रोमांचकारी आठवणी. ज्या आठवणी तिनं आपल्या वडिलांसाठी आपल्या अंतर्मनात दाबून टाकल्या होत्या.
दिवसांपासून दिवस जात होते. तिनं केलेला उच्चशिक्षीत पती. ज्या पतीनं एक शोभेची वस्तू म्हणून तिच्याशी विवाह केला होता. त्यानं तिच्याशी विवाह तर केला होता. परंतु तो ना तिला आपल्यासोबत आपल्या जातीत फिरवायला नेत असे. ना तिच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करीत असे. तिला त्या घरी भयंकर त्रास होता. तरीही ती ते सर्व दुःख सहन करुन राहात होती. तसं तिला राहाणं भाग होतं. त्याचं कारण होतं, तिचे वडील. तिला आजही वाटत होतं की तिच्या कदाचीत आवाज उठविण्यानं तिच्या वडिलांना त्रास होईल व ते मरण पावतील. त्यामुळंच तिला शेवटी स्तब्ध राहाणं गरजेचं होतं.
स्नेहलचा पती हा इंजीनियर होता. परंतु तो तिच्या काही लायक नव्हता. तशा त्याच्या दररोज पार्ट्या चालत असत व तो पार्टीला तिला कधीच नेत नसे. तर त्याची एक प्रेमिका होती व तो तिलाच प्रत्येक ठिकाणी मिरवीत असे. आज तो समाजातील लग्नसमारंभातही तिला कधीच नेत नव्हता तर तो आपली प्रेमिकाच घेवून जायचा. ज्यातून तिला कधीकधी वैताग यायचा व ती आपल्या प्रारब्धावर पश्चाताप करायची. परंतु ते तिचं प्रारब्ध नव्हतं तर ती तिनं जीवनात स्वतः केलेली चूक होती. आज तिला आठवत होता स्वानंद. परंतु आता वेळ निघून गेली होती. स्वानंदही शाळेत नित्यनेमानं येतच होता आणि तिही नित्यनेमानं शाळेत येतच होती. दोघांचीही कधी आमोरासमोर व्हायची. तिही त्याचेशी बोलायची. परंतु तिच्या मनात भीती असायची. ज्या भीतीनं तिला त्याचेशी बोलावसं वाटत नव्हतं.
दिवसामागून दिवस जात होते. ती शाळा आता त्याला खायला धावत होती. तसं पाहिल्यास त्या शाळेत त्याला करमत नव्हतंच. कारण आता त्याचेजवळ त्याची करमणूक करणारंही कोणी नव्हतं ना त्याला आता कुणावरही प्रेम करावंसंही वाटत नव्हतं. कारण स्नेहलनं केलेला त्याचेसोबतचा विश्वासघात त्याला क्षणोक्षणी आठवत होता.
स्वानंदला जगणं कठीण झालं होतं. त्याच्या जीवनात सध्याच्या घडीला रस उरला नव्हता. कधीकधी तर त्याला मरुन जावंसं वाटत होतं. कधीकधी वाटत होतं की तिच्या शिक्षकपदाची मान्यता रद्द व्हावी. तसे विचार तो मनात करीत होता. तसा तो दिवस उजळला.
तो एक दिवस. ती एका तालुक्यातील घटना. त्या दिवशी एका तालुक्यातील एका मुख्याध्यापकाने आपलं घर पेंटींगला दिलं होतं आणि पैशाचा हिशोब चुकवला होता. त्यावरुन वाद झाला होता. पेंटींग करणारा व्यक्ती हा बारावी शिकलेला होता व त्याला मुख्याध्यापक असलेला व्यक्ती ज्ञान शिकवत होता. तो वाद शिगेला पोहोचला व मुख्याध्यापकानं सहजच आपल्या तोंडातून उद्गार बाहेर काढले. 'तू का मला शिकवशील. मी तर डी एड न करता मुख्याध्यापक बनलो. तशीच मी इतरांनाही नोकरी लावून दिली.'
ते त्या मुख्याध्यापकाच्या तोंडचं वाक्य. त्यानं पेंटरच्या कामाचे पैसे पेंटरला दिले नाहीत व त्याला आपल्या घरुन हाकलून दिले. ज्यातून त्यानं त्याच घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली. त्यात पेंटरनं मुख्याध्यापकाच्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे नोंदवले. त्यानंतर पोलीस तपास सुरु झाला व चौकशीअंती कळलं की सदर मुख्याध्यापकाची नियुक्ती ही बोगस तत्वावर झालेली आहे. मग काय, एक प्रकरण उघडकीस येताच सर्व जिल्ह्यातील प्रकरणं उघडण्यात आलीत. ज्यात शालार्थ भरती अंतर्गत बोगस नियुक्त्या उघडकीस आल्या. ज्यात स्नेहलचाही क्रमांक होता. शेवटी स्नेहलचीही चौकशी करण्यात आली व तिचीही नोकरी जायची पाळी आली.
अलिकडील काळात शालार्थ घोटाळा झालेला दिसला. हा भ्रष्टाचारच आहे. तसंच यापुर्वीही बरेच भ्रष्टाचार झाले. ज्यात काही लोकांनी सामान्य लोकांना लुटलं. तसेच चक्क कितीतरी करोडो रुपयांनी बऱ्याच लोकांनी बँकेलाही लुटलं व ते विदेशात जावून बसले. काहींनी अशाच स्वरुपाचा काळा पैसा गोळा केला व तो विदेशी बँकेत भरला. आजही अशा खात्याचा शोध घेतल्यास आपल्याला सत्य परिस्थिती माहित होईल.
सध्या वर्तमान काळात कितीतरी करोड रुपयाचा शालार्थ आयडी घोटाळा सापडला. ज्यात नियमानुसार शाळेत शिक्षक व मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या केल्या गेल्यात. ज्यानं खऱ्या शिक्षक बांधवांवर अन्याय झाला. तसंच ज्याला त्याचे हक्कं मिळायला हवे होते. त्याला त्याचे हक्कं मिळाले नाहीत. ते डावलण्यात आले.
शालार्थ घोटाळा झाला. ज्यात मातब्बर मोहरे हाताला लागले. ज्यांनी भ्रष्टाचार करुन शालार्थ आयडी बनवल्या. त्यांची कसून तपासणी करण्यात आली व तपासणीनंतर काहींना अटकही झाली. परंतु शिक्षण क्षेत्र सुधारलं का? याचं उत्तर नाही असंच देता येईल. कारण अलिकडील काळातही एका शाळेत मुख्याध्यापक नियुक्त करतांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीच दिल्या गेली नाही. प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळालं की प्रभारी मुख्याध्यापक कोणालाही बनवता येतं. सेवाजेष्ठ शिक्षकांची परवानगी न घेता. आता या प्रक्रियेत खरंच जेष्ठ शिक्षकांची परवानगी घ्यावी लागत नाही काय? असा सवाल सामान्य शिक्षक वर्गाला पडतो. यावरुनच मुलांना शिकवायला शिक्षकांची गरजही नसावीच. मुलांना शिकवायला कोणीही सामान्य व्यक्ती चालू शकतो. जो दहावी वा बारावी असा साधारण शिकलेला का असेना. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. खरं तर मुख्याध्यापक नियुक्त करतांना सेवाजेष्ठता कशासाठी? त्याचं कारण आहे, त्याचा अनुभव. त्याला जे अनुभव असतात. तेच अनुभव इतर कनिष्ठ शिक्षकांना नसतात. एखादा गवंड्याचा मुलगा हा जास्त शिकलेला नसतांनाही तो चांगलं घर बांधू शकतो. ठेकेदारी उत्तम पद्धतीनं करु शकतो. तेच कार्य एखादा इंजिनिअर देखील करु शकत नाही. त्याचं कारण आहे, गवंड्याचा मुलाचा अनुभव. ज्या गवंड्याचा मुलानं लहानपणापासूनच आपल्या वडिलांना काम करतांना पाहिलेलं असतं. तसंच त्यानं ते काम लहानपणापासूनच केलेलं असतं. जे काम इंजिनिअरनं केलेलं नसतं. म्हणूनच अनुभव हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच सेवाजेष्ठ शिक्षक हा मुख्याध्यापक बनायला हवा. ज्यामुळं शाळा ही नावारुपाला येवू शकते.
अलिकडील काळात तसं होत नाही. शाळा संस्थाचालक हा दबाव आणून आपल्याच नातेवाईकांना शाळेचा मुख्याध्यापक बनवतो. मग तो शिक्षक हा जेष्ठ असो की कनिष्ठ. त्याचेवर दबाव आणून त्याचेकडून नाहरकत पत्र लिहून घेतो. तशाच स्वरुपाचे प्रस्ताव शासनाला पाठवतो. ज्यातून शासनही संस्थाचालकाच्या प्रस्तावात हो ला हो मिळवीत अशा प्रस्तावाची शहानिशा न करता संस्थाचालकांच्या नातेवाईकांनाच मुख्याध्यापक पद प्रदान करतं. त्यानंतर ज्याचेवर अन्याय झाल्यास तो न्यायालयात गेला तर न्यायालयीन प्रक्रियाही त्याची बाजू बरोबर समजून घेत नाहीत व ते परस्पर शासनाकडेच ते प्रकरण ढकलून त्यांनाच निर्णय घ्यायला लावतात. याचाच अर्थ न्यायालय हे बंदरांच्या हातात कोलीत देतात. ज्यातून संबध शाळेची लंकाच जाळली जाते. न्याय मिळत नाही. तसाच ज्या शिक्षकांवर अन्याय होतो, तो आणि संबध कर्मचारी वर्ग अशा लंकेत लागलेल्या आगीत ध्वस्त होतात. ही परिस्थिती सगळीकडे लागू आहे.
शालार्थ आयडी घोटाळा असाच. अशाच संस्थाचालक व शिक्षण विभागातून झालेला घोटाळा. ज्यातून आपली माणसं लावली गेलीत. ज्यांनी पैसे देवून नोकरी मिळवली. ज्यांनी आपल्या नातेवाईकांची कामं केली. ज्यांना माहित होतं की प्रकरण कधीच बाहेर येणार नाही. कारण संस्थाचालक व शिक्षण विभाग यांची मिलीजूली आहे. ज्यांना पोलिस प्रशासनही हात लावू शकत नाहीत. कारण त्यांचे शासनातील मोठमोठ्या व्यक्तींशी हितसंबंध जुळलेले आहेत. ज्यांचे जनतेतूनच निवडून आलेल्या जनप्रतिनिधींशी हितसंबंध आहेत. तसेच त्यांना न्यायालयही काहीही करु शकत नाही. न्यायालयात वाळलंही जळतं आणि ओलंही. कारण न्यायालयीन प्रक्रिया ही संथ गतीनं चालणारी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया तारीखवार तारीख चालत असते. ज्यात आरोपी विचार करतो. तारखेवरच जायचं आहे ना. मग ठीक आहे. तारखेवर हजर राहू. काही समस्या नाही. काहीही होणार नाही. असे करत करत तारीख चालते. त्यानंतर काही दिवसानंतर आरोपी बा इज्जत बरी होतो. काहीही होत नाही. काही दिवस जाताच जनताही केलेला भ्रष्टाचार विसरतेय व आरोपी सुस्थितीत जीवन जगत असतो. त्यानंतर त्यानं भ्रष्टाचारानं कमविलेली संपत्ती जशीच्या तशी राहते. सगळं त्याला पचतं. तसाच न्यायालयामार्फत व प्रशासनामार्फत वकिलाच्या माध्यमातून बचावही झालेला असतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास न्यायालयच या भ्रष्टाचारावर वचक लावू शकतो. त्यांनी जर मनात आणलं तर..... भ्रष्टाचारातून कमविलेला पैसा हा जनतेचा आहे ना. मग तो पैसा जनतेसाठी परत मिळायलाच हवा. असा न्यायालयानं पवित्रा घेतला तर....... भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयानं क्लीनचिट देवूच नये. त्याच्या संपत्तीची पडताळणी करावी. नियुक्तीच्या वेळेस त्याचेजवळ किती रुपये होते? किती संपत्ती होती? हे पाहायला हवं व वाढलेली संपत्ती कशी वाढली? त्याचे लेखेजोखेही तपासायला हवेत. ज्यातून इतर पिसा कुठून आणला? तेही पाहायला हवं व ती सर्व संपत्ती जप्त करायला हवी. जेणेकरुन कोणीच पुढील काळात भ्रष्टाचार करणार नाहीत. परंतु न्यायालय अशी भुमिका घेत नाही. ज्यातून भ्रष्टाचार करणारे आरोपी मोकळे सुटतात व ते पुढे जास्त भ्रष्टाचार करायला लागतात.
आज जरी शालार्थ घोटाळा झाला आणि आरोपींना अटक होवून जामीन मंजूर झाला व खटले सुरु झाले असले तरी शिक्षण क्षेत्र खरंच सुधारेल याची आशा नाही. तेथील भ्रष्टाचार संपेल अशी आशा नाही. तसं पाहिल्यास शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार सोडा, इतर क्षेत्रातीलही भ्रष्टाचार संपेल अशी आशा नाही. कारण यापुर्वीही अशी बरीच भ्रष्टाचार करणारी मंडळी लाचलुचपत विभागानं आपले जाळे मांडून जाळ्यात पकडली. परंतु भ्रष्टाचार संपला नाही. कारण न्यायालयात ते प्रकरण गेल्यावर त्यांचं काहीच झालेलं नाही. तारीखवार तारीख चालल्या व आरोपी भ्रष्टाचार मुक्त झालेत. म्हणूनच आजही भ्रष्टाचार सुरुच आहे. शासनात नियुक्त असलेले कर्मचारी हे कोणत्याही यंत्रणेला घाबरत नाहीत. तसेच ते न्यायालयालाही घाबरत नाही. कारण त्यांना स्पष्टपणे माहितच आहे की त्यांचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. याचं एक उदाहरण आहे. एके ठिकाणी दोन व्यक्तीत वाद झाला. ज्यात एक व्यक्ती खालच्था जातीचा होता. त्यामुळं एकानं जातीवाचक शिव्या देवून मारहाण केली. ज्यातून ज्याला शिव्या दिल्या. त्या व्यक्तीनं आपली तक्रार रितसर पोलिस स्टेशनला टाकली. ज्यानं पोलिसांना ॲक्ट्रासिटी लावा असे म्हटले नव्हते. तसेच ती तक्रार न्यायालयात टाकावी असेही म्हटले नव्हते. परंतु पोलिसांना केसेस हव्या असल्यानं त्यांनी संदर्भीय खटला न्यायालयात नेला.
पोलिसांनी त्या तक्रारीत नियमानुसार ॲक्ट्रासिटी लावली. ज्यातून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र हे घडलं न्यायालयात खटला जाईपर्यंत. परंतु न्यायालयात खटला गेल्यानंतर तो खटला संबंधीत व्यक्ती पैशाअभावी हारला. ज्यातून पोलिसांच्या बयाणात संबंधीत खटला हारणाऱ्या व्यक्तीनं दबाव टाकल्यानं आपण तो खटला ॲक्ट्रासिटी गुन्ह्यात नोंदवला असं बयाण दिलं व ते बयाण काहीही प्रश्न न करता न्यायालयानं नोंदवलं.
तो ॲक्ट्रासिटीचा खटला. त्या खटल्यात विशेष सांगायचं म्हणजे पोलिस हे जनतेचे सेवक असून ते कुणाच्याही दबावात येत नाहीत आणि येवूही नये. असे असतांना ते संबंधीत व्यक्तींच्या दबावात कसे आले? त्यानंतर तसं पोलिसांचं उत्तर, त्यावर ताशेरे न ओढता त्यानंतर न्यायालयानं तेच उत्तर ऐकून घेतलं व तेच विचारात घेवून खटल्याचा निकाल लावला. ज्यातून ज्यावर अन्याय झाला. तो व्यक्ती खटला हारला. शेवटी तो चूप बसला आपलं प्रारब्ध खराब आहे असं समजून. न्यायालयानं असं करायला नको होतं. परंतु अनवधानानं ते घडलं. बचाव पक्षानं तोच मुद्दा लावून धरला.
काही दिवस गेले. जो व्यक्ती खटला जिंकला. त्याच व्यक्तीनं हारणाऱ्या व्यक्तीवर व खटल्यातील साक्षीदार तसेच संबंधीत तपास करणाऱ्या पोलिसांवर खटला दाखल केला. म्हटलं की त्याला संबंधीत सर्वच यंत्रणेनं फसवलं. ज्यात त्याला नुकसान भरपाई मिळावी. त्यानंतर काही दिवसानंतर निसर्गानंच निकाल दिला. ज्याला त्यानं मारलं व ज्याचेवर त्यानंच अन्याय केला. तोच व्यक्ती न्यायालयात जावून आणखी अन्याय करता झाल्यानं निसर्गानं त्याचा अपघात घडवला व तो मृत्यू पावला. त्यानंतर काही दिवसानं त्याची पत्नी व त्याची मुलं खटल्यात समाविष्ट झाली व खटला चालूकर्ती बनली. जे व्हायला नको होतं. कारण संबंधीत प्रकरण जेव्हा घडलं होतं, तेव्हा त्या खटल्यातील संबंधीत व्यक्तीची मुलं ही घटनास्थळी हजर नव्हतीच. त्यांना काय माहित होतं की संबंधीत घटनेत काय घडलं असेल. तरीही न्यायालयानं त्यांना संमती दिली व खटला लवकर संपायचा, त्याला विलंब लागला.
न्यायालय हे सर्वांनाच आपली बाजू मांडण्याची संधी देतं. जी द्यायलाच हवी. परंतु त्यातून जे गुन्हेगार असतात. ते मोकळे सुटतात बचाव पक्षामार्फत आणि जे गुन्हेगार नसतात. ते लढत असतात त्रास भोगून. त्यांना बचाव करणारे वकीलही चांगले मिळत नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेतून बा इज्जत बरी झालेली मंडळी तद्नंतर गुन्हेगारी जगताकडे वळतात आणि जी मंडळी चांगली असतात. ती न्यायालयीन प्रक्रियेतच लटकतात. त्यातूनही मोकळी सुटत नाही. कारण ते माणसाचं न्यायालय असतं. परंतु निसर्गाच्या न्यायालयात खरा न्याय होतो. तो निसर्ग ज्यांचेवर अन्याय होतो, त्याला खऱ्या स्वरुपाचा न्याय मिळवून देतो. जरी त्याचेवर न्यायालयामार्फत अन्याय झाला असला तरी. म्हणूनच महत्वपूर्ण बाब ही की कोणीही कुणाला कमजोर समजून त्याचेवर अन्याय करु नये. कारण त्याला माणसाच्या न्यायालयात जरी न्याय मिळाला नसेल तरी तो न्याय निसर्गाच्या न्यायालयात मिळतो. ज्यातून व्याधी वा असाध्य आजार जडतात. तसाच हालहाल होवून मृत्यू येतो. म्हातारपणात मुलं सोडा, साधं कुत्रसुद्धा विचारत नाही. शेवटी वृद्धाश्रमात जावून प्राण सोडावा लागतो.
विशेष सांगायचं झाल्यास पैसे जर कमवायचेच असेल तर चांगल्या मार्गानं कमवावे. शालार्थ आयडी सारखे घोटाळे करण्याची व तसे पैसे कमविण्याची गरज नाही. ज्यातून सामान्य माणसांचा शापच लागेल. तसेच कुणावर आपल्या स्वार्थासाठी अन्याय करण्याची गरज नाही. ज्यातून निसर्ग आपल्याला शिक्षा देईल. सर्वांनी विचार करावा चांगलं सन्मार्गानं जीवन जगण्याचा. जेणेकरुन आपलंच जीवन सुखकारक बनेल व आपल्या सुखसमाधानानं जीवन जगता येईल व अंतीम समयीही सुखानं मरण पावता येईल. सर्व आप्ताच्या समोर. त्यांना आशिर्वाद देत देत. यात शंका नाही.
तो शालार्थ आयडी घोटाळा. जवळपास कितीतरी करोड रुपयाचा घोटाळा. त्यात मोठमोठे अधिकारी जाळ्यात फसले. त्यांची चौकशी केली असता ते दोषी आढळले. मग शासनानं विचार केला. विचार केला की ज्या अधिकारी वर्गानं ज्या व्यक्तींची नियुक्ती या काळात केली. त्यांनाही दोषी ठरवावं. कारण कर्मचारी भरतीची प्रक्रिया बंद असतांना ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या गेली. ते कर्मचारीही दोषीच आहेत. कारण त्यांना माहित असूनही त्यांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला. याचाच अर्थ असा होता की गुन्हेगाराला मदत करणाराही गुन्हेगारच असतो असं न्यायालयाचं म्हणणं होतं. शेवटी दोषी आढळलेल्या शिक्षकांनी कितीही आरडाओरड केली तरी ते शिक्षक दोषी ठरवले गेले व त्यांची नोकरी शासनानं हिरावून घेतली. ज्यात स्नेहलही होती.
स्नेहलची नोकरी गेली होती. आता तिचे वडीलही जीवंत नव्हते. त्यातच तिच्या इंजीनियर असलेल्या पतीनं तिची नोकरी जाताच तिला घरातून हाकलून दिले होते. त्यामुळंच आता स्नेहलजवळ ना तेल उरलं होतं, ना धुपाटणं उरलं होतं. तिची अवस्था रिकामटेकड्या झाडावर बसलेल्या उल्लूगत झाली होती.
स्नेहलची जशी नोकरी गेली. तसं तिला शाळेतूनही काढून टाकण्यात आलं होतं. त्यातच त्या घटनेत तिच्या शाळेतील संस्थाचालकालाही दोषी धरण्यात आलं होतं. परंतु त्यानं पैशाच्या ताकदीवर आपल्या स्वतःची सुटका करुन घेतली होती. प्रकरण इथंच थांबलं नाही. त्या प्रकरणानंतर त्या शाळेतील संस्थाचालकाला माहित झालं की तिचं स्वानंदवर पुर्वी प्रेम होतं. दोघंही एकमेकांवर निरतिशय प्रेम करीत होते. ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. परंतु तिच्या वडिलांची अट होती. अट होती, त्यानं शेती घ्यावी व ते कार्य त्यानं दोन वर्षात पुर्ण करावं. परंतु ते दोन वर्ष तपाचे होते. तेवढे दिवस थांबणार कोण? शेवटी त्या दोघांनी गांधर्व विवाह केला. परंतु ही गोष्ट त्यांनी शाळेत माहित होवू दिली नाही. ना तिनं आपल्या वडिलांनाही सांगीतली. मात्र नोकरी पक्की होताच स्नेहलनं गांधर्व विवाह तोडला व जातीच्या बंधनात अडकून आपला स्वार्थ साधत विवाह केला आणि तिनं स्वानंदला धोका दिला. तसंच तिच्या पतीनंही केलं. नोकरीवर प्रेम करणाऱ्या तिच्या पतीनं तिची नोकरी जाताच तिला त्यागलं. आता ती उदास आहे. तिलाही जगावंसं वाटत नाही. शिवाय स्वानंदनंही आतापर्यंत आपला विवाह केलेला नाही. तोही उदास आहे. संबंधीत प्रकरणात स्नेहलनं स्वानंदचा विश्वासघात केल्यानं तिला हे सगळं भोगावं लागलं व तिचं बिंग फुटलं. जणू तिची नोकरी जाणं म्हणजे तिनं केलेल्या पापाचा परिणाम आहे.
संस्थाचालक विचार करीत होता. स्वानंदचं प्रेम होतं तिच्यावर. त्यानं तिच्याशी गांधर्व विवाह केला होता. त्यामुळंच स्वानंदनं आपल्याशी बोलून आधी तिची नोकरी पक्की केली. परंतु बदल्यात त्याला काय मिळालं? हालअपेष्टा आणि विश्वासघात. परंतु आपण ही परिस्थिती सांभाळावी. दोघांनाही समजवावं. दोघांनाही मिळवावं. दोघांचेही विवाह करुन द्यावे थाटामाटात आणि राजरोषपणानं.
तो संस्थाचालकाचा विचार. एक दिवस संस्थाचालकानं तिची परिस्थिती विचारात घेवून तिला बोलावलं. समजावून सांगीतलं की तिला नोकरी स्वानंदनंच लावून दिली होती. त्यासाठी त्यानंच पैसे दिले होते. तो तिच्यावर निरतिशय प्रेम करीत होता. परंतु तिनं जातीची बंधनं पाळून आपला विवाह केला. बदल्यात तिला काय मिळालं? तिची नोकरी गेली आणि नोकरीवर प्रेम करणाऱ्या तिच्या पतीनं तिला सोडून दिलं. तिला स्वानंदचाच शाप लागला की तिची नोकरी गेली. जर ती स्वानंदच्या घरी असती तर कदाचीत तिची नोकरीही गेली नसती. आजही स्वानंद तिच्यावरच प्रेम करतो आहे व त्यानं आजपर्यंत तरी आपला विवाह केलेला नाही. कदाचीत आजही तुझा तो स्विकार करु शकेल, तुला सुखातही ठेवू शकेल, जर तू त्याचेकडे गेली तर.......
ते तिच्याच संस्थाचालकाचं बोलणं. ते जेष्ठ नागरीक. कदाचीत त्यांनी त्या प्रक्रियेत भागच घ्यायला हवा नव्हता. परंतु तरीही त्यांनी त्या प्रक्रियेत भाग घेतला आणि स्वानंद व स्नेहलच्या मिलनाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला व साहजीकच सांगीतलं की तुम्ही दोघंही एकत्र येवू शकता. एकत्र राहू शकता.
ते संस्थाचालकाचं बोलणं. त्यांनी तिच्यासमोर सत्य कथन केलं होतं. ते तिला भावलं. त्यातच तिला तिचा पुर्वकाळ आठवायला लागला. आठवल्या त्या आठवणी. ज्या तिच्यासमोर ताज्या झाल्या होत्या. ज्या आठवणीनं तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू टपकण्यास सुरुवात झाली होती. मनात वाटत होतं की एक संस्थाचालक की जो शिक्षकांचे पैसे खातो. त्यासाठी त्यांचेवर अत्याचार करतो. त्यांची प्रतिमा मलीन करतो. पैशासाठी शिक्षकांवर अत्याचार करतो. अन् हे संस्थाचालक आहेत की ज्यांनी स्वार्थ जोपासला नाही. हवं तर ते आम्हा दोघांचं मिलन करायला तयार आहेत. माझी नोकरी गेली तरी माझं जीवन सुखकारक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेमाला एका मजबूत धाग्यांनी बांधायला तयार आहेत. हवं तर ते माझं प्रेम घट्ट करायला तयार आहेत. काहीही नातं नसतांना.
स्नेहलच्या डोळ्याला अश्रुच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. तशी क्षणातच ती उठली व त्यांच्या पायावर नतमस्तक झाली. म्हणाली,
"सर, आपण माझे डोळे उघडले. हवं तर मी माफीच्याही लायक नाही. परंतु तरीही आपणाला माफी मागते. आजपर्यंत मला प्रेम म्हणजे काय असतं ते कळत नव्हतं. कळलंही नाही. प्रेमाला मी स्वार्थ समजत आलीय. जातच महत्वपुर्ण वाटत होती आजपर्यंत मलाही. अन् माझ्या वडिलांनाही. माझ्या वडिलांनीही मला तेच शिकविलं. जातीचीच माणसं सन्मान देतात. जातीत विवाह केल्यास इज्जत मिळते. परंतु ते सारं थोतांड असतं. हे सारंच अनुभवलं मी. जातीच्या माझ्या पतीनं मला काय दिलं. तेही आज कळलं सर. सर, मला हे विवाह करतांना कळलं असतं की जी जातीची माणसं मला परमनंट नोकरी नसतांना माझ्याशी विवाह करायला आली नाहीत. माझ्याशी विवाह केला नाही. त्याच जातीच्या व्यक्तीशी मी माझी नोकरी पक्की झाल्यावर का बरं विवाह करावा? तर मी विवाह केलाच नसता. आता मला माझ्या पतीकडून धोका मिळाल्यावर कळत आहे की मी त्याच वेळेस स्वानंदशी विवाह करायला हवा होता. परंतु माझे जातवंत वडील आड होते ना सर त्यात. ते हार्ट पेशंट होते. जर मी त्यांची इच्छा न ऐकता विवाह केला असता तर कदाचीत ते जास्त दिवस जगले नसते. ते लवकरच मरण पावले असते. हेही खरंच आहे ना सर."
संस्थाचालकानं स्नेहलचं ऐकलं व ते त्यावर विचार करीत म्हणाले,
"हे बघ स्नेहल. तू जर ठरवलं असतं की मला स्वानंदशीच विवाह करायचा आहे, तर तो झालाही असता आणि त्या गोष्टीला तुझ्या वडिलांनी परवानगीही दिली असती. कारण कोणतेही आईवडील हे मुलांची इच्छा मोडत नाहीत. अन् शेवटी तू आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. अन् आणखी तुला सांगतोय. माफी मागायचीच असेल तर स्वानंदची माग. तोच तुला माफ करेल. तसा त्याचा स्वभाव नम्रतेचाच आहे."
"पण सर, मला आता फार भीती वाटते त्याची. वाटतं की तो काही म्हणेल. तेव्हा आपणच त्याची आणि माझी भेट करुन द्यावी व त्याला समजावून सांगावं की तिनं केलेल्या चुकीबद्दल त्यानं तिला माफ करावं. आता तिलाही पश्चाताप झालेला आहे."
"हे बघ, मी त्यालाही समजावून सांगणारच. म्हणणार की स्नेहल चांगली आहे. परंतु तू आधी जा त्याचेकडे. त्याला म्हण की तुझं चुकलं. तू माफी मागायला आलीय. त्यानंतर काय घडतंय. ते मला सांग. त्यानंतरच्या बाकी गोष्टी माझ्याकडे सोपव. ठीक आहे."
"ठीक आहे सर. मी नक्कीच जाईल त्याचेकडे. त्याची माफी मागेल व त्याला सगळं समजावून सांगेल. हवं तर मी त्याला फार मोठा धोका दिलाय. मी माफीच्या लायक नाही, तरीही जाणार आणि त्याची माफी मागणार."
तो तिचा निर्धार. ती विचारपुर्वक आपल्या संस्थाचालकाशी बोलली. त्यानंतर ती उठली व ती परत फिरली आपल्या घरी जाण्यासाठी. परंतु आता जातांना तिच्या मनात बरेच विचार होते. जे विचार तिला भेडसावत होते. जणू तिनं केलेल्या अपराधाबद्दल तिला चिडवत होते.
आज शनिवार उजळला होता. तशी स्वानंदची सकाळची शाळा होती. तिची नोकरी गेली होती व तिचा खटला न्यायालयात सुरु होता. तशी तिची त्या शाळेतील संस्थाचालकानं कानउघाडणीही केली होतीच. म्हटलं होतं की तिनं त्याला भेटावं. त्यानंतर बाकीच्या गोष्टी ते बघणार.
आज शनिवार होता व तिनं ठरवलं होतं आज त्याला भेटायचं. तशी ती लवकरच शाळा सुटण्याची वाट पाहात होती. तशी शाळा सुटली व ती लवकरच त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. दरवाजा आतून बंद होता. तसा तिनं दरवाजा ठोकला.
तिनं दरवाजा ठोकला. तोच त्या दरवाजा ठोकण्याचा आवाज आल्यानं त्यानं दरवाजा उघडला. पाहतो काय, ती पुढ्यात उभी होती. त्यानं तिला पाहिलं. तोच त्याला आश्चर्यही वाटलं. त्याला तिच्यासोबत बोलायची इच्छाही नव्हती. परंतु ती घरी आल्यानं त्याला बोलणं भाग होतं. तसा तो म्हणाला,
"तू स्नेहलच ना."
"होय."
"आतं कशाला आलीय मला तोंड दाखवायला." तो वैतागानं म्हणाला.
"माफी मागायला आलेय."
"केलं मी माफ. आता निघ लवकर इथून."
"मला काही बोलायचं आहे तुझ्यासोबत."
"बोल लवकर आणि जा."
"नाही. जरा सवडीनं बोलायचं आहे. जास्त वेळ लागणार आहे."
"पण माझ्याकडे वेळ नाही."
"प्लीज. मी चुकले रे. मला माफ कर. शेवटी माझ्या वडिलांनी माझा जबरदस्तीनं विवाह लावून दिला."
"ते सगळं जावू दे आता. मी त्या सर्व गोष्टी विसरलो. आता मला मागच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही व मी माझं अतीतही आठवू इच्छित नाही. अठरा वर्षानंतरची मुलगी. म्हणे जबरदस्तीनं माझ्या वडिलांनी माझा विवाह लावून दिला. बाई, माझंच चुकलं. मी प्रेम करायला नको होतं तुझ्यावर. हवं तर मला माफ कर अन् तू जा आता."
"अरे तुला कसं समजवू. अरे तुला तर माहित आहे की माझे वडील हार्ट पेशंट होते."
"हो सगळं माहित आहे आणि हेही माहित आहे की माझ्या वडिलांना पोषशील म्हणणारी बया आपल्या वडिलांना माहेरी सोडून एकटीच सासरी नांदायला गेली होती. आता मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे. तू जा आता." तो परत म्हणाला.
ते स्वानंदचं तिला सतत परत जा म्हणणं. ते पाहून स्नेहलला वाईट वाटत होतं. शेवटी ती काही न बोलता परत फिरली. वाटेत तिच्या मनात बरेच विचार होते. वाटत होतं की आपण चुकीचं पाऊल उचललं. आपण आपला विवाह जातीअंतर्गत असलेल्या इंजीनियरशी करायला नको होता.
स्नेहल परत आपल्या घरी आली होती. ती विचार करीत होती. बराच विचार होता तिच्या मनात. तसं तिला आठवलं त्या संस्थाचालकाचं म्हणणं. संस्थाचालकानं म्हटलं होतं की स्वानंद जे काही म्हणेल, ते ऐकून घ्यावं. त्यानंतर काय करायचं ते करु.
स्नेहलला आठवलं होतं संस्थाचालकाचं म्हणणं. ते बोलणं आठवताच ती संस्थाचालकाला भेटायला गेली. त्यांना स्वानंदच्या घरी गेल्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी सांगीतल्या व हेही सांगीतलं की स्वानंदनं तिला परत जाण्यास सांगीतलं. त्यावर विचार करीत स्वानंदसोबत बोलणी करण्याचं आश्वासन संस्थाचालकानं दिलं व तिला परत तिच्या घरी जाण्यास सांगीतलं.
आज मंगळवार होता. स्वानंद नित्यनेमानं शाळेत आला होता. तशी दुपारची वेळ होत आली व त्या शाळेचा संस्थाचालक शाळेत आला. त्यानं सर्व वर्गांना भेट दिली व तो आपल्या केबिनमध्ये परतला. थोड्याच वेळात त्याला, त्यानं स्नेहलला दिलेलं आश्वासन आठवलं व लागलीच त्यानं स्वानंदला शिपायाकडून बोलावून घेतलं. तसा स्वानंद संस्थाचालकाच्या केबिनमध्ये हजर झाला.
स्वानंद केबिनजवळ आला. त्यानं दरवाजा ठोकला व म्हटलं,
"सर, आत येवू काय?"
संस्थाचालकानं त्याला पाहिलं. तोच त्यांनी त्याला आत बोलावलं. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरु झाल्या व संस्थाचालकानं थोड्याच अवधीत थेट विषयाला हात घातला. म्हटलं,
"स्वानंद, स्नेहलला ओळखतोस काय? आपल्या शाळेत होती."
"सर नाव नका काढू तिचं." त्यानं संस्थाचालकाला म्हटलं.
"अरे, का बरं? का बरं विषय काढू नये? अरे ती आपल्या शाळेत होती. आपल्या शाळेची कर्मचारीच ती. हं, तिचं प्रारब्ध वाईट होतं. म्हणून तिची नोकरी गेली. त्यात काय असं? भरती प्रक्रिया बंद होती. त्याच काळात तिचं काम झालं. म्हणून तिची नोकरी गेली. परंतु यावरुन तिचा विषय काढू नये. असं तुमचं म्हणणं बरोबर नाही. अन् असं का घडलं तुमच्यासोबत की तुम्ही तिचा विषय काढू नको म्हणताय."
"सर, ऐकायचं आहे तर ऐका." स्वानंद म्हणाला. तसा तो त्यांना सांगू लागला होता.
"सर, माझं तिच्यावर फार प्रेम. ते प्रेम का निर्माण झालं. हेही तुम्हाला माहित असावं. सुरुवातीला मी तिला विवाहाबद्दल विचारलं. तेव्हा तिनं स्पष्ट नकार दिला होता मला. त्यानंतर तिचा बरेच दिवस विवाह झाला नाही. ते पाहून तिनं मला एका बागेत बोलावलं. प्रेमाचं नाटक केलं व त्यातच विवाह करु असंही आमीष दाखवलं. त्यात मी फसलो. असे करीत असतांना तिनं आपल्या वडिलांची भेट घ्यायला लावली. मी भेटही घेतली. परंतु तिच्या वडिलांनी मला म्हटलं की मी दोन वर्षात दोन एकर शेती घ्यावी. तरच ते माझ्याशी तिचा विवाह लावून देतील. यात सर मी संयम राखत आधी तिची नोकरी पक्की करुन दिली. त्यानंतर मी तिच्या वेतनातून कर्ज काढलं. थोडं कर्ज मीही माझ्या वेतनातून घेतलं. त्यानंतर मी दोन एकर शेती घेतली. कारण मला तिच्यासोबत विवाह करुन संसार थाटायचा होता. हो, मी मान्य करतोय की तिनं मलाही आपल्या वेतनातून कर्ज काढून रक्कम दिली. परंतु मी जेव्हा तिच्या घरी तिच्या वडिलांकडे शेतीचे कागदपत्र घेवून गेलो व विवाहाबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले की तिचा विवाह झालेला आहे व तिनं जातीतील एका तरुणाशी विवाह केलेला आहे. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वाटलं की तिनं असं का करावं? सर, आता आपण मला सांगा, तिला जेव्हापर्यंत नोकरी नव्हती. तेव्हापर्यंत तिच्याशी विवाह करायला कोणीही तयार नव्हतं. जेव्हा तिचं वय वाढत होतं आणि जेव्हा तिला सरकारी नोकरी लागली. तेव्हा तिच्याशी विवाह करायला सर्वच तयार झाले. कारण तिचा पैसा. ती पैसा कमवायला लागली होती. परंतु सर ती नोकरी मी स्वतः आपल्या माध्यमातून लावून दिली. तिच्या नोकरीसाठी लागणारे पैसे मी भरले. हे आपणालाही माहित आहेच. यात तिनं माझा विश्वासघात केलेला आहे. म्हणूनच मी जास्त निराश झालेलो आहे. सर, आज ती माझी माफीही मागायला आली की जेव्हा तिच्यावर वेळ आली. जेव्हा तिची नोकरी गेली. जेव्हा तिच्या पतीनं तिला हाकलून दिलं. परंतु सर मला सांगा, ज्यावेळेस तिनं माझा विश्वासघात केला, तेव्हा मला कसं वाटत असेल. याची कल्पना करुन बघा. तो एक एक दिवस, तो एक एक क्षण, मी कसा कापला असेल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. सर, आपण मला कृपया माफ करावं व तिचा विषय काढू नये म्हणजे झालं."
स्वानंदनं संस्थाचालकाला आपली कैफियत सांगीतली. ते संस्थाचालकानं पुर्ण ऐकलं व त्यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले,
"झालं तुझं बोलणं की आणखी तुला काही सांगायचं आहे."
"नाही. काहीच सांगायचं नाही."
"आता मी बोलू का पुढं."
"बोला." त्यानं उत्तर दिलं. तसा संस्थाचालक बोलायला लागला. ते म्हणाले,
"हे बघ, तू इमानदारीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू प्रेम करीत होता का तिच्यावर?"
"होय."
"किती?"
"अगदी शंभर टक्के."
"हे तू इमानदारीनं बोलतोस काय?"
"होय सर, अगदी इमानदारीनं."
"मग मी सांगतो ते तू काळजीपूर्वक ऐक." संस्थाचालकानं म्हटलं. तसे त्यानं कान टवकारले. त्यानंतर संस्थाचालक बोलते झाले.
"हे बघ, मला वाटते की तू तिच्यावर खरं प्रेम करीत नसावा. कारण तुझ्या बोलण्यातून विश्वास, विश्वासघात असे शब्द दिसतात. ते दिसणं बरोबर नाही. जी मंडळी खरं प्रेम करतात. ती मंडळी असे शब्द वापरत नाहीत. कधी एखाद्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या हातून चूक होतेही. परंतु त्याचा एवढा बाऊ करु नये की ज्यातून अतिप्रसंग निर्माण होतील. अरे, विश्वासघात व विश्वासाबद्दल सांगतोय की विश्वासघात हा कितीही मुलांनी केला तरी त्याचे मायबाप हे आपल्या मुलांवर विश्वासच दाखवतात. कारण ते खरं प्रेम करतात आपल्या मुलांवर. हं, स्नेहल गेलीही असेल जातीच्या मुलासोबत विवाह करुन. परंतु तिनं तुमचा विश्वासघात केलेला नाही. उलट आपल्या वडिलांचा विश्वास पाळला. तो जर नसता पाळला तर तिचे वडील हे तिच्यापासून दुरावून गेले असते कायमचे. कारण ते हार्ट पेशंट होते. तिच्यासमोर दोन व्यक्तीमत्व उभे होते विवाह करतांना. एक वडील की ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. उन्हातून सावलीत नेलं होतं. तिला शिकवलं होतं व तिच्या पायावर उभं केलं होतं. ज्यांना जात प्रिय होती. जातीच्याच मुलाशी तिचा होणारा विवाह प्रिय होता. त्यांना वाटत होतं की तिचा विवाह जातीच्याच व्यक्तीशी व्हावा. अन् दुसरं व्यक्तीमत्व होतं तुझं. तिलाही त्यावेळेस वाटत असेल की या स्वानंदला धोका देवू नये. त्याचेही विवाह करावा. परंतु ती मजबूर होती आपल्या वडिलांच्या इच्छेपुढं. तिच्या मनातून व तिची मनापासून इच्छा असेल की तिचा विवाह तुझ्याशीच व्हावा. परंतु तिला ते आपल्या वडिलांसमोर बोलून दाखवता आलं नाही. तिनं आपली इच्छा मनातल्या मनात दाबली. कारण तिचे वडील. जे हार्ट पेशंट होते. कल्पना करुन पाहा की जर तू त्या जागी असता तर तू काय केले असते. जे काही तिनं केलं. ते योग्यच केलं आणि तुलाही माहित आहे की आपला समाज कसा आहे. आपल्या समाजासमोर प्रेमाला थारा नाही आणि नसावा. जात ही अती प्रिय आहे आणि असावीच. कारण जात ही आपल्याला संरक्षण देते. ती जेवढं संरक्षण देते. तेवढं प्रेम संरक्षण देत नाही. प्रेमानं जोडलेली माणसं ही काही दिवसानंतर दगा देतात. परंतु जातीची माणसंच अशा दगा मिळालेल्या माणसांना जवळ घेतात. हे विसरु नकोस. त्यामुळंच मला शंभर प्रतिशत वाटतेय की स्नेहलनं तुझा कोणताच विश्वासघात केलेला नाही. जे काही केलं ते एक कर्तव्य म्हणून. तिनं कर्तव्यच पाळलेलं आहे. हवं तर तिनं तुझी माफी मागायलाच नको होतं. तरीही ती आली. तिनं माफी मागीतली. आता तुझं कर्तव्य आहे. तू तिला सढळमनानं माफ करुन टाकावं म्हणजे झालं आणि एक माझी तुला विनंती आहे आणि आग्रहही की तूही तिच्याविना आजपर्यंत बरंच भोगलेलं आहे. तू एकटा जरी राहिला असला तरी तुला तिचीच आठवण सतावत असेल हे तू विसरु नकोस. तेव्हा तुला माझा एक सल्ला आहे की तू शक्य होत असेल आणि ती तयार असेल तर तू तिच्याशी विवाह करावा आणि आपला सुखाचा संसार करावा. कारण आता दोघंही दुःखी आहात व दोघांनाही आधाराची गरज आहे. शिवाय आता तुमच्या विवाहाला कोणीही विरोध करणारा नाही. तिचे वडीलही नाहीत. कारण ते आता जीवंत नाहीत की तुमच्या विवाहाला विरोध करतील."
ते संस्थाचालकाचं बोलणं. त्या बोलण्यातून त्याची कानउघाडणी झाली होती. तो आता डोळस बनला होता. त्याला आता तिची केव्हा केव्हा भेट घेतो आणि केव्हा केव्हा नाही असं होवून गेलं होतं. कारण संस्थाचालकाचं ऐकून त्यालाही आज पश्चाताप होवू लागला होता.
संस्थाचालकाशी बोलणं संपवून स्वानंद आपल्या घरी पोहोचला. तसा तो विचार करीत होता तिला भेटण्याचा. परंतु ती वेळ यायची होती. तसा पुढे रविवार होता व रविवारी सुट्टी होती.
आज रविवार होता. स्वानंद सकाळीच उठला. त्यानं लवकरच आंघोळ केली आणि जेवनखावण करुन तो तिच्याघरी जायला निघाला. तोच त्याच्या मनात विचार आला. ती आपल्याला माफ करेल काय? ती आपल्याला घरी येवू देईल काय की आपल्यासारखी ती आपल्याला बाहेरुनच हाकलून लावेल.
स्वानंद विचार करता करता तिच्या घरी पोहोचला. त्यानं बाहेरुनच दार ठोकलं. तोच तिनं दरवाजा उघडला. पाहते तर काय, स्वानंद समोर उभा. तिनं क्षणभर त्याचेकडे पाहिलं व तद्नंतर म्हटलं,
"स्वानंद, तू होय. ये आत ये."
स्वानंद आत गेला. तो पलंगावर बसला. त्यानंतर त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या. सुरुवात स्वानंदच केली होती. पहिलं इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या. त्यानंतर विषयाला हात घालत तो म्हणाला,
"अगं स्नेहल. मला माफ कर. मी तुला समजू शकलो नाही. मी त्या दिवशी तुला घरात न बोलवता घराच्या बाहेरुनच हाकलून दिलं. ती माझी कृती बरोबर नव्हती. परंतु काय करु. माझा स्वभावच तसला."
ते त्याच्या तोंडचं बोलणं. तिनं त्याच्या तोंडचं बोलणं ऐकलं व ती म्हणाली,
"त्यात माफी कसली? अरे तू जे बोलला, ते बरोबरच. मी जे काही केलं, ते तुझ्यासाठी योग्य नव्हतंच. मी तसं करायला नको होतं. परंतु काय करु, माझी मजबूरी होती."
"मला सगळं कळलं."
"कोणी सांगीतलं?"
"आपले संस्थाचालक साहेब बोलून गेले. त्यांनीच माझी कानउघाडणी केली. आता मला लक्षात आलं आहे की तू तशा स्वरुपाची पावलं का उचलली आणि हेही लक्षात आलं की माणसं स्वार्थी कशी असतात ते. परंतु तू घाबरु नकोस. मी आता आहे तुझ्यासोबत."
"हो का. मला तर त्या दिवशीच वाटत होतं की तू भयंकर रागावलेला आहे माझेवर. असं वाटत होतं की माझं भरपूर चुकलेलं आहे व यातून माझी सुटका नाही. परंतु आता माझा राग निवळला."
"एक विनंती करु का तुला? तुला राग येणार नसेल तर करतो."
"बोल नं काय बोलायचं आहे ते. मला नाही राग येणार आता."
"आपण दोघांनी आता थाटामाटात विवाह केला तर....."
ते त्याचे शब्द. ते शब्द तिनं ऐकले. ते शब्द तिच्या कानाला चिरुन गेले. तशी ती स्तब्धच होती. ते पाहून त्यानंतर तो म्हणाला,
"हे बघ, आता ना तुला पती आहे, ना मला पत्नी आहे. तुलाही आधाराची गरज आहे आणि मलाही आधाराची गरज आहे. तुलाही वाटतं की तुला कोणीतरी आधार द्यावा आणि मलाही अगदी तसंच वाटतंय. शिवाय आपण विवाह केला तर या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतील. आता मला सांग, तू विवाह करशील का माझ्यासोबत? तुला काय वाटतं ते अगदी निर्भीडपणाने बोल."
"हे बघ स्वानंद, माझा विवाह झाला होता आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार एक स्री दुसऱ्यांदा विवाह करु शकत नाही. शेवटी मी उष्टीच म्हणायची. एक पती झालेली. तू मात्र कुवारा. मी डाग लागलेली आणि तू डाग न लागलेला. शिवाय आपण विवाह केलाच तर समाज काय म्हणेल आपल्याला? स्वानंद मी पतीव्रता स्री नाहीच. मला एका पतीनं उपभोगलेलं असून मी एक उपभोगलेली स्री आहे. हा खरं तर तुझा विश्वासघात ठरेल."
"हे बघ, राहू दे त्या सामाजीक असमतोलाच्या गोष्टी. इथं तर मोठमोठे नेते आपली पत्नी घरी असतांना दुसऱ्याच स्रियांसोबत व्याभिचार करतात. तसंच या सामाजीक जगात एक स्री पैसे कमविण्यासाठी नव्हे तर आपला फॅशनमेला जोपासण्यासाठी पर पुरुषांसोबत व्याभिचार करते, तिला पती असतांनाही. त्यापेक्षा तू तर बरीच चांगली आहेस. शिवाय तुझं संपुर्ण जीवन मला माहित आहे. मग यात विश्वासघात कसला? विश्वासघात त्याला म्हणतात, ज्यात काहीही माहित नसतं आणि कर्म घडतं. तसं तू काहीही केलं नाही. मला तू प्रिय आहेस ना. मग समाजाला मी पाहून टाकेल. तुला काय करायचं समाजाचं. तू फक्त हो म्हण. बाकी मी सगळं सांभाळून घेईल."
ते त्याचं बोलणं. ते बोलणं तिला तिच्या आईवडिलांपेक्षाही मोठं वाटलं. आईचं सोडा, ज्या वडिलांनी तिची आवडनिवड न जोपासता तिचा विवाह बळजबरीनं एका परपुरुषाशी लावून दिला होता. त्या पित्यापेक्षा स्वानंद तिला आज जवळचा वाटत होता. वाटत होतं की हा स्वानंद, ज्याला माझा पुर्व इतिहास माहित आहे, तरीही तो मला स्विकारायला तयार आहे. यालाच म्हणतात खरं प्रेम. स्वानंद माझ्यावर खरं प्रेम करतो. मी त्याला नकार का द्यावा? ती विचारच करीत होती त्यावर. तोच काही वेळ जाताच तो म्हणाला,
"काय झालं स्नेहल?"
"काही नाही, जरा विचार करीत होती."
"कसला विचार?"
"काही नाही सहजच एक विचार आला होता मनात."
"हो का."
"होय."
ती म्हणाली व स्तब्ध झाली. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात ती म्हणाली,
"स्वानंद, एक इच्छा बोलू."
"बोल. काय बोलायचं ते बोल."
"बरेच दिवस झाले रे. मी तुझ्या बाहुपाशात नाही. तुझा रोमांचकारी स्पर्श नाही झाला मला बरेच दिवसापासून. जरा मला आपल्या बाहुपाशात घेशील?"
तो तिचा विचार. त्यावर त्यानं होकार देत तिला बाहुपाशात घेतलं. तोच ती म्हणाली,
"स्वानंद, मी विवाह करायला तयार आहे तुझ्यासोबत. आता आपल्याला एकमेकांपासून कोणतंही बंधन विलग करु शकत नाही. आता प्रत्यक्ष देव जरी आला आणि त्यानं म्हटलं की स्वानंदसोबत विवाह करु नकोस. तरीही ते मी ऐकून घेणार नाही. बस, आता तरी झालं ना तुझं समाधान."
ती बोलत होती आणि बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रुही कोसळत होते. तिचं ते बोलणं. ती अंतर्मनातून बोलत होती. ज्यानं स्वानंदचं ह्रृदय शांत झालं होतं. लवकरच स्वानंदनं आपल्या संस्थाचालकाला हाताशी धरुन तिच्याशी थाटामाटात विवाह साजरा केला व रितीरिवाजानं त्यानं स्नेहलला आपल्या घरी आणलं होतं. तद्नंतर स्नेहलनं दोन अपत्यांना जन्म दिला. त्यांना लहानाचं मोठं केलं. ज्यातून त्यांना नोकरीही लागली. त्यातच तिनं कधी स्वानंदला त्याच्या संपुर्ण आयुष्यभर अंतर दिलं नव्हतं.
ते शेवटपर्यंत सोबत होते. अगदी वृद्धाश्रम मिळालं होतं तरीही. ते दोघंही वृद्धाश्रमात गेले होते मुलांनी हाकलून दिल्यावर. त्या दोघांनाही आयुष्यभर एकमेकांची सोबत होती. पुढं ती वृद्धाश्रमातच मरण पावली, त्याला एकाकी सोडून. आता ती गेल्यापासून मुलांपेक्षा स्वानंदला तीच जास्त आठवायला लागली होती.
आज ती या जगात नव्हती. परंतु तिच्या आठवणी या जगात उरल्या होत्या. त्या आठवणी स्वानंदला बेचैन करुन टाकत होत्या. तो वृद्धाश्रमात होता व तो ज्या वृद्धाश्रमात होता, तिथं मायेचा गारवा होता. अनेक स्नेहल होत्या. कुणी दुःखी होत्या. कुणी पिडीत होत्या. परंतु त्या स्वानंदच्या स्नेहल नव्हत्या. त्या कुणाच्या तरी स्नेहल होत्या की ज्यांचं सुनेसोबत न पटल्यानं त्यांनी त्यांना वृद्धाश्रमाच्या डोहात ढकललं होतं.
आज स्वानंदला आठवत होते ते प्रसंग. जे त्यानं स्नेहलसोबत आयुष्य जगतांना काढले होते. असाच तो प्रसंग त्याला आठवला. एकदा त्याचं लहान बाळ फार आजारी पडलं होतं. फारच ताप होता. ताप वाढतच चालला होता. त्याची आई झोपली नव्हती. मात्र स्वानंदला झोप येत होती. परंतु स्नेहल त्याची आईच. तिनं अर्ध्याच रात्री स्वानंदसमोर तकादा लावला व त्याला झोपेतून उठवलं. ज्यातून तेवढ्याच रात्री स्वानंदनं आपल्या लहान बाळाला दवाखान्यात नेलं व त्याचा जीव वाचवला होता. स्वानंदला आठवत होता तोच प्रसंग. त्याला आठवत होतं त्या बाळाचं वागणं. त्या बाळानं आईचं ऋण न चुकवता तिलाही वृद्धाश्रमात पाठवलं होतं ऐन वृद्धापकाळात. ज्या काळात त्या आईला बाळाच्या आधाराची गरज होती.